Strange Laws in the World
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आवश्यक ते अधिकार दिले आहेत ज्यांच्या आधारावर आपण योग्य जीवन जगू शकतो. आपल्या देशात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही नियम तयार केले गेले आहेत आणि या नियमांच्या आधारावर सरकार लोकांची सुरक्षा करते.
जसे ट्राफिक चे नियम, त्यांनतर एका सभ्य नागरिकाची वागणूक कशी असावी हे सुध्दा परंतु जगाच्या पाठीवर काही असेही देश आहेत जेथे जगापेक्षा खूप आगळे वेगळे नियमांचे पालन करावे लागते, आणि आजच्या लेखात आपण ह्यापैकी काही अनोखे नियम पाहणार आहोत. ज्या नियमांना वाचून आपण थक्क होऊन जाणार. तर चला पाहूया जगातील आश्चर्य चकित करणारे नियम.
जगातील अनोखे नियम – Weird Laws From Around the World
१) नेहमी हसण्यासाठी नियम – Rules for Smile
सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेतच, मनुष्य कधी हसतो तर कधी रडतो पण तुम्हाला म्हटले की नेहमी खुश आणि हसत राहणे आवश्यक आहे तर यावर आपले काय मत असणार हमखास आपल्याला हा नियम आवडणार नाही, पण इटली च्या मिलान नावाच्या शहरात यावर एक नियम बनलेला आहे या नियमात आपल्याला नेहमी हसणे आवश्यक आहे, या नियमात काही सूट सुध्दा मिळाल्या आहेत.
त्या सूट अश्या की जेव्हा कोणाची मृत्यू झाली ते त्या ठिकाणी आपल्याला या नियमाचे पालन करणे आवश्यक नाही. आणि दुसरे ठिकाण म्हणजे हॉस्पिटल. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये असणार तेव्हा सुध्दा या नियमाचे पालन करणे गरजेचे नाही, परंतु या व्यतिरिक्त तेथील नागरिकांना या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा या नियमांचे उल्लंघन म्हणून तेथील नागरिकांजवळून दंड वसूल केला जातो.
२) घरातील लाईट बदलण्यासाठी नियम – Rules for Replacing Indoor Lights
जेव्हा आपल्या घरातील लाईट मध्ये काही बिघाड येते तेव्हा आपण लगेच एक नवीन लाईट विकत घेऊन घरात लावून देतो, घरातच नाही तर ऑफिस मध्ये किंवा एखाद्या कोणत्याही ठिकाणी जेथे आपला दिवसाचा संपर्क येतो. आपण एवढ्या छोट्या कामासाठी कोणत्याही इलेक्ट्रिशन ची वाट न पाहता आपण हे काम करतो, पण ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया येथे या विषयी एक नवीन नियम पाहायला मिळतो.
ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती लाईट बदलु शकत नाही, येथे तीच व्यक्ती लाईट बदलवू शकते ज्या व्यक्तीजवळ याचे लायसन्स आहे. आणि या लायसन्स साठी आपण एक उच्चशिक्षीत इलेक्ट्रिशन असणे गरजेचे आहे. आणि जर आपण या नियमाचे पालन केले नाही तर आपल्याला या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ५०० रुपयांचा दंड भरावा लागतो. ऑस्ट्रेलिया च्या चलनानुसार १० ऑस्ट्रेलियन डॉलर.
३) टॉयलेट मध्ये फ्लश करण्याविषयी नियम – Rules for Flushing the Toilet
शौचालयाला गेल्यानंतर त्यामध्ये फ्लश करणे आवश्यक असते,आणि प्रत्येक व्यक्ती करतोही, परंतु स्विझरलँड देशात रात्री १० वाजता नंतर कोणालाही टॉयलेटमध्ये फ्लश करण्याची परवानगी नाही आहे. तेथील सरकारचे असे मानणे आहे की यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि ते होऊ नये यासाठी हा नियम बनविण्यात आलेला आहे. तेथील नागरिकांना या नियमाचे पालन करावेच लागते.
४) गाडी मध्ये पेट्रोल साठी नियम – Rules for Petrol
आपल्या गाडीतील पेट्रोल संपले तर आपण पेट्रोल पंप पर्यंतर काहीही करून गाडीला ढकलत घेऊन जातो. आणि पेट्रोल भरून घेतो, आपल्या गाडीत पेट्रोल ठेवण्याची कोणतीही मर्यादा अजून तरी भारतात आलेली नाही, पण हेच जर आपण जर्मनी मध्ये राहता तर आपल्याला आपल्या गाडीमध्ये पेट्रोल चे टँक भरलेलं ठेवणे आवश्यक आहे, कारण गाडीला ढकलत घेऊन जाणे हा या देशात एक प्रकारे गुन्हा मानल्या जातो.
कारण वाहना सोबत पायी चालण्यामुळे बाकी लोकांचे लक्ष वाहन चालविण्यात एकाग्र राहत नाही आणि त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे या नियमाला लागू केले आहे. आणि या नियमाचे पालन न केल्यास तेथील नागरिकांना ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.
५) जाडे होण्याविषयी नियम – Rules of Fitness
जगात कोणत्याही देशात आपण गेलात तर आपल्याला शरीराने जाडे लोक पाहायला मिळतील, पण काही देशात जाडे असणे म्हणजे गुन्हा मानल्या जातो, हो जपान मध्ये आपली शरीरयष्टी शासनाने ठरवून दिलेल्या वजनात असणे आवश्यक आहे. यामागे सरकार ने लोकांचे हित पाहिल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला एखादा मोठा आजार होण्याची संभावना खूप कमी असते. २००९ च्या या नियमानुसार ४० वर्षा पेक्षा जास्त असलेल्या पुरुषांची कंबर ही ३१ इंचापेक्षा जास्त नको, आणि स्त्रियांची ३५ इंचापेक्षा जास्त नको.
वरील लेखात आपण पाहिले की जगात कश्या प्रकारे वेगवेगळे नियम लागू आहेत, आणि त्यांचे पालन न केल्यास तेथील नागरिकांना दंड भरावा लागतो. तर आशा करतो वरील लेखात लिहिलेली माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!