Warana Nadi
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून वाहणारी वारणा नदी दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी मानली जाते.
वारणा नदी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या महत्वाच्या उपनद्यांपैकी एक आहे; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांची वरदायिनी आहे.
वारणा नदीची माहिती – Warana River Information in Marathi
नदीचे नाव | वारणा |
उगमस्थान | प्रचितगड (सहयाद्री पर्वतरांगा), जि. सांगली, महाराष्ट्र. |
उपनद्या | कडवी, मोरणा |
प्रकल्प (धरण) | चांदोली धरण, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर, महाराष्ट्र. |
सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या प्रचितगड येथून वारणा नदीचा उगम आहे.
उगमाजवळून खाली वाहत आल्यावर ती मार्ग-बदल करून दक्षिणमुखी होऊन पुढे मार्गक्रमण करते. पुढे तिचे स्वरूप पालटून ती धबधब्याच्या रूपात वाहते.
जावळी, आंबोळे या गावांच्या उत्तर बाजूला ती धबधब्याचे रूप घेऊन ‘कंदारडोह’ या गोलाकार खोल तळ्यामध्ये उडी घेते.
उत्तर बाजूस आष्टा डोंगररांगा आणि दक्षिण बाजूस पन्हाळ्याच्या डोंगररांगा यांमधील प्रदेशात वारणा नदीचे खोरे विसावले आहे. कंदारडोहाजवळ या नदीचे पात्र गोट्यांनी भरलेले आणि उथळ स्वरूपाचे आहे.
परंतु त्यानंतर मात्र वारणा नदीचे पात्र रुंद, विस्तृत झालेले पाहायला मिळते. यानंतर ती पूर्ववाहिनी होते.
वारणा नदीची माहिती – Warana River Mahiti
सांगली जिल्ह्यातील कडवी आणि मोरणा ह्या वारणेच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. याव्यतिरिक्त अंबार्डी, अंवीर (कडवी नदीचा ओढा), आंबरडी (कडवी नदीचा ओढा) कडवी, कांद्रा (कडवी नदीचा ओढा), कनसा, पोटफुगी (कडवी नदीचा ओढा), मोरणा, शर्ली हे वारणेच्या उपनद्या आणि ओढे आहेत.
मार्गक्रमणा करीत-करीत सांगलीजवळील हरीपूर येथे ती कृष्णा नदीत विलीन होते. वारणा-कृष्णेच्या संगमाजवळ निसर्गरम्य वातावरणात नदी किनारी संगमेश्वर नावाचे शिव मंदिर आहे.
कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर चांदोली या ठिकाणी वारणा नदीवर एक मोठे धरण बांधले आहे.
चांदोली किंवा वारणा या नावाने हे धरण ओळखल्या जाते. या धरणातील पाण्याचा उपयोग जलसिंचनासाठी होऊन मोठे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान असून धरणाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.
वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात.
वारणा नदी विषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Warana River
उत्तर: सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या प्रचितगड येथे.
उत्तर: कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या सीमेवर चांदोली या ठिकाणी वारणा नदीवर हे धरण बांधले आहे या धरणाचा या दोन्ही जिल्ह्यात समावेश होतो.
उत्तर: चांदोली राष्ट्रीय उद्यान.
उत्तर: कृष्णा नदीची.
उत्तर: हरिपूर, जि. सांगली.