Sunday is Holiday
रविवार म्हटलं की सर्वांना माहीतच आहे, की तो आठवड्यातील एक सुट्टीचा दिवस असतो, संपूर्ण आठवडा हा सात दिवसांचा असतो, त्यामध्ये रविवार सर्वांना प्रिय असतो, याच दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबियांसोबत आपला संपूर्ण वेळ घालवत असतो, जेव्हा प्रत्येक जण आपल्या कामावर असतो, तेव्हा तो ठरवतो की रविवारी सुट्टी असेल तेव्हा चांगल्या प्रकारे आपण वेळ घालवू, तसेच शाळा महाविद्यालय, आणि सर्व कार्यालय हे फक्त रविवारीच बंद असतात, तर त्यामागचं नेमकं कारण काय असतं ते आज पर्यंत बरेच जणांना माहीत नाही आहे.
तर चला आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत, की सात दिवसांच्या आठवड्यात फक्त रविवारीच सुट्टी का असते. आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे, यामागील कारण जाणून आपण अवाकच होणार.
रविवारीच सुट्टी का असते – Why Sunday is Holiday
https://www.youtube.com/watch?v=8StgIgQQopo
जगात बहुतांश ठिकाणी पृथ्वीवर ख्रिश्चन धर्मियांची उपस्थिती आहे, त्यांच्या धर्मात अशी धारणा आहे की जेव्हा देवाने जगाची निर्मिती केली तेव्हा निर्मितीमध्ये सहा दिवस लागले होते. आणि सहा दिवसाच्या निर्मितीमध्ये देवाने थकून सातव्या दिवशी विश्राम केला होता. म्हणून ख्रिश्चन धर्मियांनी या सातव्या दिवसाला आरामाचा दिवस म्हणून घोषित केले, आणि तो सातवा दिवस होता रविवार, तेव्हापासून या दिवसाला आरामाचा दिवस म्हणून घोषित करण्यात आले आणि प्रत्येक रविवारी सुट्टी देण्यात आली.
भारतात सुट्टीच्या या दिवसाची सुरुवात १८४३ पासून करण्यात आली होती, सर्वात आधी या गोष्टीची सुरुवात मुंबई येथे झाली होती, आणि त्यानंतर सर्व भारतात.
जगाच्या पाठीवर बहुतांश भागात इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित होते.
आणि त्यांनी त्यांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी या रविवारला सुट्टी ची घोषणा जाहीर केली.
आणि तेव्हापासून सर्वदूर रविवारला सुट्टी देण्याची गोष्ट लागू झाली.
मग ते कॉलेज असो शाळा की कार्यालये सर्व ठिकाणी रविवारला सुट्टी देण्याच्या कायदाच लागू झाला,
याच्या मागचे आणखी एक कारण असेही की जेव्हा व्यक्ती आठवड्यातील सहा दिवस कार्य करतो.
तेव्हा त्या सहा दिवसांचा आलेला ताण कमी करण्यासाठी सातवा दिवस म्हणजे रविवार त्या दिवशी सर्वांना सुट्टी देण्यात येते.
मग ते शाळेतील विद्यार्थी असोत की कॉलेजचे, आठवड्यातून एक दिवस सुट्टी प्रत्येकालाच मिळते.
आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करण्यासाठी सुध्दा आहे,
उदा. जसे सोमवार भगवान शंकराची उपासना करण्यासाठी, मंगळवार हनुमानजींची उपासना करण्यासाठी, मुस्लिम धर्मानुसार शुक्रवारला जुम्मा म्हणून साजरा करणे.
अश्या वेगवेगळ्या वारांची वेगवेगळी आवश्यकतेपर रचना केलेली आहे.
आशा करतो या लेखाच्या माध्यमातून आपल्याला माहिती झाले असेल की रविवारी सुट्टी का असते तर, आणि त्यामागचं कारण काय,
आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका,
आणि सोबतच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!