Earth Revolves Around Sun
या ब्रह्मांडात लाखो-करोडो ग्रह तारे आहेत. आणि त्यापैकी एक म्हणजे आपली पृथ्वी आहे. प्रत्येकाला माहिती आहे आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे. बिग बँग थेअरी विषयी प्रत्येक जण चांगल्या प्रकारे जाणून आहे. आणि त्या बिग बँग थेअरी नंतरच आपल्या सुर्यमालेची निर्मिती झाली. त्यानंतर संपूर्ण ग्रह तारे यांचा शोध लागला. पण ज्या काळात कोणत्याही प्रकारच्या दुर्बीण किंवा आणखी काही वस्तूंचा शोध लागला नव्हता तेव्हा एका वैज्ञानिका ने लोकांना सांगितले होते. की पृथ्वीच्या बाहेरही जग आहे.
अश्या प्रकारच्या काही गोष्टी त्या काळात सांगितल्याने लोकांनां विश्वास बसत नव्हता. आणि लोक त्यांना पागल ही संबोधू लागली होती. तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वात आधी या गोष्टीला लोकांसमोर ठेवले की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार, तर चला पाहूया..
या वैज्ञानिकाने सांगितल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते – Who Discovered that the Earth Revolves Around the Sun
मागील काळात जेव्हा तंत्रज्ञान एवढे विकसित झालेले नव्हते आणि लोकांना सूर्याच्या सावली वरून कळत होते, की काय वेळ झाली. आणि तेव्हा एका वैज्ञानिकाने लोकांना हे सांगितले की सूर्य हा आपल्या पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरल्याने दिवस आणि रात्र होतात. पण तेव्हा लोक मानायला तयार नव्हते, तेव्हाचे लोक म्हणत पण डोळ्याने तर आपल्याला दररोज सूर्य पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे जाताना दिसतो.
आणि जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असती तर आपल्याला दिसली असती. असे अनेक प्रश्न तेव्हाच्या लोकांना पडत आणि आणखी ते हे सुध्दा म्हणत होते की पृथ्वी गोल आहे आणि ती जर सुर्याभोवती फिरली तर मग आपण खाली का नाही पडत. पण त्यांना कुठे माहीत होतं की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण असल्याने आपण पृथ्वीवर स्थिर राहू शकतो.
पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते असे कोणी म्हटले होते? – Nicolaus Copernicus Discovered that the Earth Revolves Around the Sun
निकोलस कोपरनिकस या वैज्ञानिकाने अनेक वर्षांच्या मेहनती नंतर इसवी सन १५३० मध्ये एक आविष्कार लोकांसमोर मांडला की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सुर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीला सूर्याचा एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी ३६५ दिवसांचा कालावधी लागतो. आणि विशेष म्हणजे तेव्हा दुर्बिण चा शोध सुध्दा लागलेला नव्हता. आणि लोकांनी त्यांच्या या विचाराला मानण्यास नकार दिला. आणि त्यांचा विरोध केला की ह्या सर्व अश्यक्य गोष्टी आहेत.
पण त्याच्या काही वर्षानंतर गॅलिलिओ नावाच्या वैज्ञानिकाने दुर्बिण चा शोध लावला. आणि तेव्हा हे सिध्द झाले की खरोखर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आणि त्यामुळेच दिवस रात्र होतात. तेव्हा लोकांच्या लक्षात आले की हे तर बरेच वर्षाअगोदर निकोलस कोपरनिकस या वैज्ञानिकाने सांगितले होते. तेव्हा लोकांना विश्वास झाला. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात. आणि पृथ्वीचे स्वतः भोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन असे म्हणतात.
वरील लेखामध्ये आपण पाहिले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वात आधी कोणी सांगितले होते? तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!