Cancer Hair Loss
कँसर विषयी तर प्रत्येकालाच माहीती असेल की कँसर ही एक गंभीर बिमारी आहे, ज्या व्यक्तीला कँसर होतो त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो, कँसर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होय, शरीरातील एखाद्या अवयवाच्या पेशींचे अनियंत्रित रित्या वाढ होणे म्हणजेच कँसर होय. आणि बऱ्याच कँसर झालेल्या रुग्णांना आपण पाहिले असेल की त्यांचे केस हे कापल्या गेलेले असतात. आणि त्यांचं टक्कल केल्या जात, किंवा टक्कल पडते.
आपल्या मनातही हा प्रश्न उभा राहिला असेल की नेमकं काय कारण असेल की कँसर च्या रुग्णांचे टक्कल पडते किंवा करावे लागते. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की कँसर झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यावरील केस का कापल्या जातात? किंवा त्यांचं टक्कल का पडते? चला तर जाणून घेऊया.
कँसर झाल्यामुळे डोक्यावरील केस का जातात – Why Cancer Patients Lose Hair in Marathi
आपल्याला आठवत असेल की बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना कँसर चा सामना करावा लागला आणि सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो सुध्दा वायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांचे टक्कल केलेले होते. त्यांनाच नाही तर कँसर झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या समस्येला सामोरे जावे लागते, त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.
कँसर झालेल्या रुग्णांना भारी इंजेक्शन तसेच भारी औषधांचे सेवन करावे लागत असते. आणि कधी कधी या औषधांचा आणि इंजेक्शनांचा रुग्णावर साईड इफेक्ट होतो. आणि या साईड इफेक्ट मुळेच केसांवर अति प्रभाव पडतो आणि त्यांचे केस गळतात. काही व्यक्तींचे केस हे हळूहळू गळतात म्हणजेच काहींचे टक्कल पडण्यास कमी दिवस लागतात तर काहींवर ह्याचा अतिप्रभाव होऊन कमी वेळातच त्यांचे टक्कल पडते.
कँसर च्या रुग्णावर उपचार करत असताना त्यांच्या शरीरात झालेली पेशींची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी तसेच त्या पेशींना नष्ट करण्यासाठी केमोथेरपी नावाचा उपचार केला जातो हा उपचारामध्ये भारी केमिकल वापरल्यामुळे ते केमिकल सुध्दा रुग्णाच्या केसांवर परिणाम होतो आणि रुग्णाचे केस गळतात.
त्यासोबतच आणखी एक कारण असं आहे की रुग्णाच्या केसांमुळे संक्रमण जास्त पसरू नये त्यासाठी सुध्दा रुग्णाचे केस कापल्या जातात, आणि त्यामुळे संक्रमण कमी होण्यास मदत मिळते.
म्हणून कँसर झालेल्या रुग्णाचे केस कापल्या जातात किंवा टक्कल केल्या जाते. जेणेकरून त्यांचं संक्रमण पसरू नये, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल हा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!