Weight of Soul
जीवन एका रेल्वेप्रमाणे आहे हि रेल्वे आशेच्या रुळावरून सुख दुखःचे स्टेशन घेत निराशेचा धूर सोडत असते, आणि हि रेल्वे सर्वात शेवटच्या स्टेशन वर जाऊन थांबते. ते स्टेशन म्हणजे मृत्यू. मी हे कुठे तरी वाचले होते खूपच चांगल्या प्रमाणे कमी शब्दात जीवनाविषयी बोलून गेल कोणीतरी.
या जगात ज्या गोष्टीचा जन्म होतो त्या गोष्टीचा अंत हा ठरलेलाच आहे. मग ती वस्तू असो कि प्राणी. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चितच आहे. पण मेल्यावर माणसाच्या शरीरात असे कोणते बदल घडतात यावर काही शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचे ठरविले होते,
तर आजच्या लेखात आपण या केलेल्या प्रयोगाविषयी पाहणार आहोत, कि नेमका हा प्रयोग कोणी आणि कसा केला होता, आणि या प्रयोगात त्यांना काय मिळाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत, तर चला पाहूया.
शरीरातील आत्म्याचे वजन २१ ग्रॅम, हा दावा करणारा एक प्रयोग – Weight of Soul
आत्म्याचा आणि वजनाचा नेमका विषय काय आहे?
आत्म्याचा आणि वजनाचा विषय असा आहे कि १९०७ मध्ये “न्यूयॉर्क टाइम्स” च्या वृत्तपत्रात एक लेख लिहून आला होता, जो आत्म्याच्या विषयी होता, ज्या लेखात एका डॉक्टर ने आत्म्याच्या वजनाविषयी केलेल्या दाव्याबद्दल लिहिलेले होते.
या लेखात डॉक्टर डंकन मैकडॉगल यांचा उल्लेख केलेला होता ज्यांनी आत्म्याच्या वजनाचा दावा केला होता. डॉक्टर डंकन हे हेव्हरहिल शहरातील चैरिटेबल हॉस्पिटल येथे फिजिशियन होते. ते वयाच्या विसाव्या वर्षी अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स शहरात आले, आणि ह्यूस्टन यूनिवर्सिटी मधून आपले स्कूल ऑफ मेडिसिन चे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी हेव्हरहिल शहरातील चैरिटेबल हॉस्पिटल मध्ये आपली पुढील सेवा देण्याचे ठरविले आणि बऱ्याच रुग्णांचा उपचार त्यांनी त्या हॉस्पिटल मध्ये केला. डॉक्टर डंकन ज्या हॉस्पिटल मध्ये कामाला होते त्या हॉस्पिटल चा मालकाचा व्यवसाय हा जास्त करून चीन मध्ये होत होता त्यामुळे त्या मालकाने चीन मधून एक तराजू आणला होता त्याचे नाव होते फ़ेयरबैंक्स.
हा तराजू चीन मध्ये बनविल्या गेलेला होता आणि या तराजूची एक विशेषता म्हणजे हा तराजू कोणत्याही वस्तूचे माप सटीक प्रमाणात घेत होता.
डॉक्टर डंकन हे ज्या हॉस्पिटल मध्ये कामाला होते त्या हॉस्पिटल मध्ये दिवसाला बऱ्याच लोकांना त्यांनी मरताना पाहिले होते. यावरून त्यांना एक दिवस माणसाच्या आत्म्याचे वजन मापण्याचा विचार आला. आणि त्यांनी ठरविले कि त्यासाठी एका खूप हलकी फ्रेम असलेल्या वजनाचा एक बेड बनविला आणि त्या बेड ला त्यांनी त्या वजनाच्या तराजूवर बसविला, सोबतच त्यांनी या गोष्टीची सुद्धा काळजी घेतली कि छोट्यातल्या छोट्या वजनाचा बदल त्या तराजूत दिसायला हवा.
हॉस्पिटल मधील सिरीयस असणाऱ्या रुग्णांना त्या बेड वर झोपवल्या जात असे. ज्यांची जगण्याची आशा कमी असायची, त्या रुग्णाच्या शरीरात होणारे बदल डॉक्टर डंकन आणि त्यांची टीम पाहत होती. हा प्रयोग त्यांनी ५ व्यक्तींवर करून पहिला,
त्यामध्ये ४ पुरुष आणि १ स्त्री होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू होत होती तेव्हा रुग्णाच्या वजनात अचानक एक बदल पाहायला मिळत होता आणि हा बदल होता तो २१ ग्रॅम वजनाचा. तोही सर्वच रुग्णांमध्ये सारखाच.
यावर डॉक्टर डंकन यांचे असे म्हणणे होते कि जेव्हा शरीर काम करणे बंद करते तेव्हा शरीराच्या वजनात एक बदल पाहायला मिळतो जसे शरीरातून काहीतरी बाहेर पडले. डॉक्टर डंकन यांनी हा प्रयोग १५ कुत्र्यांवर केला, तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. तर त्यांचे असे मत होते कि कुत्र्यांमध्ये कोणतीही आत्मा नसते.
तर हा प्रयोग समोर डंकन प्रयोग म्हणून ओळखल्या जाऊ लागला. तेव्हापासून बरेच लोक मानायला लागले कि आत्म्याचे वजन हे २१ ग्रॅम असते.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच मजेदार आणि माहितीपर लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!