Pranyanche Dole Ratri ka Chamaktat
अंधारात रात्री आपण एखाद्या वेळेस अनुभव घेतला असेल, की मांजर किंवा कुत्रा यांच्या सारख्या पाळीव प्राण्यांचे रात्री डोळे का चमकतात,
पाळीव प्राणी च नाही तर जंगली प्राणी चित्ता आणि वाघ यांच्यासारख्या प्राण्यांचे सुध्दा डोळे रात्री चमकताना दिसतात.
जवळ जवळ सगळ्या प्राण्यांचे डोळे आपल्याला रात्री चमकताना दिसतात, पण यामागे काय रहस्य असेल?
प्राण्यांना काही वरदान प्राप्त असेल का त्यामुळे त्यांचे डोळे आपल्याला रात्री चमकताना दिसतात,
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की नेमकं यामागचं कारण काय असेल कारण प्रत्येकाने रात्री हा अनुभव घेतला असेलच.
तर चला पाहूया आजच्या या लेखात कशामुळे प्राण्यांचे डोळे रात्री चमकताना दिसतात.
सर्वात आधी आपल्याला सांगू इच्छितो की ह्यामागे कोणतेही वरदान किंवा आणखी काही नाही, यामागे शुद्ध वैज्ञानिक कारण आहे. तर चला पाहूया.
प्राण्यांचे डोळे अंधारात का चमकतात – Why Animals Eyes Shine at Night
ज्या प्राण्यांचे डोळे रात्री चमकताना दिसतात त्या प्राण्यांच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ असतो जो प्रकाशाला परावर्तित करण्याचे कार्य करत असतो,
एखाद्या प्राण्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला तर त्या प्राण्याचे डोळे त्या प्रकाशाला परावर्तित करतात,
आणि आपल्याला असा भास होतो की त्या प्राण्याचे डोळे चमकत आहेत.
आपल्याला सोप्या भाषेत समजावायचे असेल तर आपल्या घरातील आरश्यावर आपण जर प्रकाश पाडला तर तो आरसा त्या प्रकाशाला ज्याप्रमाणे परावर्तित करतो,
त्याचप्रमाणे प्रकाशाचे परावर्तन घडून येते तसेच रात्री जेव्हा प्राण्यांच्या डोळ्यावर प्रकाश पडतो
तेव्हा त्यांच्या डोळ्यात असलेला क्रिस्टलाईन नावाचा पदार्थ त्या प्रकाशाला परावर्तित करण्याचे काम करत असतो.
आपण रात्री अंधारात मांजराच्या डोळ्यांवर उजेड मारला किंवा प्रकाश चमकवला तर मांजराच्या डोळ्याच्या पडद्याच्या मागच्या बाजूला असणारी ल्युमिनियस टॅपेटम ची प्रत प्रकाशाला परावर्तित करण्याचे कार्य करते.
त्यामुळे मांजराचे डोळे सुध्दा रात्री प्रकाश मारल्यावर चमकताना दिसतात. आणि याच गोष्टीचा फायदा प्राण्यांना कमी उजेडात पाहण्याकरिता सुध्दा होतो.
आपण बरेचदा बघितलं असेल की प्रत्येक प्राण्याच्या चमकणाऱ्या डोळ्याचा रंग हा वेगवेगळा असतो, तर आपण बरोबरच पाहिलं आहे.
आणि ज्या प्राण्यांच्या डोळ्याच्या रक्ताच्या वाहिन्या ह्या जास्त असतात त्यांच्या डोळ्यांचा रंग आपल्याला रात्री लाल दिसतो.
तर हे होते रात्री प्राण्यांचे डोळे चमकण्याचे कारण तर आशा करतो आपल्याला हा लिहिलेला छोटासा लेख आवडला असेल हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.
Thank You So Much And Keep Loving Us!