What is Vastu Shastra
स्वतःचे घर म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न. घरात सुख आणि समृद्धी यावी यासाठी आपण वाट्टेल ते करत असतो. संपूर्ण कुटुंब आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. आपल्या घरी आनंद आणि सुख नांदावे या साठी खूप जन वास्तू शास्त्राचा आधार घेतात. आणि या आधारावर आपली वास्तू निर्माण करतात.
काय आहे वास्तू शास्त्र? – What is Vastu Shastra
वास्तू शास्त्र म्हणजे काय ? – Meaning of Vastu Shastra
वास्तू म्हणजे घर किंवा सदन आणि शास्त्र म्हणजे विज्ञान किंवा नियम. हिंदू कथा-पुराणांमध्ये वास्तूला खुप महत्व देण्यात आले आहे. वास्तू कोठे बांधावी ? वास्तूचा नकाशा कसा असावा ? वास्तूमध्ये कुठल्या दिशेला काय असावे ? या सर्व गोष्टींबद्दल वास्तू शास्त्रामध्ये माहिती उपलब्ध आहे. वास्तू शास्त्र म्हणजे आठ दिशा आणि पाच पंचमहाभूत यांच्याबद्दलचे शास्त्र. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश.
आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टी ह्या दिशा आणि पंचमहाभूतांवर अवलंबून असतात. ही महाभूते सुख आणि शांतीला आकर्षित करत असतात. वास्तूमध्ये सुख आणि समृद्धीसाठी काही विशिष्ट दिशांना विशिष्ट बांधकाम करावे लागते. जागेच्या आकारापासून तर स्वयंपाकघर कुठल्या दिशेला असावे, शयनकक्ष कुठल्या दिशेला असावे, घरात कुठल्या गोष्टी असाव्यात आणि कुठल्या नाही या सर्व गोष्टींची इत्तंभूत माहिती या शास्त्रामध्ये दिलेली आहे.
वास्तू शास्त्राचा जन्म भारतात झालेला आहे. वास्तू शास्त्रामध्ये आपली संस्कृती, परंपरा, भौतिक घटक आणि ग्रहांचादेखील समावेश आहे. पुरातन काळापासून तर आजही बहुतेक लोक वास्तू शास्त्रानुसारच आपल्या वास्तूचे निर्माण करतात. नवीन घर घेतांना देखील आधी ते घर वास्तूच्या नियमांनुसार बांधलेले आहे कि नाही हे बघितल्या जाते.
हे शास्त्र केवळ घराच्या बांधकामापुरतेच मर्यादित नसून घरामध्ये सकारात्मक उर्जा यावी यासाठी सुद्धा मदतपूर्ण ठरते.
वास्तू शास्त्रातील काही महत्वाचे घटक – Five Elements of Vastu Shastra
- पृथ्वी (Earth),
- पाणी (Water),
- हवा (Air),
- अग्नी (Fire),
- आकाश (Space)
वास्तू शास्त्रामध्ये हे घटक सोडून अजुनही काही महत्वाचे घटकांचा समावेश आहे त पुढे पाहू:
दिशा : या शास्त्रामध्ये कुठल्या दिशेला काय असावे हे सांगितले जाते. शिवाय वास्तूचा मुख्य प्रवेश कुठल्या दिशेला असावा आणि वास्तूमध्ये कुठल्या दिशेला कशाची निर्मिती करावी हे देखील सांगितलेले आहे.
जागेची निवड : आपल्याला कुठल्या वास्तूची निर्मिती करायची आहे या साठी विशिष्ट जागेची निवड केली जाते. या जागेचा आकार, सभोवतालचे वातावरण इ. गोष्टी बघितल्या जातात.
बांधकामाचे मोजमाप : वास्तूच्या निर्मितीचे मोजमाप कसे असावे हे वास्तू शास्त्राच्या नियमांमध्ये आहे.
वास्तूच्या आतील सजावट : वास्तू मध्ये कुठल्या गोष्टी असाव्यात आणि कुठल्या नाही हे देखील या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे.
मुहूर्त : हिंदू संस्कृतीतील काही पवित्र मुहूर्त आहेत. या मुहुर्तांना खूप महत्व असते. तसेच वास्तूच्या निर्मितीपासून ते वास्तूमध्ये केव्हा प्रवेश करावा याचे सर्व मुहूर्त शास्त्रामध्ये दिलेले आहेत.
वास्तू शास्त्राद्वारे घडून येणारे परिणाम – Effects of Vastu Shastra
- वास्तूमध्ये सुख आणि शांती निवास करते.
- वास्तूमधील व्यक्तींना चांगले आरोग्य लाभते.
- प्रत्येक गोष्टींमध्ये यश मिळते.
- वास्तूमध्ये सकारात्मकता येते.
- नातेसंबंध घट्ट होतात व टिकून राहतात.
- वास्तूमध्ये आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे वातावरण राहते.
वरील सर्व गोष्टी ह्या वास्तुशास्त्राचा भाग आहेत. यांशिवाय आणखीही काही लहान-मोठे नियम या शास्त्रामध्ये दिलेले आहेत.
वास्तुशास्त्राबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Vastu Shastra Questions Answers
१. वास्तू शास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो ?
उत्तर: वास्तू शास्त्रामध्ये वास्तूची दिशा, जागा, मोजमाप, आतील सजावट, निर्मितीचे आणि प्रवेशाचे मुहूर्त इ. सर्व बाबींचा समावेश होतो.
२. वास्तू शास्त्र म्हणजे काय ?
उत्तर: वास्तू म्हणजे घर, सदन किंवा कुठल्याही प्रकारची निर्मिती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान किंवा नियम. एकंदरीत वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूच्या संबंधित संपूर्ण माहिती.
३. वास्तूशास्त्र खरचं प्रभावी आहे का ?
उत्तर : होय हे शास्त्र प्रभावी आहे. पण याचे खरे उत्तर हे आपल्या मान्यतेवर आहे.
४. ‘वास्तू पुरुष’ म्हणजे काय ?
उत्तर: ‘वास्तू पुरुष’ म्हणजे निर्मितीची देवता.
५. प्रत्येक निर्मितीसाठी वास्तुशास्त्र आवश्यक आहे का ?
उत्तर : नाही, परंतू वास्तूमध्ये सुख आणि समृद्धी साठी वास्तुशास्त्राची गरज असते.