Zebra chi Mahiti
झेब्रा हा जंगलात राहणारा प्राणी आहे. हा प्राणी घोड्याच्या जातीतील आहे. हा प्राणी अगदी निरुपद्रवी आहे.
झेब्रा या प्राण्याची माहिती – Zebra Information in Marathi
हिंदी नाव : | जैब्रा |
इंग्रजी नाव : | Zebra |
झेब्र्याला चार पाय असतात. त्यांच्या अंगावर उभे काळेपांढरे पट्टे असतात. झेब्र्याचे कान छोटे असतात; पण ते सतत उभे असतात. झेब्र्याला एक शेपटी असते. त्याच्या डोक्यापासून ते जवळजवळ पाठीवरील खांद्यापर्यंत आयाळ असते. त्याच्या आयाळातील’ केस ताठ व आखूड असतात.
झेब्र्याचे अन्न – Zebra Food
हा प्राणी गवत, झाडाचा पाला, फळे इ. खातो. हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे.
या प्राण्याला फक्त वाघ आणि सिंह यांच्याकडूनच धोका असतो. झेब्रा या प्राण्याचा स्वभाव भित्रा आहे. झेब्रा हा प्राणी एकटा न राहता वीस-पंचवीसच्या संख्येने एकत्र राहतो.
जंगलात उंच-उंच गवत असेल त्या भागातच झेब्रा हा प्राणी राहतो. या प्राण्याला मिळालेले आणखी वरदान म्हणजे तो ताशी सत्तर ते पंचाहत्तर किमी. वेगाने पळू शकतो. त्याच्या जोरावरच तो वाघ-सिंह यांचा हल्ला परतवून लावू शकतो..
थोड्या-फार प्रमाणात झेब्याचा उपयोग सामान वाहून नेण्यासाठी केला जातो. हा प्राणी आफ्रिका खंडात जास्त प्रमाणात आढळून येतो. झेब्रा चरण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतो.