Waste Management Company
आपल्या घरात बऱ्याच प्रमाणात आपल्याला रद्दी आणि कचरा पाहायला मिळतो, म्हणून आपण ती रद्दी एखाद्या रद्दी वाल्यांना विकतो, पण रद्दीवाला त्याच रद्दी ला विकत घेतो, ज्या रद्दीला तो समोर विकू शकेल बाकी च्या रद्दी ला तो कचरा समजून आपल्याला परत करतो. आणि आपल्या घरात अश्याच प्रकारचा कचरा पडलेला राहतो. पण आपल्या देशात काही व्यक्तींनी या विषयाची माहिती घेऊन एक अनोखा स्टार्टअप सुरू केला आहे. ज्यामध्ये ते लोकांना त्यांच्या घरातील सुक्या कचऱ्याच्या बदल्यात पैसे देतात. तर या आजच्या लेखात आपण या अनोख्या स्टार्टअप विषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया.
कचरा द्या आणि पैसे घ्या या कंपनीचा अनोखा स्टार्टअप – Information of Waste Management Company in India
लोकांना ही गोष्टी समजावयाची होती की कचऱ्याला सुध्दा एक किंमत असते. असे म्हणणे आहे या कंपनीचा स्टार्टअप करणाऱ्या संस्थापकांच. हैद्राबाद मध्ये तीन लोकांनी मिळून एक स्टार्टअप सुरू केला आहे, ज्या स्टार्टअप चे नाव बिंटिक्स असे आहे, ही कंपनी लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या जवळील सुका कचरा गोळा करून त्या कचऱ्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे देते. हा अनोखा स्टार्टअप रोशन मिरांडा, उदित पाटीदार आणि जयनारायण कुलथिंगल या तिघांनी सुरू केला.
त्यांचे या स्टार्टअप ला सुरू करण्याचा एकाच उद्देश होता की सुक्या कचऱ्याला लँडफिल मध्ये जाण्यापासून थांबवणे. हा स्टार्टअप त्यांनी २०१८ ला सुरू केला होता. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ ८०,००० पेक्षा जास्त लोकांच्या घरून २५० मेट्रिक टन कचरा जमा करून त्या कचऱ्याला रिसायकल केल्या गेले आहे. त्यांचे काम हैद्राबाद पासून बँगलोर पर्यंत आणि बँगलोर पासून तर दिल्ली पर्यंत गेले आहे.
कंपनी कश्या प्रकारे काम करते – How the company works
ह्या कंपनीने आपले एक मोबाईल अप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे, हे अप्लिकेशन आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून सब्सक्राइब करताच आपण या सर्व्हिस ला सुरू करू शकता. आणि ही सर्व्हिस आपल्याला बिलकुल मोफत आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा शुल्क मोजावा लागत नाही. त्यांनंतर या कंपनी द्वारे आपल्याला एक पिशवी दिल्या जाते ज्या पिशवीवर एक क्यू आर कोड दिलेला असतो ज्याच्या मदतीने आपला कचरा कुठपर्यंत आला आहे याची ट्रेकिंग केल्या जाते. एक आठवड्यानंतर हा कचरा जमा केल्या जातो.
त्यानंतर हा कचरा जेव्हा फॅक्टरी मध्ये पोहचतो तेव्हा त्या कचऱ्याचे वजन करून ग्राहकांच्या अप्लिकेशन मधील वालेट मध्ये पैसे दिल्या जातात. बिंटिक्स आपल्या ग्राहकांच्या घराला सुध्दा एक क्यू आर कोड लावतो ज्यामुळे त्यांना पुन्हा जमा कचरा जमा करण्यासाठी मदत होते.
ही कंपनी आपल्या ग्राहकांना २ रुपये किलो ग्राम ते ८ रुपये की.ग्रॅ. या दराने पैसे देते. जमा केलेल्या सर्व कचऱ्याच्या बॅगांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे सर्टिफाइड रिसायकलर्स जवळ पाठवल्या जाते. आणि याच कचऱ्याला जमा करणे, वेगळे करणे या सर्व गोष्टींसाठी ते बिंटिक्स कंपनीला पैसे देतात. या प्रकारे हे काम सुरू राहते.
यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे. आणि लवकरच ही कंपनी संपूर्ण देशात आपल्या कंपनीचा विस्तार करणार आहे. तर आशा करतो आपल्याला हा लिहिलेला स्टार्टअप स्टोरी चा लेख आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!