Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi
विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार – Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi
नाव (Name) | विजया लक्ष्मी पंडित |
जन्म (Birthday) | १८ ऑगस्ट १९०० |
जन्मस्थान (Birthplace) | अलाहाबाद |
वडील (Father Name) | मोतीलाल नेहरू |
आई (Mother Name) | स्वरूप राणी नेहरू |
भाऊ (Brother Name) | जवाहरलाल नेहरू |
पती (Husband Name) | रणजीत सीताराम पंडित |
मृत्यु (Death) | १ डिसेंबर १९९० |
विजया लक्ष्मी पंडित यांची माहिती – Vijaya Lakshmi Pandit Biography
मोतीलाल नेहरू यांची मुलगी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची बहिण म्हणजे विजया लक्ष्मी पंडित. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९०० रोजी अलाहाबाद येथे झाला.स्वरूप कुमारी नेहरू हे त्यांचे मूळ नाव. परंतु विवाहानंतर परंपरेनुसार त्यांचे नाव बदलून विजया लक्ष्मी ठेवण्यात आले. त्यांचे पती रणजीत सीताराम पंडित हे काँग्रेस चे नेते व प्रसिद्ध भारतीय वकील होते.विजया लक्ष्मी पंडित यांची राजकीय कारकीर्द : Vijaya Lakshmi Pandit Political Career
कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्या सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय झाल्या. दरम्यान त्यांना ३ वेळा तुरुंगवास सुद्धा झाला होता.विजया लक्ष्मी या एक उत्तम राजकारणी म्हणून प्रसिद्ध होत्या. स्वातंत्र्यपूर्व भारतात कॅबिनेट चा दर्जा मिळालेल्या पहिल्या महिला होत्या. भारतीय राजकारणात सक्रीय झाल्यानंतर १९४६ साली त्यांना भारतीय राज्यघटना समितीमध्ये नेमण्यात आले.शिवाय त्यांनी भारतीय राजदूत म्हणून मोस्को, वॉशिंग्टन आणि मेक्सिको इ. देशात काम पाहिले आहे. १९६२ ते १९६४ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार संभाळला. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काम केले आहे. विजया लक्ष्मी १९६४ ते १९६८ पर्यंत लोकसभा सदस्य म्हणून कार्यरत होत्या.विजया लक्ष्मी पंडित यांचे विचार : Vijaya Lakshmi Pandit Quotes
- “जेवढा घाम गळला जाईल, तेवढेच रक्त कमी सांडेल”
- “स्वातंत्र्य हे भित्र्यांसाठी नसते”
- “शिक्षण म्हणजे फक्त उपजिविकेचे साधन नसून मनुष्याला शुद्ध करून सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य आहे.”
- “टीका, अडचणी आणि विरोध यांच्यावर मत करून वर येण्यात एक वेगळाच आनंद आहे.”
- “माझ्यासाठी भारत म्हणजे, सौंदर्य आणि उदारता असलेली, आदरातिथ्य आणि अनेक संस्कृतींचा स्वीकार केलेली भूमी.”
- “कोणे असे मानू शकते कि इतिहासातील काही वर्षांचा काही फरक पडत नाही, परंतु आपण अशा युगात जगात आहे कि जिथे प्रत्येक क्षणाची किंमत आहे आणि विलंबाची भरपाई म्हणजे मानवाचा जीव असेल”
- “तुरुंगाचा अनुभव चांगला आहे, पण त्यात एक कमतरता आहे…. वैवाहिक जीवनाचे नुकसान आणि भरपाई काहीच नाही. ”