Wheat in Marathi
गहू ही धान्य आपल्या सर्वांच्याच ओळखीचे आहे. गहू हा एक महत्वपूर्ण तृणधान्य आहे. आपल्या रोजच्याच आहारात त्याचा वापर होतो. गव्हाचा अनेक प्रकारे वापर केला जातो जसे की पोळी, पुऱ्या, तसेच पराठे असे अनेक प्रकारचे पदार्थ बनविले जातात. यामध्ये अनेक प्रकारच्या पोषण मूल्यांचा समावेश होतो. आणि तो आपण समोर पहाणारच आहे. अश्या प्रकारे गव्हाविषयीची सर्वत्र माहिती आपण समोर पाहणार आहोत.
गव्हाची माहिती आणि फ़ायदे – Wheat Information in Marathi
गव्हाची थोडक्यात माहिती – Gavachi Mahiti
गव्हाचे विविध नाव : | सिहोर, लोकवन, कल्याण, सोनालिका, डोगरी, आणि सोना |
शास्त्रीय नाव : | ट्रिटिकम एस्टीवम |
धाण्याचे प्रकार: | तृणधान्य |
हंगाम : | रब्बी |
गव्हाचे उत्पादन : | पंजाब व मध्यप्रदेश |
गव्हाचे असणारी पोषक तत्वे: | १२ ते १४% प्रथिने, ६७ ते ६९% कार्बोहायड्रेटस आणि अगदी थोड्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ |
गव्हाची लागवड – Gahu Lagwad
सर्व तृणधान्यांचा विचार केला की लक्षात येते की, सर्व जगामध्ये विविध उत्तम चवीचे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत लोकप्रिय आणि वैशिष्ट्यपूर्ण तृणधान्य म्हणजे गहू हे आहे. गव्हापासून पुरी, फुलके, पोळी, कुलचा, पराठे, नान असे अनेक नाजुक पदार्थ तर बनू शकतातच पण बहुतेक देशांमध्ये याचा वापर पाव बनविण्यासाठी केला जातो.
पुरणपोळी, तीळ गुळपोळी, खव्याची पोळी, मांडे यासारखी नाजुक पदार्थ त्यापासून बनतात. तसेच त्यापासून वाढदिवसासाठी खास बनवला जाणारा केकही बनतो. आणि आणखी त्यापासून असंख्य प्रकारची बिस्किटे आणि शंकरपाळे, करंज्या, चिरोटे यासारखे पदार्थ त्यापासून बनविले जातात. आणखी पहिल तर मैदा, रवा, दलिया, कणिक अशा विविध रूपातून गव्हाचे अनेक पदार्थ बनविले जातात..
गव्हामधील गुणधर्म – Nutrition Facts Wheat Flour
गव्हामध्ये साधारण १२ ते १४% प्रथिने, ६७ ते ६९% कार्बोहायड्रेटस आणि अगदी थोड्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात. आपल्याला या आकडेवारीवरून ताबडतोब लक्षात येईल की गहू हा प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स या दोन्हीचा मोठा स्त्रोत आहे. गहू हा पोषणमूल्यांच्या दृष्टीने तो उत्तम आहेच. पण त्याचं वैशिष्ट्य अस आहे की पोळी फक्त गव्हापासूनच बनू शकते. ज्वारी, बाजरी नाचणी यापासून पोळी बनवू शकत नाही. या वैशिष्ट्याचं रहस्य दडतंय गव्हामधल्या प्रथिनात.
गव्हामध्ये ग्लायडिन व ग्लूटेनिन ही दोन प्रकारची प्रथिनं असतात. प्रथिनांची जडणघडण समजून घेताना आपण पाहिलचं आहे की प्रथिनं ही अमिनो आम्लांच्या साखळ्यांनी बनलेली असतात. ग्लायडिनचा साखळ्यांची गुंडाळी होऊन ते रेणू एकमेकांशी आणि तसेच ग्लूटेनिनच्यचा रेणूंशी कमजोर बंध तयार करतात.
ग्लूटेनिनचे रेणू मात्र एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे बंध निर्माण करून त्यापासून एक घट्ट विणलेलं लांब जाळं तयार करतात. ग्लूटेनिनच्या साखळीच्या टोकात गंधयुक्त अमीनो आम्ले असतात. की जी अतिशय मजबूत असे बंध एकमेकांशी निर्माण करू शकतात.
तसेच याउलट साखळीच्या मध्यात जी अमिनो आम्ले असतात ती कमजोर बंध निर्माण करतात. आणि त्यामुळे ग्लूटेनिनच्या साखळ्यांच्या टोकामध्ये मजबूत बंध निर्माण होऊन त्यापासून मोठ्या लांब साखळ्या तयार होतात.
गव्हाच्या पिठात स्टार्चच्या रेणूंवर प्रथिनांचा रेणू हा बसलेला असतो. आणि तो अत्यंत तहानलेला असतो. आपण जेव्हा पोळ्यांसाठी कणिक मळवितो तेव्हा गव्हाच्या पिठात पाणी मिसळलं की प्रथिनांचे रेणू पाणी शोषून घेतात. आणि प्रसरण पावून मोठे होतात, एकमेकाला चिकटतात आणि त्यापासून त्यांच्या साखळ्या तयार होऊ लागतात.
आणि या साखळ्यामुळे रेणूचं जे जाळं गव्हात तयार होतं त्यामुळे एक नवीन प्रथिन म्हणजे ग्लूटेन तयार होतं असत.
आणि पोळी उत्तम होणं हे पिठातील ग्लूटेनचं प्रमाण आणि त्याच्या जो जाळ्याचा पक्केपणा असतो यावर अवलंबून असतं.
गहू बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ about Wheat
1. गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ?
उत्तर : गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन भारतातील पंजाब व मध्यप्रदेश येथे होते.
2. गहू हा कोणत्या हंगामात पेरला जातो ?
उत्तर : गहू हा रब्बी हंगामात पेरला जातो.
3. गहू हा कोणकोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर : गहू हा सिहोर, लोकवन, कल्याण, सोनालिका, डोगरी, आणि सोना असे गव्हाचे विविध नावाने ओळखला जातो.
4. गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर : ट्रिटीकम एस्टिव्हम हे गव्हाचे शास्त्रीय नाव आहे.
5. गव्हामध्ये कोणकोणती पोषकमूल्य आहेत ?
उत्तर : गव्हामध्ये साधारण ६७ ते ६९% कार्बोहायड्रेटस, १२ ते १४% प्रथिने, आणि अगदी थोड्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ या पोषणमूल्याचा समावेश होतो.