A Jivansatva in Marathi
‘अ’ जीवनसत्वाची मराठीत माहिती – Vitamin A Information in Marathi
इंग्रजी नाव: Vitamin A
‘अ’ जीवनसत्त्व मिळणारे अन्नघटक – Vitamin A Foods in Marathi
गाजर, कोबी, पालक, पपई, दूध, लोणी, बकऱ्याची कलेजी, अंडी, माशांचे तेल (Cord liver oil), आंब्याची कोय, रताळे.
जीवनसत्त्व ‘अ’ मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin A Benefits
जीवनसत्त्व ‘अ’ चा उपयोग रातांधळेपणा व अन्य दृष्टिदोष घालवण्यासाठी होतो. रोजच्या आहारात योग्य वापर केल्यास रातांधळेपणा होतच नाही. म्हणूनच आहारात गाजर, पपई, पालक इ. ठेवल्यास जीवनसत्त्व अ भरपूर मिळते.
- शरीराच्या योग्य वाढीसाठी जीवनसत्त्व ‘अ’ चा उपयोग होतो.
- शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो.
- निरोगी दृष्टीसाठी उपयुक्त.
- त्वचेला तजेला येतो.
- जीवनसत्त्व ‘अ’ च्या गोळ्या किंवा लस स्वरूपात दिले जाते; तरीही ते नैसर्गिक पदार्थांमधून घेणेच चांगले असते.
जीवनसत्त्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे होणारे आजार – Vitamin A Deficiency Diseases
- शरीराची योग्य वाढ होत नाही,
- शरीर निरोगी राहात नाही.
- रातांधळेपणा व डोळ्यांचे इतर विकार जडतात.
कमतरतेचे दुष्परिणाम – Vitamin A deficiency
‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता मुख्यतः दोन कारणांमुळे होते
- ‘अ’ जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे किंवा बालकांला मातेचे दूध लवकर बंद केल्यामुळे दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व न मिळाल्याने डोळ्यातील रेटीना (दृश्यपटल) वाढीला अडथळा निर्माण होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. त्यामुळे संबंधित व्यक्ती रात्रीच्या वेळी स्पष्ट पाहू शकत नाही.
- मेद पदार्थाचे पचन न झाल्यामुळे ‘अ’ जीवनसत्त्व शरीरात जात नाही; त्याचे रक्तात शोषण होत नाही; त्यामुळे ही कमतरता होते व त्या व्यक्तीमध्ये रातांधळेपणा येतो. दररोजच्या आहारातील आवश्यक पातळी 700 ते 900 mg. आवश्यक असते.
- हस्व व दीर्घ दृष्टी दोष निर्माण होतो.
पोषण : दृष्टी, हाडांची वाढ, फुप्फुसे, रक्त यांचे पोषण व शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण.
इतर माहिती :
जीवनसत्त्व ‘अ’ दोन स्वरूपांत मिळते.
- Retinol (रेटीनॉल) : हे मिळण्याचा मुख्य स्रोत प्राणी आहे. पिवळ्या रंगाचा असून पाण्यात विरघळणारा नाही. मेदात विरघळणारा आहे.
- Carotenes (कॅरोटिन्स्) हे चार प्रकारचे असतात. हे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. यात Retinol, retinal, retinic acid तसेच काही Provitamine सुद्धा असतात.
जीवनसत्त्व ‘अ’ ची अजून वेगवेगळी कार्ये आहेत. यात Retinol चा retinoic acid मध्ये रूपांतर करणे, या Retinoic acid चा उपयोग चांगल्या त्वचेसाठी होतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
सर्वसाधारणपणे जीवनसत्त्व ‘अ’ हे खालील घटकांत किती स्वरूपात आहे, ते दिले आहे
माशांच्या तेलात | 30,000 mg |
बकऱ्याची कलेजी | 8058 mg |
कोंबड्याची कलेजी | 3296 mg |
माशांची कलेजी | 6500 mg (72%) |
गाजर | 835 mg (93%) |
रताळे | 709 mg (79%) |
पालक | 469 mg (52%) |
अंडी | 146 mg (16%) |
दूध | 28 mg (3%) |
सर्वसाधारणपणे 1/3 मुलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता असते.