Vitamin K chi Mahiti
विटामिन K हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. थोडक्यात सागायचे म्हणजे हे जीवनसत्व आपल्या हड्डी ला मजबुती आणि आपले हृद्य स्वस्थ ठेवते. विटामिन के ला फाइलोक्विनोन या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.
जीवनसत्त्व ‘K’ ची माहिती – Vitamin K information in Marathi
विटामिन K हे सहजतेने दुध, दही, पनीर यात आढळते. आपण मांसाहारी असला तर अंडे, चिकन आणि शकाहारी असाल तर चीज, soft चीज, पालक, ब्रोकली, कोबी, फ्लॉवर, डाळी, सोयाबीन, दही, टोमॅटो. विटामिन K ला दोन भागात विभागले गेले आहे जसे K1 आणि K2.
K1 हे जीवनसत्व आपल्याला हिरव्या पालेभाज्या व फळातून मिळते तर K2 हे जीवनसत्व आपल्याला अंडे, मटन, चिकन या द्वारे मिळते .
इंग्रजी नाव : Vitamin K.
मिळणारे अन्न-घटक : पालक, ग्रीन टी (green tea), कोबी, फ्लॉवर, डाळी, सोयाबीन, दही, टोमॅटो, मटण, अंडी,
विटामिन K चे फायदे – Benefits of vitamin K
- रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारा तंतुमय घटक तयार विटामिन K करते.
- विटामिन K हे पूर्ण शरीरात कैल्शियम फैलवण्यास मदत करते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
- विटामिन के पोट , कोलोन, लिवर, मुँह, प्रोस्टेट आणि नाक यांना कैंसर न होण्यास मदत करते.
- शरीरातील इन्शुलीन प्रक्रीयेत मदत मिळून रक्तातील ग्लुकोज चा स्थर योग्य प्रमाणात ठेवते.
- बुद्धीला फ्री रेडीक्लस पासून होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावा पासून वाचवण्याचा मदत होते .
- हाडांना पुन्हा जोडण्यास मदत करते. इत्यादी .
विटामिन K च्या कमतरतेमुळे होणारे आजार – Vitamin K Deficiency Symptoms
- रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबणे म्हणजेच एखाद्या जखमेतून सतत रक्तस्राव होणे.
- पोटाच्या आत म्हणजे आतड्यात रक्तस्राव होणे.
- हिरड्यातून रक्त येणे.
- लाल रंगाची लघवी होणे.
- शरीरावर लाल खुणा किंवा चट्टे येणे (easy brushing)
- हाडे तुटण्याची संभावना वाढणे (easy fractures).
इतर माहिती :Other information
आर.डी.ए च्या अनुषंगाने वर्ष १४ नंतर आहारात विटामिन K ची मात्रा वाढवावी, त्यामुळे आपल्या शारारीरात वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या रोगांना टाळता येते. गर्भवती महिलाने आहारात विटामिन K चा समावेश असणाऱ्या अन्नाचे खास करून सेवन करावे.
विटामिन K विषयी विचारले जाणारे प्रश्न : Quiz Question About Vitamin K
उत्तर: रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबणे म्हणजेच एखाद्या जखमेतून सतत रक्तस्राव होणे. त्यामुळे जर ऑपरेशन च्या वेळी जर रक्त स्त्राव थाबाला नाही तर रुग्ण मरू शकतो. विटामिन K च्या कमतरते मुळे शरीरातील हड्डी कमजोर होतात व त्या तुटण्याची संभावना वाढते.
उत्तर: फाइलोक्विनोन
उत्तर: Phytonadione या class चे रासायनिक असून याचे रासयनिक सूत्र हे C31H46O2 आहे.
उत्तर: नियमित आहारात पालेभाज्या, रसदार फळे तसेच दही पनीर, अंडी, चिकन व मटण यांचा देखील समवेश आहारात घ्यावा.
उत्तर: विटामिन K2 हे दाता पर्यंत मिनरल्स आणि कॅल्शियम पोहचवण्याचे कार्य करते, शरीरात त्याची कमी झाल्यास हिरड्यातून रक्त येणे हा रोग होऊ शकतो.