YourSpace Startup Story
देशात बरेच स्टार्टअप सुरू आहेत पण विधार्थ्यांच्या बाहेरगावी राहणे आणि तेथे विधार्थ्यांना येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जसे राहणे, खाणे, पिणे. या गोष्टींवर विचार करून तीन मित्रांनी एका नव्या स्टार्टअप ची सूरवात केली, एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात तेव्हा होते जेव्हा एखाद्या समस्येवर उपाय निघतो.
जसे सर्वात आधी सामानाच्या बॅगला डोक्यावर उचलून घेऊन जावे लागत असे पण एका व्यक्तीने यावर विचार केला आणि या समस्येवर उपाय काढत त्या व्यक्तीच्या डोक्यात एक कल्पना आली. आणि त्याने सामानाच्या बॅगला खालच्या बाजूला चाकं बसवून या प्रॉब्लेम वर उपाय काढला. तसेच आपल्या देशात विधार्थ्यांच्या हॉस्टेल लाईफ ला पाहून तीन मित्रांनी एक नवीन स्टार्टअप सुरू केलेला आहे. आणि त्या स्टार्टअप चे नाव आहे, Your Space.
बाहेरगावी राहणाऱ्या विधार्थ्यांसाठी चा स्टार्टअप – “Your Space” Startup Success Story in Marathi
Your Space ची सुरुवात करणारे तीन भारतीय मित्र आहेत, शुभा लाल, करण कौशिक आणि निधि कुमरा ह्या तीन मित्रांनी विध्यार्थ्यांना कॉलेज लाईफ मध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या कमी करत या स्टार्टअप ची सुरुवात केली, आणि आज देशातून २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमावणारी कंपनी बनली आहे.
या कंपनीची सुरुवात २०१६ ला केल्या गेली, सुरुवातीला या कंपनीला मिळालेल्या फंडिंग मुळे त्यांना कंपनीला मोठे करण्यास खूप फायदा मिळाला. कंपनीला मिळालेल्या फंडिंग मुळे आज Your Space मोठ्या प्रमाणात आपले जाळे दूरवर पसरवू शकत आहेत, त्यांनी या फंडिंग मुळेच बरेचश्या प्रॉपर्टी आणि १२०० खोल्या त्यांनी विधार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
Your Space मध्ये विधार्थ्यांसाठी १० हजार पासून तर ३० हजारापर्यंत खोल्या उपलब्ध करून देते, सोबतच यामध्ये एक विशेषतः म्हणजे बाहेरच्या रूम्स प्रमाणे विध्यार्थ्यांना येथे इलेक्ट्रिसिटी चे बिल भरावे लागत नाही, सोबतच मुलांना स्वच्छ रुम, स्वच्छ पाणी, या सगळ्या गोष्टींची सुविधा उपलब्ध केल्या जाते. आणि भविष्यात विधार्थ्यांसाठी स्वच्छ जेवणाची, तसेच सोबतच रूम्स मध्ये कंटाळा वाटल्यास गेमची सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे.
कंपनीच्या संस्थापकांच म्हणणे आहे की मुंबई, दिल्ली,बँगलोर, पुणे, जालंदर, तसेच चंदीगड या शहरांमध्ये Your Space ची सेवा विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे, आणि या ठिकाणी आपण शिकायला किंवा काही कामासाठी असणार तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रूम्स बुक करू शकता.
खरच नवीन शहरात गेल्यानंतर आपल्याला दोन मुख्य समस्यांना सामोरे जावे लागते ते म्हणजे राहायची आणि खायची सोय कशी करावी तर या स्टार्टअप मुळे बऱ्याच बाहेरगावी राहणाऱ्या विधार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ह्या कंपनीचे ध्येय आहे भारतातील संपूर्ण राज्यात या स्टार्टअप ला पसरविण्याची.
कंपनीचा रेव्हेन्यू हा करोडोंमध्ये आहे, आणि देशात या स्टार्टअप ला विध्यार्थी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवत आहेत. आशा करतो आपल्याला ही स्टार्टअप ची स्टोरी आवडली असेल आपल्याला हो स्टार्टअप दत्तरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन स्टोरी आणि लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!