Sakshi Malik – साक्षी मलीक एक भारतीय महिला कूस्तीपटू आहे. तिने 2016 रिओ आॅलंपीक मध्ये कुस्तीत ब्राॅंझ मेडल पटकावून सर्व भारतीयांचा सन्मान उंचावला होता. हे भारताचे पहिले पदक होते. आॅलंपीक मधील पदकांचा दुष्काळ तीने भरून काढला होता. या आधी साक्षी 2014 मध्ये ग्लासको काॅमनवेल्थ खेळांमध्ये सिल्वर मेडल आणि 2015 दोहा एशियन रेसलिंग चॅंपीयनशिप मध्ये ब्राॅंझ मेडल जिंकले होते.
साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू – Wrestler Sakshi Malik Biography
साक्षी मलीक भारतीय रेल्वे मध्ये दिल्ली डिवीजन च्या उत्तरी रेल्वे झोन मध्ये कमर्शियल डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. रिओ आॅलंपीक मध्ये ब्राॅंझ मेडल जिंकल्यानंतर तिचे प्रमोशन झाले. त्यांना आता आॅफिसर रॅंकच्या अधिकारी पदावर नियूक्ती दिली आहे. रोहतकच्या महर्षि दयानंद युनिव्हर्सिटीहून ती शारिरीक शिक्षणात पदवी प्राप्त हे.
साक्षी मलिक यांचे प्रारंभिक जिवन – Wrestler Sakshi Malik Early Life
साक्षी मलिक यांचा जन्म 3 सप्टेंबर 1992 मध्ये हरियाणा च्या रोहतक या शहरात झाला. तिचे वडील एक शिक्षक होते. त्यांच्या आजोबांकडून साक्षीस कुस्तीची प्रेरणा मिळाली. वयाच्या 12 व्या वर्षापासुन साक्षीने कुस्तीचे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली होती. रोहतक येथील छोटूराम स्टेडियम मधील आखाडयात ईश्वर दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती चे धडे गिरवले. लोकांकडून त्यांची फार उपेक्षा झाली परंतू कुटूंबियांच्या सहकार्याने त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
2010 मध्ये ज्युनियर वल्र्ड चॅंपियनशिप मध्ये 58 किलो गटात तिने ब्राॅंझ मेडल जिंकले होते. 2014 मध्ये दवे स्थूलत्ज इंटरनॅशनल टूर्नामेंट मध्ये 60 किलो गटात तिने गोल्ड मेडल जिंकले होते. 2014 मध्ये ग्लाॅसको काॅमनवेल्थ खेळात सिल्वर मेडल जिंकले होते. 2014 मध्ये ताश्कंद मध्ये वल्र्ड चॅंपियनशिप मध्ये ती क्वाॅर्टरफायनल मध्ये हरली होती. 2015 मध्ये दोहा येथे एशियन रेसलिंग चॅंपियनशिप मध्ये 60 किलो गटात साक्षीने ब्राॅंझ मेडल मिळविले.
पहिल्या दोन्ही फेरीत तिने तिच्या पेक्षा जास्त अनूभवी व नामांकनधारी कुस्तीपटूंना पछाडले होते. 2016 समर आॅलंपीक मे 2016 मध्ये आॅलंपीक जागतिक क्वालिफाईंग राउंडमध्ये 58 किलो गटात साक्षीने सेमिफायनल मध्ये चिनच्या जहाॅंग ला हरवून 2016 रिओ आॅलंपीक मध्ये आपले नाव निश्चित केले होते. आॅलंपीक्स मध्ये पहील्या फेरीत स्वीडन् खेळाडूस तर दुस-या फेरीत माल्डोवा च्या खेळाडूस हरवून तिने तिस-या फेरीत प्रवेश केला होता, त्यात तिने मंगोलियन खेळाडूस पराजीत करत अंतीम 8 मध्ये आपले नाव स्थापन केले.
नंतर ती क्वाॅर्टरफायनल मध्ये जिंकली. तिने कजाकिस्तानच्या एशियन चॅंपियन ऐसूलू त्यन्खेकोवोस 8-5 ने हरवून ब्राॅंझ मेडल प्राप्त केले. सेमीफायनलला हरूनही ब्राॅंझसाठीच्या लढतीत ती सावरून एशियन चॅंपियन ला हरवत ब्राॅंझ पदकाची कमाई केली.
रिओ आॅंलंपीक 2016 चे हे भारताचे पहिले पदक होते. मेडल जिंकल्यानंतर भारतीय रेल्वेने साक्षी मलीक यांना प्रमोशन देत त्यांना अधिकारी स्तरावर अधिकारी बनविले. भारतीय रेल्वे कडून त्यांना 5 करोड रूपये रोख बक्षिस मिळाले. भारतीय आॅलंपीक संघाने राष्ट्रीय क्रिडा मंत्रालय दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश सरकार कडून त्यांना पुरस्कार मिळाले.
आपल्या अंतिम सामन्यात साक्षीने 6 मिनीटात आपली जीत पक्की केली. प्रतिव्दंदी एशियन चॅंपियन होता. खेळतांना वाटत नव्हते की साक्षी जिंकेल परंतू शेवटच्या 10 सेकंदात तीने असा डाव खेळला की प्रतिव्दंदीस हार पत्करावी लागली.
देशभरात उत्साहाचे वातावरण झाले. सर्वत्र तिच्या विजयाचा जल्लोश साजरा केला गेला. साक्षीने दाखवून दिले की एक मुलगी आपल्या देशासाठी काय करू शकते. तिने आपले यश भारतातील सर्व मुलींच्या नावे केले असून तीने त्याप्रसंगी एक संदेश देशवासीयांच्या नावे दिला, ‘‘बेटी पढाओ बेटी बचाओ” आणि ‘‘ पढेगी वो तभी तो आगे बढेगी वो” हा नारा साक्षीच्या यशाला पाहून समर्थ ठरतो.
23 वर्षीय साक्षीच्या या यशाने तिचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या गेले. भारतीयांनो आपल्या मुलींना हवेसे स्वातंत्र्य द्या अशी तीने सर्व भारतीयांना विनंती केली आहे.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ साक्षी मलिक बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा “साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू – Wrestler Sakshi Malik Biography तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट: Sakshi Malik Biography – साक्षी मलिक यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.