Voting Ink or Election Ink Information
निवडणूकांचे वातावरण असले की प्रत्येक पार्टी प्रचार करते आणि त्यांनंतर प्रचारात त्यांच्या पार्टीला मतदान करण्याचे आवाहन लोकांना केल्या जाते, ज्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आहे, त्याच व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार असतो, आणि ज्यांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी मतदान करायलाच हवे कारण मतदान हा आपला अधिकार असून ते आपले देशाच्या हितासाठी कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने ज्यांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी अवश्य मतदान करावे.
मतदान करताना आपल्या बोटाला जी शाई लावली जाते ती का लावतात आणि ती लावल्यानंतर का मिटत नाही ह्यामागे काय कारणे आहेत ते या लेखाद्वारे आपण पाहणार आहोत की नेमकं त्या शाई मध्ये काय वापरल्या जाते ज्यामुळे त्या शाईला पुसल्या जात नाही, तर चला पाहूया..
जाणून घ्या, मतदान करताना बोटाला लावण्यासाठी ‘हीच’ शाई का वापरली जाते – Voting Ink or Election Ink Information in Marathi
जर आपल्याला ओळखायचे आहे की एखाद्या व्यक्तीने मतदान केले की नाही तर आपण लगेच त्याच्या हाताच्या बोटाला शाई आहे की नाही पाहतो आणि आपल्याला लगेच कळतं की त्या व्यक्तीने मतदान केले की नाही, कारण मतदान करताना आपल्या बोटाला जी शाई लावल्या जाते ती शाई आपल्याला ना पाण्याने पुसून टाकता येत, ना साबणाने धुवून टाकता येत.
यामागे असे काय कारण असेल बरं की ज्यामुळे त्या शाईला पुसल्या जात नाही, तर आपण याआधी सर्वात पहिले या गोष्टीकडे लक्ष देऊ की या शाईचा वापर का करावा लागला, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या देशात निवडणुका होऊ लागल्या तेव्हा मतदान केल्या नंतर शाई लावणे बंधनकारक नव्हते पण याचा बरेच लोकांनी गैरफायदा घेतला त्यांनंतर निवडणूक आयोगाने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया ला अशी शाई बनविण्यासाठी सांगितले ज्या शाईला कोणीही मिटवू शकणार नाही, आणि कोणीही पुसून सुध्दा टाकू शकणार नाही.
त्यानंतर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाने या शाईचे निर्माण केले ज्या शाईला काही दिवस मिटवता येणार नाही, त्यांनंतर प्रत्येक निवडणुकी मध्ये या शाईचा वापर केला जाऊ लागला. सर्वात आधी या शाई चा वापर १९६२ च्या निवडणुकीमध्ये केल्या गेला आणि त्यांनंतर पासून तर आतापर्यंत याच शाईचा वापर केल्या जातो.
आता पाहूया या शाईत काय वापरतात ज्यामुळे बरेच दिवस ही शाई बोटावरून पुसल्या जात नाही. आपण पाहिले असेल की त्या शाईला कितीही पुसले आणि कशानेही पुसायचा प्रयत्न केला तरीही ती शाई पुसल्या जात नाही. कारण या शाई मध्ये सिल्वर नायट्रेट चा वापर केला गेला असतो. ज्यामुळे ही शाई फोटोसेन्सिटिव्ह बनते आणि जेव्हा ही शाई प्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा ही आणखी घट्ट होते.
एक गोष्ट आणखी ती म्हणजे ही शाई जेव्हा आपल्या बोटाला लावल्या जाते तेव्हा या शाईतील सिल्वर नायट्रेट आपल्या शरीरातील क्लोराईड सोबत अभिक्रिया करून सिल्वर क्लोराईड बनवते आणि सिल्वर क्लोराईड पाण्यात न विरघळता आपल्या त्वचेवर तसेच राहते. याला ना साबणाने पुसता येत ना पाण्याने साफ करता येत जेव्हा त्वचेवरील किंवा नखांवरील पेशी ह्या मृत पाऊन नवीन उत्पन्न होतात तेव्हा ही शाई आपोआप पुसल्या जाते. आता मतदान करायला जाणार तेव्हा या शाई कडे अवश्य लक्ष देऊन पाहा.
आशा करतो हा लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!