Indian Cricket Team Uniform
आपल्या भारतामध्ये लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत क्रिकेटचा एक वेगळाच छंद आहे,
जरीही आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरीही क्रिकेट प्रेमी कमी नाहीत,
लहानपणी प्रत्येकाला एक तर क्रिकेट पटू व्हायचं असत किंवा कोणत्या तरी सिनेमाचा हिरो.
कारण लहानपणा पासूनच क्रिकेट आणि सिनेमांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. क्रिकेट खेळाला भारतात एवढी पसंती आहे की जर भारतात कुठेही क्रिकेटचा सामना असेल तर तेथील तिकिटांची बुकिंग ही जवळ जवळ एका आठवड्या आधी झालेली असते.
यावरून आपण समजू शकता क्रिकेट खेळाला भारतात किती पसंती आहे. आणि त्यामध्ये सर्वांची लाडकी म्हणजेच आपली भारतीय टीम जी आजच्या युगात सर्व जगात भारताच्या नावाचा गजर ऐकवत आहे, त्याच भारतीय टीम विषयी आजच्या लेखात आपण काही विश्लेषण पाहणार आहोत, की भारतीय संघाच्या जर्शी चा रंग हा निळा का आहे?
भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का बरं – Why is the Indian Cricket Jersey Blue in Colour
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले होते, पाकिस्तान हा अश्या देशांच्या यादीत येतो जो एका धर्माच्या नावावर वेगळा झाला आहे. पाकिस्तान मध्ये मुस्लिम धर्माला प्राधान्य आहे. आणि मुस्लिम धर्मात हिरव्या रंगाला मानल्या जाते, हिरव्या रंगाला मुस्लिम धर्मात जन्नत चे प्रतीक मानल्या जाते, म्हणून पाकिस्तान सारख्या देशाच्या क्रिकेट संघाच्या जर्शीचा रंग हिरवा आहे.
त्याप्रमाणेच भारताच्या जर्शीचा रंग हा निळा या साठी आहे
कारण भारत हा धर्म निरीपेक्षक देश आहे इथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात,
आणि प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त झालेला आहे, निळा रंग हा धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतीक आहे.
आणि येथे कोणत्याही एका धर्माला महत्व न देता, राष्ट्राला महत्व दिल्या जाते, म्हणून भारतीय संघाच्या जर्शीचा रंग हा निळा आहे.
आपल्याला आता माहीत झाले असेल की का भारतीय संघाच्या जर्शी चा रंग हा निळा असतो, तर आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank you So Much And Keep Loving Us!