Vitamin B2 chi Mahiti
जीवनसत्त्व ब ला सर्वसाधारणपणे रायबोफ्लेवीन (Riboflavin) असे म्हणतात. हे नाव त्याला त्याच्या रंगावरून पडलेले आहे. हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतला आहे. जसे ‘flavus’ म्हणजे पिवळा रंग, जसा गाईच्या दुधाला पिवळसर रंग असतो त्याप्रमाणे. त्या रंगाचे मूळ कारण म्हणजे “Lactoflavin” हा या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे.
जीवनसत्त्व ‘ब2’ ची माहिती – Vitamin B2 Information in Marathi
इंग्रजी नाव : Vitamine B2, Riboflavin – B
मिळणारे अन्न घटक –
कोंबडीचे चिकन ( Chicken), चीझ, बकऱ्याची कलेजी, हिरव्या फळभाज्या, टोमाटो, अंडी, सोयाबीन, गायीचे दुध, ताक, दही, आळंबी ( Mushrooms), पालक, बकरीचे दुध, बदाम,
जीवनसत्त्व ब2 शरीरास होणारे उपयोग – Vitamin B2 Benefits in Marathi
- शरीरातील पेशींना संरक्षण देणे,
- उर्जा निर्मिती साठी मदत करणे,
- त्वचा निरोगी व नितळ होणे,
- डोळे निरोगी ठेवणे दृष्टीदोष घालविणे.
जीवनसत्त्व ब2 च्या उणिवेमुळे होणारे आजार – Vitamin B2 Deficiency
- जीवनसत्व B2 च्या कमतरतेमुळे डोळ्यां संबधी आजार होतात.
- डोळ्यांच्या आजारामध्ये प्रामुख्याने प्रकाश्याचा त्रास होणे, डोळ्यांमध्ये सारखे पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, आग होणे, खाज येणे, त्याच प्रमाणे डोळ्यांच्या आजूबाजूला खाज येणे, अस्पष्ट दिसणे, यांसारखे त्रास जाणवतात.
- तोंड येणे ओठांची आग होणे, ओठ कोरडे पडणे,ओठांतून रक्त येणे, ओठांच्या आजूबाजूला चिरा पडणे, त्यातून रक्त येणे, आग होणे, इत्यादी त्रास होतात.
- हातापायांची कातडी सोलल्याप्रमाणे निघणे.
- नाकाच्या आजूबाजूची त्वचा निघणे.
इतर माहिती:
जीवनसत्त्व ‘ब२, म्हणजे नेमके काय?
जीवनसत्त्व ब ला सर्वसाधारणपणे रायबोफ्लेवीन (Riboflavin) असे म्हणतात. हे नाव त्याला त्याच्या रंगावरून पडलेले आहे. हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतला आहे. जसे ‘flavus’ म्हणजे पिवळा रंग, जसा गाईच्या दुधाला पिवळसर रंग असतो त्याप्रमाणे.
त्या रंगाचे मूळ कारण म्हणजे “Lactoflavin” हा या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे.
जीवनसत्त्व ‘ब२’ हे आपल्या शरीरात सर्वांत जास्त यकृत, हृदय आणि मूत्रपिंड या ठिकाणी साठविलेले असते. हे त्या ठिकाणी असल्या कारणाने जीवनसत्त्व ब२ चा शरीरात योग्य वापर होतो. मूत्रपिंड मूत्राद्वारे गरज नसलेल्या सर्व गोष्टी बाहेर काढून टाकते.
हृदय ऑक्सिजनच्या साहाय्याने व जीवनसत्त्व ब२ च्या मदतीने ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य व्यवस्थित पार पाडते. त्याचमुळे शरीरातील सर्व अवयवांची कार्ये घडत असतात.
आपल्या शरीरात जीवनसत्त्व ‘ब२, चे कार्य कोणते?
1) ऊर्जानिर्मिती करणे हे एक महत्त्वाचे कार्य ब जीवनसत्त्व सातत्याने करत असते.
स्वयंपाकात अन्न शिजवताना व ते टिकवताना घ्यावयाची काळजी:
हवा आणि उष्णता जीवनसत्त्व ‘ब२ चे फार कमी प्रमाणात नुकसान करते; परंतु प्रकाश हा एकमेव घटक जीवनसत्त्व ब ला नुकसान पोहोचवतो. म्हणजे तो अन्न-घटकातीलब हे जीवनसत्त्व कमी करतो.
या कारणासाठी जीवनसत्त्व ‘ब२ युक्त अन्नघटक शिजवताना झाकण ठेवून शिजवतात. साठवणूक करताना प्रकाश आत जाणार नाही अशा अपारदर्शक डब्यात ठेवतात.
खालील आजारांवर जीवनसत्त्व ब हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते –
- अशक्तपणा,
- अर्धशिशी किंवा अर्धशिर्ष (Migraine)
सर्वसाधारणपणे अन्नातून मिळणारे ब, घटकाचे प्रमाण:
आळंबी (Mushrooms) | 1 वाटी | 0.43 mg | 25.3% |
पालक (शिजवलेला) | 1 वाटी | 0.42 mg | 24.4% |
दही | 1 वाटी | 0.52 mg | 30.6% |
अंडी | — | 10.26 mg | 15.3% |
सोयाबीन (शिजवलेले) | 1 वाटी | 0.49 mg | 28.8% |
बकरीचे दूध | 1 वाटी | 0.34 mg | 20.1% |
बदाम | — | 60.30 mg | 17.6% |
मटार (कच्चे) | 1 वाटी | 0.21 mg | 12.4% |
गाईचे दूध | 1 वाटी | 0.21 mg | 12.4% |
गाजर | —- | 20.07 mg | 3.5% |
फूलकोबी (कच्चे) | 1 वाटी | 0.06 mg | 3.4% |
शतावरी (कच्चे) | 1 वाटी (asparagus) | 0.19 mg | 7.5% |