What is the Meaning of India
आपण ज्या देशाचे रहिवासी आहोत, ज्या देशात आपलं वास्तव्य आहे त्या देशाविषयीची माहिती आपल्याला असणं हे आपलं कर्तव्य आहे.
परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा नसेल की आपल्या देशाचे अधिकृत नाव काय आहे आणि ते का देण्यात आले ?
आता तुम्ही म्हणाल यात इतका विचार करण्यासारखं काय आहे ? आपल्या देशाचं नाव भारत असून त्याला इंग्रजीत India असं सुरेख नाव आहे.
आणि याची खात्री करायचीच म्हंटली तर सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये आपल्याला भारत सरकार आणि इंग्लिश मध्ये India असे लिहिलेले आढळून येते.
संविधानात देखील याचा भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही याला कोणत्याही नावाने ओळखले तरीही अधिकृतरीत्या या देशाचे नाव भारत हेच आहे.
आपल्या या भारताला हिंदुस्थान, आर्यावर्त, जम्बूद्वीप, या नावांनी देखील ओळखले जाते. परंतु परंपरागत वारसा या कारणाने संविधानात देखील या देशाचे नांव भारत असे ठेवण्यात आले.
पण तुम्हाला हे माहिती आहे का कि आपल्या या देशाला भारत हे नाव कसे मिळाले ? आणि इंग्लिश मध्ये भारताला India असे का म्हणतात ?
आपल्या देशाचे नाव भारत कसे पडले ? माहितीये तुम्हाला ? – What is the Meaning of India
आपल्या देशाला भारत हे नांव कसे मिळाले ? What is the Meaning of India
तसे पहाता भारताला भारत हे नाव कसे मिळाले याविषयी दोन कथा प्रसिद्ध आहेत. काही जाणकारांच्या मते चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांचा मुलगा भरत ! याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे संबोधल्या जाते.
ऋग्वेदानुसार भारताचे नाव सूर्यवंशी राजा भरताच्या नावावरून पडले आहे. ऋग्वेदाची व्याख्या करणाऱ्या वेदाभ्यासकांच्या मते मनूवंशज ऋषभदेवांचे दोन पुत्र होते भरत आणि बाहुबली ! बाहुबलीच्या वैराग्य प्राप्तीनंतर भरताला चक्रवर्ती सम्राट बनविण्यात आले.
आणि तेंव्हापासून आपल्या देशाला भारतवर्ष असे म्हंटल्या जाऊ लागले. आणि भरताचे सर्व वंशज आणि या देशातील मूळ रहिवाश्यांना भारती असे म्हंटल्या गेले.
आणि बहुदा यामुळेच कौरव आणि पांडवांच्यात झालेल्या युद्धाला महाभारत असे संबोधल्या गेले असावे. कारण महाभारताची समीक्षा करणाऱ्यांच्या मते महाभारताचे युद्ध भारतीयांच्या हक्काकरता लढल्या गेल्याने त्याला महाभारताचे युद्ध हे नाव देण्यात आले.
भारताला India कधीपासून म्हंटल्या जाऊ लागले ?
भारताला इंग्लिशमध्ये India असे का म्हणतात याचे विशेष असे उत्तर देता येत नाही, परंतु ब्रिटिशांनी India हे नाव भारताला दिल्याने कदाचित आपण तोच प्रघात पुढे सुरु ठेवला असावा. India या शब्दाची उत्पत्ती सिंधू या शब्दातून झाली आहे. हा शब्द प्रथम युनानिंनी प्रचलित केला होता.
या शिवाय भारताला हिंदुस्थान आणि आर्यावर्त देखील म्हंटल्या जातं.
हिंदुस्तान किंवा आर्यावर्त या नावांना अधिकृतरित्या का स्वीकारण्यात आले नाही ?
भारत आणि India या नावांना अधिकृत रित्या स्वीकारण्यात आलंय.
प्रत्येक सरकारी दस्तऐवज, सरकारी कार्यालयांवर आपल्या देशाचे नाव भारत आणि इंग्रजीत India असे लिहिलेले आढळते.
तसे पहाता भारताला हिंदुस्तान म्हणून देखील ओळखले जाते.
परंतु संविधानात या शब्दाला स्वीकृती देण्यात आली नाही.
कारण हा शब्द विशिष्ट धर्मातील लोकांचे प्रतिनिधित्व करतो आणि भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.
आपल्या देशाला आपण भारत, India, किंवा हिंदुस्तान काहीही म्हंटले तरी देशाप्रती सगळ्यांची भावना ही एकसमान असावयास हवी …नाही का !!!