Washim Jilha chi Mahiti
वाशिम शहराचे पुर्वीचे नाव वत्सगुल्म ! यालाच बच्छोम, बासम असेही कधीकाळी म्हंटले जायचे, इ.स. पुर्व सुमारे 300 पासुन याठिकाणी सात्वाहन राजवंशाची सत्ता होती.
त्यानंतर ही वाकाटकांची राजधानी झाली त्यांच्या काळात ’वत्सगुल्म’ च्या परिसरात अनेक तिर्थक्षेत्र होती आजही वाशिम येथील बालाजी देवस्थान प्रसिध्द आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे देखील तिर्थस्थान आहे त्यानंतर पुढे चालुक्यांचे राज्य या ठिकाणी आले त्यांनी आपली राजधानी दुस.या ठिकाणी स्थानांतरीत केल्याने या शहराचे महत्व कमी झाले पण पुढे यादवांच्या राजवटीत पुन्हा या ठिकाणाचे महत्व वाढले. हेमाडपंथी मंदीरं आणि तलावांकरता हा जिल्हा प्रसिध्द आहे.
वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Washim District Information in Marathi
वाशिम जिल्हयातील तालुके – Washim District Taluka
- वाशिम
- कारंजा
- रिसोड
- मालेगांव
- मंगरूळपिर
- मानोरा
वाशिम जिल्हयाविषयी उपयुक्त माहिती – Washim Jilha Mahiti
- वाशिम जिल्हयाची लोकसंख्या (Population) 10,20,216
- वाशिम जिल्हयाचे एकुण क्षेत्रफळ 5153 वर्ग कि.मी.
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 943
- साक्षरतेचे प्रमाण 83.25%
- वाशिम हा जिल्हा 26 जानेवारी 1998 साली अस्तित्वात आला त्यापुर्वी तो अकोला जिल्हयाचा भाग होता.
- वाशिम येथे पुर्वी निजामांची टाकसाळ होती.
- वाशिम विदर्भात पुर्वेकडे स्थित असुन उत्तरेला अकोला, दक्षिणेकडे हिंगोली आणि पश्चिमेकडे बुलढाणा शहर वसलेले आहे.
- वाशिम जिल्हयातुन पैनगंगा ही मुख्य नदी वाहाते हीची सहायक अरूणावती नदी असुन ती मंगरूळपीर आणि मानोरा या ठिकाणाहुन वाहाते.
- वाशिम शहर रेल्वेसेवेने आणि महामार्गाने जोडल्या गेल्याने बससेवा देखील उपलब्ध आहे.
- अकोला हैद्राबाद हा रेल्वेचा मार्ग वाशिमवरून जातो.
पर्यटन आणि तिर्थस्थळं – Tourist Places in Washim District
- वाशिमचा बालाजी – Balaji Mandir
बालाजी मंदीर शहरातील फार प्राचीन मंदीर म्हणुन प्रचलीत आहे. या मंदीराला भवानी कालु यांनी इसवीसन् 1779 ला स्थापीत केले होते. वाशिमकरांची या मंदीराप्रती अपार श्रध्दा असुन त्यांच्या मान्यतेनुसार तिरूपतीचा बालाजी पेरण्या झाल्या की येथे विश्राम करायला येतो, हे येथील ग्रामदैवत आहे.
मंदीरात प्रवेश करताच भगवान बालाजी ची मुर्ती लक्ष वेधुन घेते. काळया पाषाणातली अतिशय रेखीव आणि कोरीव मुर्ती कितीतरी वेळ आपण पाहात राहातो. मुर्ती वरून प्रथम पाहाणा.याची नजर हटता हटत नाही.
ही मुर्ती एका पाषाणात बनली असुन मुर्ती अत्यंत रेखीव आहे दागदागिन्यांनी मुर्तीची शोभा आणखीनच वाढते. येथील भगवान बालाजीची ख्याती दुरवर असल्याने लांब लांबुन भाविक येथे दर्शनाकरता येत असतात. मंदीर परिसरात गणेशाचे आणि हनुमंताचे देखील मंदीर आहे.
एरवी अत्यंत शांत असणारा हा परिसर उत्सवाच्या दरम्यान मात्र मोठया प्रमाणात गजबजलेला असतो. अश्विन महिन्यात भगवान बालाजीचा उत्सव या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा होत असतो आणि फार दुरवरून त्यावेळेस भाविक दर्शनाचा लाभ घेण्याकरता येथे येत असतात.
- श्रीगुरूमंदीर कारंजा (लाड) – Guru Mandir
शिवपुर्वकाळापासुन वैभवसंपन्न असलेले कारंजा लाड हे श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान! नृसिंह सरस्वती दत्तात्रयाचे दुसरे अवतार, काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रम्हानंद सरस्वती यांनी कारंजा मधे जागा मिळवुन तेथे मंदीर उभारले आणि तेथे चैत्र वद्य प्रतिपदेला 1856 साली नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली.
आज हजारो दत्तोपासकांच्या नित्य.नैमित्तिक गर्दीमुळे हे स्थान गाजते.जागते बनले आहे. कारंजा नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे, करंज ऋषींमुळे या नगरीला करंजपुर हे नाव मिळाले पुढे ते कार्यरंजकपुर आणि मग कारंजा झाले. या ठिकाणी जैन लाड समाजाची वस्ती असल्याने कारंजा लाड असा या गावाचा उल्लेख केला जातो.
नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश सारख्या दुर दुर राज्यांमधे यात्रा केल्या बरेच चमत्कार देखील केल्याचे सांगितले जाते त्यामुळे कारंजा लाड येथे त्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरता नेहमी या ठिकाणी गर्दी असते.
- जैन मंदीर – Jain Mandir Karanja Lad
कारंजाला जैन धर्मीयांची काशी म्हणुन संबोधले जाते. येथे चार प्रमुख दिगंबर जैन मंदीर आहेत. या मंदीरांना जवळ जवळ 900 वर्षांपेक्षा देखील अधिकचा काळ झालेला आहे. येथील नक्षीकाम अत्यंत पुरातन आणि सुबक असुन कलाकुसर पाहाण्यासारखी आहे.
काष्ठ संघ मंदीरातील लाकडी काम 14 व्या शतकातील असुन बारीक नक्षीकाम लक्षवेधक आहे, सायनन मंदीरातील कलाकुसर राजस्थानी परंपरेला दर्शवणारी आहे. येथील गुरूकुलात एक सुंदर जैन मंदीर असुन छात्रावास आण विद्याथ्र्यांकरता शिक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
- पोहरादेवी – Poharadevi
बंजारा समुदायाची काशी म्हणुन ओळखली जाणारी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी पंचक्रोशीत फार प्रसीध्द असुन लांबलांबुन भाविक या देवीच्या दर्शनाकरता येथे येत असतात. अतिशय प्राचीन मंदीर असुन बंजारा समाज मोठया प्रमाणात येथे येत असतो.
पोहरादेवीची यात्रा सर्वदुर प्रसिध्द असुन त्यादरम्यान येथे बराच मोठा बाजार सजलेला पहायला मिळतो. देवीच्या दर्शनाला आणि जत्रेचा आनंद घेण्याकरता तेव्हां इथे खुप गर्दी असते. वाशीमपासुन पोहरादेवी संस्थान 51 कि.मी., यवतमाळ पासुन 71 कि.मी. आणि हिंगोली पासुन 77 कि.मी. एवढया अंतरावर आहे.
आणखी वाचा:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ वाशिम जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्