Gavel Information
आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये पाहिले असेल की न्यायालयामध्ये न्यायाधीश लाकडी हातोड्याचा उपयोग करताना आपण पाहिलं असेल आणि न्यायालयात ऑर्डर ऑर्डर करताना न्यायाधीश आपल्याला दिसतात. भारता मधेच नाही तर विदेशातही ह्या हातोड्याचा वापर केला जातो, तर आजच्या ह्या लेखात आपण पाहणार आहोत की न्यायालयात हा हातोडा का वापरला जातो आणि याला म्हणतात तरी काय तर चला पाहूया.
न्यायालयात लाकडी हातोड्याचा वापर का केल्या जातो – Wooden Hammer Used in Court
हातोड्याला काय म्हणतात? – Judge Hammer Name “Gavel”
सर्वात आधी या हातोड्याला काय म्हणतात पाहूया, न्यायालयामध्ये वापरल्या जाणाऱ्या या लाकडी हातोड्याला गॅवेल असे म्हणतात. या लाकडी हातोड्याचा वापर सर्वात आधी ब्रिटिश देशांमध्ये केला जात असे. आणि त्यांचे भारतावर १५० वर्ष राज्य असल्यामुळे काही गोष्टी भारतात लागू झाल्या आणि त्यापैकी एक म्हणजे हा लाकडी हातोडा. पण आता जवळ जवळ बऱ्याच न्यायालयांमध्ये याचा वापर कमी होत आहे.
या गॅवेलची निर्मिती कशी झाली – Gavel History Information
इंग्लंड मधेच गॅवेल ची निर्मिती झाली होती, सर्वात आधी इंग्लंड मध्ये या गॅवेल चा वापर होऊ लागला, कारण येथे मकान मालिक आणि भाडेकरू यांच्या मध्ये वादविवाद होत असत आणि त्यांच्या वादासाठी ते न्यायालयात जात असत तेव्हा तेथे उत्पन्न झालेल्या वादाला शांत करण्यासाठी न्यायालयात न्यायाधीश लाकडी टेबलाला वाजवत असतं, आणि सर्वांना शांत करत असतं. पण त्यानंतर त्या टेबलची जागा घेतली गॅवेलने, न्यायाधीश न्यायालयात चाललेल्या गोंधळाला गॅवेल ने शांत करत असत.
या लाकडी हातोड्याचा वापर न्यायालयातील होणाऱ्या वादाला शांत करण्यासाठी न्यायाधीश महोदयाद्वारे केला जातो. आजही विदेशी न्यायालयात या हातोड्याचा वापर केल्या जातो, परंतु भारतामध्ये या लाकडी हातोड्याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो, जवळ जवळ न केल्यासारखा.
तर मित्रांनो आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!