Udyanraje Bhosale chi Mahiti
सातारा वासियांच्या मनात उदयनराजे भोसले यांच्याविषयी एक वेगळा आदर आहे. शिवाजी महाराजांचे ते थेट १३ वे वंशज असल्याने सातारा आणि त्याच्या आसपास उदयनराजेंचा एक वेगळा दरारा आपल्याला सतत अनुभवायला मिळतो.
छत्रपतींचा वंशज असले तरी देखील ते म्हणतात “मला हवा तसाच मी राहाणार’’ राजघराण्यात जन्म घेतला असला तरी देखील मला माझ्या मनाप्रमाणे राहायला आवडतं.
छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या विषयीची माहिती – Udyanraje Bhosale Biography in Marathi
उदयनराजे भोसले यांच्या अल्पपरिचय – Udayanraje Bhosale Information in Marathi
नाव: | उदयनराजे भोसले |
वडिल: | प्रतापसिंहराजे शाहुमहाराज भोसले |
आई: | कल्पनाराजे भोसले |
पत्नी: | दमयंतीराजे भोसले (विवाह: २००३) |
मुलं: | नयनतारा राजे भोसले, विरप्रतापसिंह राजे भोसले |
शिक्षण: | सेंट पीटर्स स्कुल पाचगणी (१९८३) |
महाविद्यालयीन शिक्षण: | फग्र्युसन कॉलेज पुणे |
राजकिय पक्ष: | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष |
उदयनराजे भोसले यांचे बालपण व शिक्षण – Udyanraje Bhosale Childhood And Education
उदयनराजेंच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणी शिक्षणाकरीता होस्टेल ला ठेवले होते इंजिनियरींग त्यांनी पुण्यातुन केले. त्यांच्या शिक्षणासंबधीत व्यवसाय करण्याची त्यांची मनापासुन ईच्छा होती पण तसे घडायचे नव्हते.
राजघराण्याचा वारसा आणि पुढे राजकारणात आल्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्रच बदलले.
उदयनराजे भोसले यांना रेसिंग आणि वेगाची आवड – Udyanraje Bhosale Likes Racing And Speed
रेसिंगची आणि वेगाची त्यांना प्रचंड आवड आहे. ते म्हणतात “जर मी राजकारणात आलो नसतो तर रेसिंग संबंधीत व्यवसायच केला असता’’. वेगाने वाहन चालविण्याची त्यांची आवड साताऱ्यात सर्वांनाच ठाऊक आहे.
पुणे सातारा हे ११० कि.मी. चे अंतर त्यांनी ३५ मिनीटांमधे पार केल्याचे रसभरीत वर्णन बरेचजण मोठया उत्साहाने सांगत असतात. याबद्दल विचारणा करण्याकरीता जर कोणी त्यांना प्रश्न केलाच तर ते त्यालाच प्रतिप्रश्न करतात “पुण्याला सोडु का’’? कराटे आणि बॉक्सिंग ची देखील उदयनराजेंना आवड आहे. व्यायामाची सुध्दा त्यांना आवड आहे.
उदयनराजे भोसले यांचे व्यक्तिमत्व – Udyanraje Bhosale’s Personality
तिक्ष्ण आणि भेदक नजर, गोरापान रंग, सरळ नाक, ६ फुटाची उंची, धिप्पाड शरीरयष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकच भर घालते. त्यांचे बोलणे फार ठामपणे आणि हळु आवाजात असते. त्यांना प्रतिप्रश्न करण्याची हिम्मत कुणी देखील दाखवित नाही.
उदयनराजे भोसले यांच राजकीय करियर – Udyanraje Bhosale Political Career
उदयनराजे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहेत. राष्ट्रवादी पक्षाशी ते संबंधीत असुन २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ते खासदार म्हणुन साताऱ्यातून निवडुन आले आहेत. राष्ट्रवादीचे आणि राजकारणातील मोठे नेते शरद पवार यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे देखील बोलल्या जाते.
२०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणुन निवडुन आल्यानंतर उदयनराजेंचा दबदबा साताऱ्यात वाढला आहे.
तो पुर्वी नव्हतां असे नाही, छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असल्यामुळे त्यांच्याविषयी सातारा नागरिकांमध्ये आदरयुक्त भाव होताच.
भेटणारे म्हणुनच तर त्यांना ‘महाराज साहेब’ असे देखील म्हणत असतात.
बरेच जण उदयनराजेंना नमस्कारापुर्वी ‘अर्धवट मुजरा’ देखील करतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना जिंकून आल्यानंतर त्यांनी काही दिवसानंतर खासदार पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तसेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पुन्हा जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता.
उदयनराजे भोसले यांची कामाची पध्दत – Udyanraje Bhosale Work
त्यांच्याकडे काम घेऊन आलेल्यांचे काम पुर्ण करण्याची देखील त्यांची आपली एक अनोखी पध्दत आहे. समस्या घेऊन येणाऱ्याने समस्या काय आहे, आणि ती सोडविण्याकरता काय करावे लागेल फक्त एवढेच सांगायचे, जास्त फाफटपसारा सांगायचा नाही. त्यानंतर उदयनराजे ‘काम होईल’ असे म्हणतात.
सांगितल्याप्रमाणे ते काम पुर्ण देखील करतात असा सातारा येथील रहिवाश्यांचा अनुभव आहे.
लोकसभेवर ज्यावेळी उदयनराजे निवडुन गेले होते त्या वेळी त्यांनी आपले पहिले भाषण इंग्रजी भाषेतुन केले होते.
आपला राजा इंग्रजी भाषेतुन भाषण करतो याचा सातारा वासियांना फार अभिमान वाटतो. उदयन राजे भोसले हे नेमके कसे आहेत याविषयी अनेक मत मतांतरं देखील ऐकायला मिळतात.
पण सातारा नागरिक त्यांच्या कार्यपध्दतीवर खुश आहेत अस समजायला हरकतच नाही.
तर आशा करतो आपल्याला आजच्या लेखाद्वारे आपल्याला असलेल्या माहिती मध्ये भर पडला असेल, हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद !