Mahila Sashaktikaran Slogan
एके काळी महिलांना फक्त चूल आणि मुल पर्यंतच सीमित ठेवलेले होते पण आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र नाही आहे ज्या मध्ये महिलांनी आपली बाजू मजबूत नसेल केली. गाडीच्या चालकापासून तर विमानाच्या पायलट पर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे.
आजची नारी हि अबला नसून सबला आहे, ती स्वतःच्या पायावर उभी राहून जगाला तिचे अस्तित्व दाखवू शकते, तसेच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास ती समर्थ आहे.
महिला सशक्तीकरणावर स्लोगन – Women Empowerment Slogans in Marathi
तर आपण आज महिला सशक्तीकरणावर काही घोषवाक्ये पाहणार आहोत.
Catchy Slogans for Women’s Empowerment
नारी तू घे उंच भरारी, फिरून पाहू नकोस तू माघारी.
डोळ्यात तू नको येऊ देऊ पाणी, तू आहेस लढणारी झाशीची राणी.
राष्ट्राला हवी आहे शिवबाची जिजाऊ, म्हणून स्त्रियांना सन्मानाने वागवू.
एक नवरी, पूर्ण घरादाराला सावरी.
Slogans on Female Empowerment in Marathi
द्या तिला योग्य तो सन्मान, कारण ती आहे खूप महान.
नको घालवू एकही संधी, तूच आहेस आजची इंदिरा गांधी.
प्रत्येकाने आपल्या आईच्या उदारातूनच जन्म घेतला आहे, आणि प्रत्येक स्त्री हि एक आईच असते. तिच्या शिवाय जीवनाला काहीही अर्थ नसतो.
महिलाच आहे जीवनाचा आधार, म्हणून तिचा करा आदर.
Women Empowerment Quotes in Marathi
नारीत आहे शक्ती भारी, का समजता तिला बिचारी.
समजू नकोस स्वतःला साधी सुधी, तूच आहेस आजची किरण बेदी.
ती नाही आहे अबला, करू द्या तिला स्वतःचा फैसला.
महिलांना समजू नका बेकार, कारण त्याच आहेत जीवनाचा आधार.
Women Empowerment Quotes
तेही स्पर्शेल आकाश,आहे फक्त संधीचा अवकाश.
मुलींना द्या शिक्षणाचा आधार, करतील त्या तुमच्या पिढ्यांचा उद्धार.
ती वस्तू नाही भोगाची, देवता आहे ती त्यागाची.
Women Empowerment Taglines
नारी तू आहेस महान, या विश्वाची आहेस तू शान.
बनून रहा तू या समाजाची ताई आणि माई, तूच तर आहेच राजा शिवाजीची जिजाबाई.
घेते स्वतःवर कोणतेही जबादारी, तेही विना कोणत्या तक्रारी.
नारी सशक्तिकरण स्लोगन
शिकलेली आई, घरादाराला पुढे नेई.
स्त्रियांना द्या इतका मान, कि वाढेल आपल्या देशाची शान.
करू नका महिलांचे शोषण, देशात त्या मुळे येईल कुपोषण.
महिला कोणत्याही क्षेत्रात आज पुढेच आहेत, त्यासाठी त्यांना कमजोर समजण्याची चूक करू नका. आणि प्रत्येक स्त्री चा आदर करायला शिका, तर आजच्या लेखात आपण काही घोषवाक्ये पाहिले जे महिलांना सशक्त करण्यासाठी उपयोगात येऊ शकतात,
आशा करतो कि आपल्याला आजचा हा घोषवाक्यांचा लेख आवडला असेल, आवडल्यास आपल्या संपर्कातील महिलांना हा लेख पाठवून त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यास मदत करा. तसेच आपल्या मित्रांना हा लेख शेयर करायला विसरू नका.
आपला अभिप्राय अवश्य कळवा आंमच्या majhimarathi.com ला.