B Jivansatva in Marathi
जीवनसत्त्व ‘ब’ चा गट हा पूर्ण शरीराला जगण्याची शक्ती देणारा आहे. जीवनसत्त्व ‘ब’ च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार उत्पन्न होतात. यामुळेच जीवनसत्त्व ‘ब’ चा खूप सखोल अभ्यास झाला आहे. आम्ही या या लेखा मध्ये जीवनसत्व ब ची संपूर्ण माहिती तुमच्या साठी घेवून आलो आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग पाहूया..
जीवनसत्त्व ‘ब’ ची माहिती – Vitamin B information in Marathi
मिळणारे अन्न-घटक – Vitamin B Foods in Marathi
टोमॅटो, धान्याचे कोंडायुक्त पीठ, अंड्याचा पिवळा भाग, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड, हातसडीचे तांदूळ (पॉलिश न केलेले तांदूळ), सुपारी, द्राक्षे, दूध, मटार, डाळी, बकऱ्याची कलेजी, किण्व (यीस्ट), मका, हरभरा, नारळ, पिस्ता, ताजी फळे, दही, पत्ताकोबी, बटाटा, फळभाज्या, मासे..
जीवनसत्त्व ‘ब’ मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin B Benefits
- खाल्लेल्या अन्नातील कर्बोदकांचे विघटन करून त्यांचे साखरेत रूपांतर करते व शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.
- शरीरातील मेदाचे व पिष्टमय पदार्थांचे विघटन करून आम्ल तयार करते; ते आम्ल आपल्या चेतासंस्थेला मदत करते.
- वेगवेगळ्या अवयव व इंद्रियांच्या स्नायूंना बळकटी देते.
- पचनसंस्थेतील कार्य करणाऱ्या अवयवांना मदत करते, त्यांचे कार्य सुधारते.
- त्वचा निरोगी, तजेलदार व टवटवीत बनवते.
- केसांची योग्य प्रमाणात वाढ करते, त्यांना सुळसुळीत, मुलायम करून चकाकी देते.
- डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते व दृष्टिदोष निर्माण होऊ देत नाही.
जीवनसत्त्व ‘ब’ च्या कमतरतेमुळे होणारे आजार – Vitamin B Deficiency
- संपूर्ण हात-पाय किंवा हातापायांची बोटे यांच्यात वेदना होणे.
- पाय गार पडणे, पायांना घाम येणे,
- हातापायांचे जोड (सांधे) दुखणे,
- शरीराचे वजन अचानक कमी होणे.
- झोप न लागणे, झोप कमी होणे.
- लघवीच्या अंगाची आग होणे, सूज येणे.
- शरीरावर लाल चट्टे पडणे.
- हृदय कमजोर होणे.
- शरीराला सूज येणे.
- चक्कर येणे, डोके जड होणे.
- दृष्टी कमी होणे.
- पाचनक्रिया बिघडणे, पचनासंबंधी अन्य विकार होणे.
इतर माहिती :
जीवनसत्त्व ‘ब’ ला ‘कॉम्प्लेक्स’ म्हणतात. प्रत्येक भाग हा एकमेकांशी वेगळा आहे. त्याच्यात फरक आहे, विविधता आहे; म्हणून त्याचे जीवनसत्त्व ब, ब1, ब2, ब6, ब12, असे उपभाग आहेत.
जीवनसत्त्व ‘ब कॉम्प्लेक्स’मध्ये 120° पर्यंत तापमान सहन करण्याची क्षमता आहे. यापेक्षा जास्त तापमान ते सहन करू शकत नाही; तसे झाल्यास ते नष्ट होते.
हे जीवनसत्त्व पाण्यात विरघळू शकते. या मुख्य कारणामुळे ते स्नायूंना निरोगी ठेवते व अन्न पचवण्यासाठीसुद्धा ते सक्रिय असे योगदान देतो, भूक वाढवते, जगण्यासाठी शक्ती देते, जे काही खाऊ ते अंगी लागण्याचे म्हणजे पूर्ण पचविण्याचे काम ते करते.
क्षारांच्या संयोगामुळेसुद्धा ते नष्ट होते; परंतु त्यास आम्लासोबत उकळले तरी ते नष्ट होत नाही. या सर्व कारणांमुळे डॉक्टर B-Complex खाण्याचा सल्ला देतात व आपले शरीर निरोगी ठेवण्याचा हा एक उत्तम आणि सोपा असा मार्ग आहे.