Vijayadashami Dasara Information
“दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा” असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे.
पराक्रमाचा आणि पौरूषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेले दिसतात.
प्रभु रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढय योध्याचा वध करून शत्रुवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी!
देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युध्द करून संपविले ते याच दिवशी! आणि त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी असे म्हंटल्या जाऊ लागले.
या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपुत आणि मराठा योध्दे आपल्या युध्द मोहिमांचा आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असत.
अज्ञानावर ज्ञानाने…. वैऱ्यावर प्रेमाने आणि शत्रुवर पराक्रम गाजवित विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजल्या जातो.
साडेतिन मुहुर्तांपैकी एक असा हा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याकरीता अत्यंत शुभ समजल्या जातो.
कित्येक लोक या दिवशी नव्या प्रतिष्ठानांची सुरूवात दसऱ्यापासुन करतात. नवे वाहन या दिवशी घेतल्या जाते. वाहनाची पुजा केली जाते.
शस्त्रांची पुजा करण्याचा देखील प्रघात आहे. सरस्वती पुजन या शुभमुहुर्तावर करतात.
आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपटयाचे पानं दिली जातात. या दिवशी सिमोल्लंघन, सरस्वती पुजन, शमीपुजन, शस्त्रांचे पुजन आणि अपराजिता पुजन देखील केले जाते.
तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची.
आपटयाचे आणि शमीचे पुजन करायचे त्या ठिकाणी अष्टदल रेखाटायचे व त्याच्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तीला विजयाकरता वर मागायचा.
विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाबद्दल संपूर्ण माहिती – Vijayadashami Dasara Information in Marathi
विजयादशमीच्या ची कथा – Dussehra Story
विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपटयाची पाने का देतात यामागे एक कथा सांगीतली जाते ती अशी….
फार पुर्वी ज्यावेळी गुरूशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतु नावाचे गुरू शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत.
कौत्स नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्याकरीता राहात असे.
ज्यावेळी विद्याभ्यास पुर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरूजींना गुरूदक्षिणेबद्दल विचारले त्यावेळी वरतंतु ऋषी म्हणाले ’’वत्सा विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरीता असते त्याचा मोलभाव करायचा नसतो त्यामुळे मला गुरूदक्षिणा नको ’’.
परंतु कौत्स ऐकेचना त्यामुळे गुरूजी म्हणाले ’’मी तुला चैदा विद्यांचे ज्ञान दिले म्हणुन तु मला चैदा कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्यास ’’.
हे ऐकुन कौत्स या सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरता निघाला परंतु त्या जमविणे तेवढे सोपे काम नव्हते.
कौत्स रघुराजाकडे गेला आणि चैदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली परंतु काही वेळापुर्वीच रघुराजाने आपली संपुर्ण संपत्ती ब्राम्हणांना दान केली होती पण तरी देखील राजाला कौत्साला विन्मुख जाऊ द्यायचे नव्हते म्हणुन रघुराजाने कौत्साला तीन दिवस थांबण्यास सांगीतले आणि त्याला स्वतःजवळच ठेऊन घेतले.
रघुराजाने इंद्रदेवाला आपली उर्वरीत रक्कम देण्यास फर्मावले अन्यथा युध्दास तयार हो म्हणुन सुनावले.
इंद्रदेवाने त्वरीत रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेरा करवी आपटयाच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवीला.
रघुराजाने कौत्सास हव्या तेवढया सुवर्ण मुद्रा घेउन जाण्यास सांगीतले परंतु कौत्साने केवळ चैदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि त्या वरतंतु ऋषींना घेण्याची विनंती केली.
उर्वरीत सुवर्ण मुद्रांचे कौत्साने आपटयाच्या आणि शमीच्या झाडाखाली ढिग रचले आणि सामान्य नगरवासीयांना हव्या तेवढया मुद्रा घेउन जाण्याची विनंती केली. तो दिवस विजयादशमीचा होता.
अचानक श्रीमंत होण्याची संधी चालुन आल्याने नगरवासीयांनी आपटयाच्या आणि शमीच्या झाडाची पुजा केली आणि तेव्हांपासुन सुवर्णमुद्रंाऐवेजी आपटयाच्या पानांची देवाणघेवाण या दिवशी सुरू झाली.
आपटयाचे झाड – Aptyachi Pane
आपटयाच्या झाडाला अश्मंतक आणि वनराज देखील म्हणतात.
कफ व पित्त दोषांवर ही पानं गुणकारी समजल्या जातात.
शमीचे झाड – Shami Tree
पांडव ज्यावेळी अज्ञातवासात निघुन गेले त्यावेळी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रं शमीच्या झाडामधे लपवीली होती त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीची देखील पुजा केली जाते.
एकमेकांमधले… परस्परांमधले प्रेम व्यक्त करण्याचा हा शुभदिन दसरा अत्यंत संुदर असा सण आहे.
वर्षातील हाच एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी आपण आवर्जृन एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो.
सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकमेकांना शुभेच्छा देतो व सद्भावना व्यक्त करतो.
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संत तुकाराम महाराजांनी कितीतरी पुर्वीच या सणाचे महत्व आपल्या काव्यातुन अधोरेखीत केले आहे.
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्