Womens Day Quotes in Marathi
जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यवस्तीत रित्या संगोपन चालू ठेवते, तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या सर्व महिलांना माझी मराठी चा मानाचा मुजरा.
दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात आयोजित केला जातो. जेणेकरुन आपण जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करू शकू. त्या साठी आपण आपल्या मैत्रीणीना शुभेच्छा संदेश पाठवुन आपण हा दिवस साजरा करू शकतो.
जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि सुविचार – Women’s Day Quotes in Marathi
“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”
“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…”
“तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”
Happy Women’s Day
“जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.”
“तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”
“तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”
Happy Women’s Day Suvichar
“ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”
“स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”
“जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.”
Mahila Diwas Quotes in Marathi
आजच्या युगात असं कुठलच क्षेत्र नाही जिथ महिला सक्षम नाही आहेत. महिलांनी हे दाखवून दिले कि त्या कुठल्याच कामात आगे नाही आहेत. त्यांनी स्वतः ला सशक्तिशाली शक्ति सारखं स्थापित केलं.
आज पहिले पेक्षा जास्त प्रमाणात महिला आत्मनिर्भर आणि सक्षम आहेत, आणि पुरुषांप्रमाणेच राजनीती, आर्थिक, सामजिक सगळ्याच क्षेत्रात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.
या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आजही महिलांच्या जीवनाच्या संबधीचे महत्वाचे निर्णय हे तिचे वडील, भाऊ, किवां नवरा यांच्या द्वारेच घेत ले जातात.
हेच नाही तर बऱ्याच ठिकाणी तर मुलगी जन्माला यायच्या आधीच तिला मारल जात, तर काही ठिकाणी महिलांना त्यांच्या शिक्षेच्या अधिकारासाठी आज पण लढाव लागत आणि मानसिक टॉर्चर सहन कराव लागत.
या सारखे कोट्स स्त्रीच महत्व सांगण्यासाठी आणि समाजात त्यांना त्याचं उचित स्थान देण्यासाठी उपयोगी पडतील. आणि तसचं हे विचार महिलांच्या प्रती जागरुकता पसरविण्यात सुध्दा उपयोगी ठरु शकतात.
हे अनमोल विचार तुम्ही सोशल मीडिया साइट्स, फेसबुक, ट्वीटर और इंस्टाग्राम, इत्यादींवर पण शेअर करू शकता.
“ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
“स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.”
“जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
Women’s Day Wishes
“महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”
“स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी शिकून सावरतील दुनिया सारी.”
“विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Women’s Day Wishes in Marathi
“पूर्वजनमाची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,जग पाहिला नव्हतं तरी,नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.”
“प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात.”
“महिलांना अबला म्हणणं हा त्यांचा अपमान आहे.”
Mahila Dinachya Hardik Shubhechha
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पण महिलांच महत्व सांगितलेलं आहे आणि त्यांना देवी मानल्या गेल आहे. या सोबतच वेद, पुराणात आणि शास्त्रात सुद्धा महिलांची शक्ती आणि क्षमतेची बरीच उदाहरण आपल्याला बघायला आणि वाचायला मिळतात.
स्त्रीच्या शिवाय या जगाची कल्पनाच नाही करू शकत, कारण स्त्री च वंशाला पुढे नेते आणि देशाच्या विकासात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावते.
स्त्री एक आई, पत्नी, बहिण, मुलगी, सून, या सगळ्या रुपात आपल कर्तव्य पार पडत असते आणि एक सशक्त समजाच्या निर्माणात मदत करते.
म्हणून महिलांवर लिहिलेले हे कोट्स खूप महत्वपूर्ण आहेत सोबतच महिलांच्या प्रती सन्मानाची भावना निर्माण करतात.
“ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…”
Happy Women’s Day!
“आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”
“स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीची अपमान आहे.”
Happy Women’s Day in Marathi
“आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा”
“नारी हीच शक्ती आहे नराची…
नारीच हीच शोभा आहे घराची…
तिला द्या आदर, प्रेम, माया…
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा…
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे”
Mahila Din Quotes in Marathi
ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई