Badrinath Temple in Marathi
बद्रीनाथ यात्रा, बद्रीनाथ मंदिर या विषयी आपण बरेच वेळा टीव्ही चॅनल वर किंवा आणखी काही ठिकाणी ऐकत असतो, बद्रीनाथ या ठिकाणाला हिंदू धर्मात एक विशेष महत्व दिलेलं आहे, आपण नेहमी चार धाम यात्रा ह्या विषयी ऐकलेल असेल त्या चार धाम पैकी एक म्हणजे बद्रीनाथ. देशातील चार पवित्र ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे बद्रीनाथ. हे भगवान विष्णू यांचे धाम आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक मंदिरामध्ये पूजेच्या वेळी शंख वाजविला जातो. आणि पूजा केली जाते. पण देशातील हे एकमेव मंदिर आहे जिथे पूजेलाच नाही तर तसेही शंख वाजविला जात नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे, बरेच जणांना या रहस्यमय कथेविषयी माहिती नाही आहे, तर आपण आजच्या लेखात ती पौराणिक कथा पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया.
बद्रीनाथ मंदिरात कधीही शंख का वाजविला जात नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा – Why the conch is not blown in Badrinath Temple
बद्रीनाथ मंदिरा विषयी थोडक्यात माहिती – Badrinath Temple Information in Marathi
बद्रीनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चामोली जवळील अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक प्राचीन मंदिर आहे. आणि या मंदिराचे बांधकाम जवळजवळ सातव्या किंवा नवव्या शतकात झालेले असल्याचे काही प्रमाण मिळतात. देशातील चार धाम च्या यात्रांपैकी एक ठिकाण म्हणजे बद्रीनाथ. आणि येथे वर्षातून लाखो भाविक दर्शनासाठी संपूर्ण भारतातून येतात. म्हणजेच हे ठिकाण नेहमी भाविकांनी भरलेलं असतं. आणि बद्रीनाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो किलोमीटर चा प्रवास करून भाविक येथे पोहचतात.
या मंदिरामध्ये भगवान बद्रीनारायण यांची १ मीटर(३.३ फूट) एवढी लांब मूर्ती पहायला मिळते. असे म्हटले जाते की शिव चा अवतार मानल्या जाणारे आद्य शंकराचार्य यांनी ही मूर्ती आठव्या शतकात जवळच असलेल्या नारद कुंडातून काढून मंदिरात स्थापित केली होती. असेही म्हटले जाते की ही मूर्ती पृथ्वीवर आपोआप प्रगट झाली होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत ती मूर्ती तेथे स्थित आहे.
शंख न वाजविण्या मागे कोणती पौराणिक कथा आहे? – History of Shank (CONCH SHELL)
एके काळी हिमालयात राक्षसांचा दरारा होता. आणि ते तेथील सर्व लोकांना त्रास देत असतं विशेषकरून ते साधू मुनी या सर्वांना विनाकारण त्रास देत असतं. तेव्हा साधू मुनींना आपल्या आश्रमात किंवा मंदिरात राहूनच देवाची पूजा अर्चना करावी लागत असे. पण तरीही ते राक्षस साधू मुनींना त्रास देणे सोडत नसत. आणि त्यांनाच आपले भोजन बनवत असतं, या सगळ्या त्रासाला कंटाळून एक दिवस ऋषी अगस्त्य यांनी माता भगवती यांना मदतीसाठी पुकारले. त्यानंतर माता भगवती आपल्या कुष्मांडा देवी च्या अवतारात प्रगट झाल्या आणि त्रिशूलाने आणि तलवारीने सगळ्या राक्षसांचा विनाश करण्यास सुरुवात केली.
सगळ्या राक्षसांचा विनाश केल्या गेला, परंतु दोन आतापी आणि वातापी हे दोन राक्षस मातेचा राग पाहून भीतीने पळून गेले. आणि यापैकी आतापी राक्षस मंदाकिनी नदी मध्ये जाऊन लपून राहिला आणि वातापी राक्षस बद्रीनाथ धाम मध्ये जाऊन शंखामध्ये लपून राहिला. आणि तेव्हापासून बद्रीनाथ मध्ये शंख वाजविला जात नाही. आणि ही प्रथा आजही अशीच्या अशी पाळल्या जाते.
वरील लेखात आपण पाहिले की बद्रीनाथ धाम मध्ये शंख का वाजविला जात नाही, आणि आपल्याला या लेखातून हे उत्तर सुध्दा मिळाले असेल तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!