Yak chi Mahiti
आपण अनेक प्रकारचे प्राणी पाळतो. त्यापैकी याक हा एक पाळीव प्राणी आहे.
याक प्राणी माहिती – Yak Information in Marathi
हिंदी नाव : | याक |
इंग्रजी नाव : | Yak |
याक या प्राण्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान व एक शेपूट असते. या प्राण्याच्या शरीराची लांबी साधारणपणे ३०० ते ३२५ से.मी. असते. बांध्याची उंची साधारण २०० सेमी असते व शेपटीची लांबी साधारण ६० सेमी असते.
याक चे अन्न – Yak Food
गवत, शैवाल व कवकाच्या सहवासाने तयार झालेल्या वनस्पती हे त्याचे अन्न आहे. रंग :-याक हा प्राणीकाळा आणि तपकिरी रंगाचा असतो.
वयोमर्यादा :- याक या प्राण्याची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा २० ते २५ वर्षे इतकी वयोमर्यादा असते.
उपयोग :- याकया प्राण्याचा उपयोगगाडी ओढण्यासाठी होतो.
याक चे वजन – Yak Weight
या प्राण्याचे वजन सर्वसाधारणपणे ३०० ते ३१५ कलोग्रॅम असते.
याक हा प्राणी चीन, भारत, नेपाळ येथे प्रामुख्याने आढळतो. तिबेटमध्ये याचा उपयोग वाहतुकीसाठी होतो. तसेच याक या प्राण्यापासून मांस, दूध मिळते. भारतात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशात याक हा प्राणी आढळतो. या प्राण्याच्या डोक्यावर शिंगे असतात. हा प्राणी ४०° C तापमान सहन करू शकतो. याक मादीचीगर्भधारण क्षमता २५८ दिवसांची असते. मादी एका वेळेस एका पिलाला जन्म देते. गर्भधारणा साधारणपणे सप्टेंबर महिन्यात असते व त्याच्या पिलाला साधारणपणे जूनमध्ये जन्म दिला जातो.
या प्राण्यांची शिंगे वक्राकार दिशेने डोक्यापासून वाढतात. मादीच्या शिंगाची लांबी साधारणपणे ५१ सेमी व नराच्या शिंगाची लांबी साधारणपणे ९५ सेमीपर्यंत असते.