Vitamin E chi Mahiti
जीवनसत्त्व ‘E’ ची माहिती – Vitamin E information in Marathi
इंग्रजी नाव : Vitamin E.
अन्नातून मिळणारे घटक : लोणी, सफरचंद, अंडी, केळी, दूध, सोयाबीन, वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, मुळा, शतावरी (Asparagus) ,लाल भोपळा,रताळी, आंबा, पपई, सूर्यफूल तेल, Wheatgerm oil, पामतेल, शेंगदाणा, बदाम.
जीवनसत्त्व E मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin E Benefits
- अँटी ऑक्सिडन्ट (Anti oxident) म्हणून याचा वापर करतात. त्यामुळे शरीराचे रक्षण होते. इन्झमॅटीक अॅक्टिव्हीटी (Enzymatic activities) पुढच्या पिढीत पाठवणाऱ्या गुणसूत्रांची क्षमता, सुदृढता वाढवते.
- स्नायूंची वाढ व्यवस्थित करते. स्नायूंना ताठरता कडकपणा किंवा घट्टपणा न येऊ देता हळूवारपणे स्नायूंच्या हालचालींच नियंत्रण करते. त्वचा तुकतुकीत व तजेलदार बनवते. हृदयाचे काय व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
जीवनसत्त्व E च्या कमतरतेमुळे होणारे आजार – – Vitamin E Deficiency Symptoms
1) जीवनसत्त्व ‘इ’ च्या कमतरतेमुळे चेतासंस्थेशी निगडित असे आजार होतात.
- Spinocevebellar ataxia (स्पायनोसिव्हेब्लर अँटेक्सिया)
- Myopathies (मायोपॅथेसिस)
- Dysarthria (डिसेर्येरिया)
- Loss of vibratory sensation (लॉस ऑफ व्हायब्रेटरी सेन्सेशन)
2) जीवनसत्त्व ‘इ’ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो.
इतर माहिती :
आठ प्रकारांत असलेल्या जीवनसत्त्व ‘इ’ चे प्रामुख्याने दोन गटांत वर्गीकरण करतात.
- पहिले चार मिळून टोकोफेरॉल्स (Tocopherols), – टेकोफेरॉल (tocopherol) हा एक महत्त्वाचा पाण्यात विरघळणारा अँटी ऑक्सिडन्ट आहे. हा पेशीच्या आवरणाची काळजी घेतो व पेशींचे संरक्षण करतो.
- नंतरचे चार मिळून टोकोट्रीनॉल्स (Tocotrienols), त्यांचे लेखन साधारणतः अल्फा (alpha-a), बिटा (beta – b), गॅमा (gamma -g), SCCT (delta – d) – टोकोट्रिनॉल्स् (Tocotrienols) हा आपल्या चेतासंस्थेतील चेतांची म्हणजे पेशींची काळजी घेतो. त्यांना तुटण्यापासून वाचवतो,