Valentine Day in Marathi
व्हॅलेंटाईन डे म्हटलं कि सर्वांनाच आपल्या प्रियकराची आठवण येऊन राहवत नाही, तसेच सोबतच बऱ्याच आठवणी हि जाग्या होऊनच जातात. हा महिनाच असतो प्रेम करणाऱ्या जोडप्यांचा. प्रेमाविषयी जर बोलायला गेले तर खूप काही गोष्टी अश्या आहेत कि त्या गोष्टींना आपण शब्दात सुद्धा मांडू शकत नाही.
“काय आहेत हे व्हॅलेंटाईन डे जाणून घ्या या लेखाद्वारे.” – Valentine Day in Marathi
या आठवड्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीला ७ तारखेपासून तर १४ तारखेपर्यंत मनवल्या जातो. व्हॅलेंटाईन डे हा मनवल्या जातो पण या मागचे काय कारण असेल बर? आपल्याला माहित आहे का?
नाही!
तर चला जाणून घेऊया या विषयी का मनवल्या जातो व्हॅलेंटाईन डे, या मागे काही वेगळे कारण नसून एक पुरातन कथा आहे ज्यामुळे आज आपण व्हॅलेंटाईन चा आठवडा साजरा करतो.
तिसऱ्या शतकातील गोष्ट आहे रोम साम्राज्यात एक राजा राहत होता. ज्याचे नाव Claudius होते. आणि तो स्वभावाने क्रूर होता, त्याचे असे मानणे होते कि युद्धामध्ये लग्न न झालेले सैनिक चांगल्या प्रकारे युध्द करतात तुलनेत त्यांच्या ज्यांचे लग्न झालेले आहे.
कारण लग्न न झालेल्या सैनिकांना हि भीती नसते कि आपल्या पाठीमागे कोणी आहे कि नाही, पण तेच लग्न झालेल्या सैनिकांना हि भीती असते आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराचे काय होईल म्हणून ते युद्धात चांगल्या प्रकारे लढू शकत नाही.
म्हणून त्याने असा निर्णय घेतला कि त्याच्या राज्यात कोणीही लग्न करणार नाही. सर्व प्रजेला हा निर्णय मान्य नसताना सुद्धा प्रजेवर हा नियम लादल्या गेला, त्यानंतर त्या राज्यात एक दयाळू व्यक्ती राहत होते, त्यांचे नाव होते Valentine तिथे सर्व लोक त्यांना संत मानत होते.
त्यांना राजाने दिलेला आदेश मान्य नव्हता, कारण त्यांचे असे म्हणणे होते कि, सर्व जनते सोबत हा अन्याय होत आहे.
म्हणून त्यांनी राजाच्या लपून काही जणांची त्यांच्या प्रेमिकांसोबत लग्न लाऊन दिले,
पण एक दिवस ह्या सर्व गोष्टी तेथील राजाला माहिती पडल्या कि आपल्या आदेशाचे उल्लंघन होत आहे, त्यांनतर त्याने आदेश दिला कि Valentine ला मृत्युदंड देण्यात यावा,
त्यानंतर Valentine ला कारागृहात बंद करण्यात आले. त्यावेळी तेथील जेलर ला असे माहिती झाले कि Valentine जवळ एक दिव्यशक्ती आहे, आणि जेलर ला कोणी तरी असे सांगितले होते, कि तुमच्या मुलीची जी डोळ्यांची दृष्टी गेलेली आहे. ती Valentine परत आणू शकतो.
त्यासाठी तो जेलर त्याच्या मुलीला Valentine कडे घेऊन गेला, आणि दयाळू, आणि उदार मनाचे Valentine जेलर च्या मुलीच्या डोळ्यांची दृष्टी परत आणून देतात. त्यांनतर जेलर च्या मुलीमध्ये आणि Valentine या दोघांमध्ये जवळीक वाढून त्या दोघांना एकमेकांवर प्रेम होत गेले.
जेव्हा जेलर च्या मुलीला कळले कि Valentine ला आता मरण येणार आहे, तिला त्या गोष्टीचा धक्का बसाला, आणि तो दिवस येणार होता जेव्हा Valentine ला शिक्षा होणार होती,
त्यागोदर Valentine नी जेलर ला कागद आणि पेनाची मागणी केली आणि त्यांनी सुंदर प्रकारे असे एक पत्र आपल्या प्रेयसी साठी लिहिले ज्यामध्ये त्यांनी तिचा निरोप घेतला. आणि शेवटी “तुझा Valentine” म्हणून पत्राची सांगता केली, हेच ते शब्द आहेत ज्या शब्दांना लोक आजही आठवण ठेवतात.
आणि १४ फेब्रुवारी ला Valentine यांना मरणाची शिक्षा झाली, त्यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून १४ फेब्रुवारी हा त्यांच्या नावाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व प्रेम करणारे जोडपे एकमेकांसोबत गुलाब देऊन, चॉकलेट देऊन एकमेकांशी आपले प्रेम व्यक्त करतात.
हा होता व्हॅलेंटाईन डे मागचा इतिहास ह्या गोष्टींमुळे पूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे मनवल्या जातो.
का मानवल्या जातो हा व्हॅलेंटाईन चा आठवडा – Valentine Week Days
आता जाणून घेऊया व्हॅलेंटाईन च्या आठवड्या विषयी माहिती कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा केल्या जातो. तर खाली त्या दिवसांची यादी दिली आहे.
७ फेब्रुवारी – Rose Day

८ फेब्रुवारी – Propose Day

९ फेब्रुवारी – Chocolate Day

१० फेब्रुवारी – Teddy Day

११ फेब्रुवारी – Promise Day

१२ फेब्रुवारी – Hug Day

१३ फेब्रुवारी – Kiss Day

१४ फेब्रुवारी – Valentine’s Day

याप्रकारे Valentine’s Days साजरे केल्या जातात, आजच्या लेखाला वाचून आपल्याला एवढी माहिती तर मिळालीच असेल कि आपण Valentine’s Day का साजरे करतो. आणि आपण जर कोणावर प्रेम करत असाल तर या आठवड्यामध्ये त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मनातील भावना सांगू शकता, आणि माझे असे मत आहे कि आपण जर प्रेम करत असाल तर त्या भावना सांगूनच टाका, कारण तुम्हाला तर माहितीच असेल कि
“किसीसे तुम प्यार करो तो फिर इजहार करो कही ना फिर देर हो जाये”
म्हणून मनात न ठेवता त्या गोष्टी सांगून टाका.
मी आपल्यासाठी अश्याच प्रकारे आणखी लेख घेऊन येत राहील, त्यासाठी आमच्या majhi marathi सोबत कनेक्ट रहा. आशा करतो आजच्या लेखातून आपल्या ज्ञानात भर पडली असेल, आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.