Udit Narayan – उदित नारायण झा हे एक नेपाली प्लेब्लैक गायक आहेत. त्यांनी नेपाली आणि भारतीय बॉलीवूड चित्रपटामध्ये अनेक अमर गीत गायिले आहेत. याशिवाय त्यांनी भारतातील मराठी, गुजराती, कन्नड, तेलगु, गढवाली, मैथिली, तुलू, मल्याळम, सिंधी, पंजाबी, ओरिया, आसामी, मणिपुरी, भोजपुरी, आणि बंगाली, या भाषांमध्ये असंख्य गीत गायिले आहेत.
उदित नारायण झा यांचे नावे 3 राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि ५ फिल्मफेअर अवार्ड सुशोभित आहेत.
२००१ मध्ये त्यांना नेपाल नरेश राजा बिरेंद्र वीर विक्रम शह देव यांनी प्रबळ गोरखा दक्षिण बाहू अवार्ड देवून सन्मानित करण्यात केले. भारत सरकारने पद्मश्री (२००१) आणि पद्मभूषण (२०१६) देवून सन्मानित केले आहे.
प्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र – Udit Narayan Biography In Marathi
नारायण यांनी नेपाल येथील राज बिराज मधील पी.बी.स्कुल मधून १० वी पर्यंत शिक्षण घेतले. नंतर काठमांडू येथील रत्न राज्य लक्ष्मी कैम्पस येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
1990 ते 2000 पर्यंत नारायण बॉलीवूड चित्रपटाचे मुख्य गायकांमधून एक होते. त्यांनी बॉलीवूड मधील प्रमुख नायकांसाठी ऑन स्क्रीन सिंगिंग पण केले आहे. त्यांनी बॉलीवूड अभिनेता अमिताभ, राजेश खन्ना आणि देव आनंद यासारख्या महान अभिनेत्यांसाठी गायन केले आहे. त्यांनी गायिका अलका याग्निक यांच्यासोबत सर्वात जास्त गायन केले आहे.
1970 मध्ये नेपाल रेडीओ मधील रेडीओ शो चे स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. येथूनच त्यांचे गायनाचे करियर सुरु झाले. त्यावेळी ते फक्त नेपाली आणि मैथिली भाषांमध्येच गायचे 8 वर्षानंतर संगीतातील स्कॉलरशिप घेऊन ते मुंबईला आले. तेथे त्यांनी विद्याभवन येथे भारतीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले.
१९८० मध्ये प्रसिद्ध संगीत निर्देशक राजेश रोशन यांच्या “उन्नीस बीस” चित्रपटातील २ गाणे त्यांनी गायिले. त्यांना सुप्रसिद्ध प्लेंबॅक गायक मोहम्मद रफी यांच्या सोबत गायनाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांचा बॉलीवूड गायनाचा प्रवास सुरु झाला.
त्यानंतर फिल्म “बडे दिलवाला” मध्ये महान गान कोकिला लता मंगेशकर यांच्या सोबत गायनाची संधी महान संगीत निर्देशक आर.डी.बर्मन यांच्याकडून मिळाली होती.
महान गायक किशोर कुमार यांच्या सोबत त्यांनी “कह दो प्यार है” मध्ये एक गाणे गायिले. त्यांनी संगीतकार बप्पी लाहिरी आणि गायक सुरेश वाडकर सोबत सुद्धा गाणे गायिले. त्यांच्या करियरला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवण्याची संधी १९८८ मध्ये “कयामत से कयामत तक” मध्ये अभिनेता आमीर खान यांच्यासाठी गायिलेल्या गाण्यांनी धमालच केली. त्यांचे गायिलेले गीत फारच प्रसिद्ध झाले.
त्यांच्यासोबत अलका याग्निक यांचे करियर सुद्धा गतिमान झाले. यासाठी दोघांना फिल्म फेअर अवार्ड मिळाला. त्यांनी आजवर एकूण ३६ भाषांमध्ये ३०००० पेक्षा जास्त गाने गायिले आहेत.
१९७३ मध्ये नारायण यांनी एका नेपाली फिल्म “सिंदूर” साठी गाणे गायिले. हे एक हास्यगीत हास्यकार गोपाल राज मैनाली आणि वसुंधरा भूशाल यांच्यावर चित्रित केले होते. त्यांची सहगायिका सुषमा श्रेष्ठा होती. ज्या हिंदी चित्रपटात पूर्णिमा या नावाने गातात. त्यांनी नेपाली चित्रपटांसाठी अभिनय सुद्धा केला. त्यांची नावे, “कुसुमे रुमाल” आणि “पीरती” असे होते.
२००४ मध्ये त्यांनी आपला पहिला अल्बम “उपहार” रिलीज केला. त्यांनी यात आपल्या पत्नी दीपा झा सोबत गाणे गायिले आहेत. त्यांनी भजन संगम, भजन वाटिका, आय लव यु, दिल दिवाना, दोस्ती, लव इज लाइफ, जानम, झुमका दे झुमका, सोना नो घडू लो, धुली गंगा, आणि माँ तारिणी, इत्यादि अल्बम गायिले आहेत.
त्यांनी गायिलेले “ताल से ताल मिला” या गाण्याला देसिमार्टीनी, हिन्दुस्तानी टाइम्स आणि फीवर १०४ कडून आयोजित अभियानात “दशकातील सर्वात प्रसिद्ध गाने” म्हणून घोषित केले होते.
भारतात व विदेशात त्यांनी अनेक स्टेज शोज केले आहेत. त्यांना भारतातील विविध राज्यांकडून विविध राज्यांकडून विविध अनेक अवार्ड मिळालेले आहेत. त्यांना स्क्रीन विडियोकोन अवार्ड, एम् टी.व्ही. बेस्ट व्हिडीओ अवार्ड आणि प्राइड ऑफ़ इंडिया गोल्ड अवार्ड मिळाले आहेत.
२००९ मध्ये पद्मश्री अवार्ड आणि २०१० मध्ये भारतीय गायिका मधुश्री सोबत एक ब्रिटिश चित्रपटासाठी गाने गायिले आहे.
२०१४ मध्ये श्रेया घोषाल यांच्यासोबत महिला दिवस निमित्त विशेष अल्बम मध्ये “ना हम जो कह दे” गाने गायिले आहेत. ज्यांना रामशंकर यांनी संगीतबद्ध केले आहे.
नारायण यानी टी.व्ही. शो “यह दुनिया गजब की” साठी गायक कुमार सानु यांच्या सोबत गाने गायिले आहे.
रियलिटी शो
नारायण सोनी टी.व्ही.वरील “इंडियन आयडल” मध्ये जज बनले होते. अन्नू मलिक,अलीशा चिनाय यांच्या सोबत त्यांनी जज म्हणून काम केले आहे.
यानंतर सोनी टी.व्ही.वरील एक आणखी रियलिटी शो “वॉर परिवार” मध्ये ही त्यांनी जज म्हणुन काम केले आहे.
हा शो गायकीच्या घरान्याशी सम्बंधित होता. त्यासोबत त्यांनी “जो जीता वही सुपर स्टार” आणि “सा रे गा मा पा” “लिटील चॅम्प्स” मध्ये पाहुण्यांची जबाबदारी साम्भाळली.
खाजगी जीवन
उदित नारायण मुंबई मध्ये राहतात. त्यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची पहिल्या पत्नीचे नाव रंजना नारायण झा आणि दुसरया पत्नीचे नाव दीपा नारायण झा आहे. पहिली पत्नी रंजना जिचा नारायण यानी अस्वीकार केला होता. त्यांना पत्नी म्हणून न मानल्यामूळे भारतीय महिला आयोगाने दबाव टाकल्यानंतर त्यांनी मान्य केले.
२२ जून २००६ मध्ये महिला आयोगाने मामल्याचे समिट करून घेण्यास सांगितले होते परन्तु ते अडून बसले. नंतर मामला प्रसारमाध्यमामध्ये चर्चेचा विषय झाल्यावर २१ एप्रिल रोजी त्यांनी रंजना हिस आपले पत्नी म्हणून मान्य केले.
एक अभिनेता म्हणून
नारायण यानी १९८५ मध्ये नेपाली फिल्म कुसुमे रुमाल मध्ये अभिनय केला होता. या फिल्मची सर्व गाने त्यांनीच गायिले. ही फिल्म नेपाल मध्ये टॉप टेन मध्ये जवळ जवळ २५ हप्ते राहिली.
ही फिल्म २००१ पर्यंत तुलसी घिमिरे आणि दर्पण छाया यांच्या रिलीज पर्यंत हाई ग्रोस्सिंग फिल्म म्हणून मानली जाते.
आकाशवाणी नेपाल मधून त्यांनी आपले करियर सुरु केल्यावर त्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचेपर्यंत ते बॉलीवूडचे प्रसिद्द पार्श्वगायक म्हणून आजही श्रोत्यांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करतात. त्यांच्यात एक उत्तम पार्श्वगायकातील सर्व गुण पाहायला मिळतात.
नारायण आपल्या मंत्रमुग्ध गीतांसाठी ओळखले जाते. त्यांचा आवाज त्यांची ओळख झाला आहे.
त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांमध्ये “पापा कहते है” “मेहँदी लगाके रखना” “परदेशी परदेशी जाना नहीं” आणि “ताल से ताल मिला” चा समावेश आहे.
हे पण नक्की वाचा –
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी उदित नारायण बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की हा प्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र – Udit Narayan Biography In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट : Udit Narayan Biography – उदित नारायण यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.