Uddhav Thackeray in Marathi
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उध्दव ठाकरे! एक राजकारणी असुन शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सुरूवातीला त्यांच्या “दैनिक सामना” चे कामकाज उध्दव ठाकरे पहात असत व शिवसेनेच्या निवडणुकीसंदर्भात कामकाजात लक्ष घालत असत.
2002 साली शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळाल्यावर अनेक जवाबदाऱ्या उध्दव ठाकरेंच्या खांद्यावर येत गेल्या 2003 मधे त्यांना शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. ज्यासुमारास उध्दव ठाकरेंना अध्यक्ष बनविण्यात आले त्यावेळी नारायण राणे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील वैचारीक मतभेद चव्हाटयावर येऊ लागले.
मतभेद वाढत जाऊन अखेरीस नारायण राणेंना शिवसेना पक्षातुन हाकलण्यात आले. नारायण राणेंसोबतच्या मतभेदांनंतर राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे या भावांमधे देखील मतभेद होऊ लागले आणि त्यामुळे राज यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकला आणि स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू केली.
उध्दव ठाकरे यांची संपूर्ण माहिती – Uddhav Thackeray Information in Marathi
उध्दव ठाकरे यांचा अल्पपरिचय – Uddhav Thackeray Mahiti
नाव (Name): | उध्दव बाळासाहेब ठाकरे |
जन्म (Birthday): | 27 जुलै 1960 |
वडिल (Father Name): | बाळासाहेब ठाकरे |
आई (Mother Name): | मिनाताई ठाकरे |
पत्नी (Wife Name): | रश्मी ठाकरे |
अपत्य (Childrens Name): | आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे |
राजकारणात येण्यापुर्वी उध्दव ठाकरेंना पर्यावरणाची आवड होती आज देखील त्यांनी काढलेल्या वन्यप्राण्यांच्या फोटोग्राफला पाहुन आपल्याला याची प्रचीती येते. ते उत्तम फोटोग्राफर आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची त्यांना फार आवड आहे.
या संबंधी प्रदर्शनांचं आणि पर्यावरणाशी संबंधीत कार्यक्रमांचे ते वेळोवेळी आयोजन करीत असतात. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असुन मुलांची नावे आदित्य आणि तेजस आहेत.
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आहेत आणि दुसरा मुलगा तेजस अमेरिकेत शिक्षण घेत आहे.
आपल्या वडिलांच्या आणि भावाच्या तुलनेत तेजस राजकारणापासुन आणि जनसंपर्कापासुन दुर राहाणेच पसंत करतो.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी उध्दव ठाकरे बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्