Airplane Mode in Mobile
बऱ्याच जणांचे विमानातून यात्रा करण्याचे स्वप्न असते,आणि काहींना तर प्रत्येक महिन्याला त्यांच्या कामानिमित्त विमानाचा प्रवास लाभतो, विमानाचा प्रवास करताना अनेक बाबींकडे लक्ष ठेवायला हवे, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही, आणि आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही.
त्यापैकी एक म्हणजे ऐरोप्लेन मोड, विमानाचा प्रवास आपल्यापैकी कोणी केला असेल तर आपल्याला माहीतच असेल की विमानात सुरुवातीलाच बऱ्याच अश्या सूचना दिल्या जातात ज्यामध्ये प्रत्येकाची सुरक्षा होऊ असते.
विमानातून प्रवास करताना मोबाईल ऐरोप्लेन मोडवर का ठेवावा? – Why Put Phone on Airplane Mode
मग आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की विमानात बसल्या नंतर आपल्या मोबाईलला एक तर बंद किंवा ऐरोप्लेन मोड वर लावण्याचे सांगितले जाते. तर चला पाहूया या मागचे नेमके काय कारण आहे. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की ऐरोप्लेन मोड असतो तरी काय आणि ते काय कार्य करत? ऐरोप्लेन मोड ला आणखी नावे आहेत जसे फ्लाईट मोड आणखी एक ते म्हणजे स्टँडअलोन मोड.
ऐरोप्लेन मोड हे मोबाईल किंवा लॅपटॉप च्या सेटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते,
या ऐरोप्लेन मोड च्या सहाय्याने आपण आपल्या मोबाईल ची बॅटरी वाचवू शकतो,
आपण जर आपला मोबाईल ऐरोप्लेन मोड वर ठेवला, तर आपल्या मोबाईल वर कोणत्याही प्रकारचे नेटवर्क येणार नाही.
विमानात ऐरोप्लेन मोड का सुरू करतात – Why Airplane Mode Use in Flight
आता पाहूया की विमानात बसल्यावर ऐरोप्लेन मोड का सुरू करावा लागतो, तर त्यामागे सुध्दा एक शास्त्रीय कारण आहे, आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा आपल्याला सूचना मिळते की आपल्या मोबाइल को एयरप्लेन मोड वर ठेवा किंवा बंद करा.
त्यामागे कारण असे की जेव्हा आपला मोबाईल सुरू असतो तेव्हा तो आपल्या आजूबाजूला असलेल्या टॉवर्स वरून नेटवर्क घेत असतो,
आणि जेव्हा विमान हवेत असतं तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने आपला मोबाईल नेटवर्क शोधण्याचे प्रयत्न करतो,
परंतु त्याला ते सापडत नाही आणि आपला मोबाइल बुस्टिंग चे कार्य सुरू करतो, त्यामुळे विमानाच्या सेंसर आणि नेव्हिगेशन सिस्टीम मध्ये समस्या आणू शकतो.
आणि विमान क्रॅश होण्याची सुध्दा संभाव्यता असते.
पण आता तंत्रज्ञान पुढे गेल्याने क्रॅश होण्याची संभाव्यता येत नाही.
मोबाईल ऐरोप्लेन मोडवर कसा करायचा – How to Turn off Airplane mode on Phone
आता आपल्याला विचार पडला असेल की ऐरोप्लेन मोड कसा सुरू करावा.
तर त्याचेही उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे, तर चला पाहूया.
आपल्या मोबाइल मध्ये सेटिंग वर क्लिक करावे,
त्यानंतर आपल्याला ऐरोप्लेन मोड चे बटन दिसेल त्यावर क्लिक करून आपण त्याला सुरू करू शकता, आणि बंद ही करू शकता.
तर ही होती एक महत्वपूर्ण माहिती या लेखात आपण पाहिले की काय कारण असते विमानात ऐरोप्लेन मोड सुरू करण्यामागे, आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असेल, तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच याच प्रकारच्या नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!