Tulsi Chi Aarti Marathi
आरती संग्रह या लेखाच्या माध्यमातून आज आपण पांडुरंगाला अत्यंत प्रिय असलेल्या आणि वारकऱ्यांच्या गळ्यातील पवित्र रत्न असणाऱ्या माता तुळसी यांच्या आरतीचे लिखाण करणार आहोत. तसचं, माता तुळसी यांच्या बाबत थोडक्यात माहितीचे लिखाण करणार आहोत.
तुळसीची मातेची आरती – Tulsi Aarti Marathi
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ।।धृ।।ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।
तुळसीची मातेची पौराणिक कथा – Tulsi Mata Story
आधुनिक काळात तुळसीला एक आयुर्वेदीक वनस्पती समजलं जात असलं तरी, हिंदू धार्मिक ग्रंथानुसार तुळसीला देवी लक्ष्मीचा अवतार मानलं आहे. त्याबद्दल अनेक पौराणिक कथा देखील प्रचलित आहेत.
त्यानुसार, प्राचीन काळात जालंधर नावाचा एक राक्षस होता जो आपल्या शक्तीच्या बळावर सर्वीकडे उत्पात माजवत होता. त्या राक्षसाचा सामना करण्याची हिम्मत कोणीच जुळवत नव्हत. जालंधर या राक्षसाच्या शक्तीचे मूळ कारण होते त्याची पत्नी वृंदा, ती एक सती पतिव्रता स्त्री होती.
पतिव्रता धर्मामुळे ती सदैव आपल्या पतीचे रक्षण करीत असे. त्यामुळे जालंधर हा नाहक देवतांना आणि ऋषीमुनी यांना त्रास देत असे. जालंधराच्या जाचाला कंटाळून देव भगवान विष्णू यांच्याकडे मदतीसाठी गेले. त्यांनी भगवान विष्णू यांना जालंधराचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. भगवान विष्णू यांनी आपल्या शक्तीच्या बळावर जालंधर या राक्षसाच्या शक्तीबद्दल माहिती मिळविली. तेव्हा त्यांना समजलं की, जालंधर यांची पत्नी एक पतिव्रता स्त्री असून ती सदैव आपल्या प्राणाची रक्षा करीत असते.
जालंधर या राक्षसाचा वध करण्यासाठी त्यांची पत्नी वृंदा यांची पतिव्रता भंग करणे आवश्य होती. परंतु, त्या स्त्रीला हात लावण्यास कोणाची हिम्मत होत नव्हती. भगवान विष्णू यांनी वृंदा यांची पतिव्रता भंग करण्यासाठी त्यांचे पती जालंधर यांचा अवतार घेतला. भगवान विष्णू जालंधरच्या रुपात जेंव्हा वृंदाच्या समोर गेले तेव्हा त्यांनी आपले पती म्हणून भगवान विष्णू यांना आलिंगन घातलं त्यामुळे त्यांची पतिव्रता भंग झाली.
तेव्हा देवानी जालंधर यांना मारलेल्या बाणाच्या साह्याने त्यांचे शीर तुटून पत्नी वृंदाच्या हातात पडले. तेव्हा त्यांना समजलं की आपण ज्यांना आलिंगन दिल ते आपले पती नाहीत. त्यांनी भगवान विष्णू यांना आपलं खर रूप दाखवण्यास सांगितलं.
जेंव्हा भगवान विष्णू आपल्या खऱ्या अवतारात वृंदाच्या समोर आले तेंव्हा वृंदाने त्यांना शाप दिला की, ज्या प्रमाणे मला माझ्या पतीचा विरह सहन करावा लागला त्याप्रमाणे तुम्हाला देखील तुम्ह्च्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल आणि तुम्ही दगड म्हणून या ठिकाणी पडून राहाल.
भगवान विष्णू वृंदाची क्षमा मागू लागतात, तेव्हा वृंदा भगवान विष्णू यांना प्रश्न करते की, तुम्ही माझी पतिव्रता भंग केली आता मला कोण स्वीकारणार? यावर भगवान विष्णू म्हणतात की मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नाही तर जे भाविक तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल. यानंतर वृंदा सती गेल्या. यानंतर राम अवतारामध्ये भगवान विष्णू यांना वृंदेच्या शापाला सामोरे जावे लागले, त्यांना माता सीता यांचा विरह सहन करावा लागला. वृंदेच्या शापाने भगवान विष्णू दगड म्हणून जमिनीवर पडून राहिले त्या दगडालाच “शालिग्राम” असे म्हणतात.
तसचं, ज्या ठिकाणी वृंदा सती गेली होती त्या ठिकाणी एक तुळसीचे रोप उगवले. तिलाच वृदांवन असे म्हटले जाते. भगवान विष्णू यांनी वृंदा यांच्याबद्दल असं म्हटलं होत की, तुझ्या सातीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. म्हणून शालिग्राम दगडाला देव मानून त्याचा तुळशी सोबत विवाह केला जातो. यांच्या विवाहालाच प्रभू विष्णू आणि माता महालक्ष्मी यांचा विवाह मानला जातो.
या तुळशीचा स्वीकार भगवान कृष्ण आणि पांडुरंगाने देखील केला आहे. म्हणून वारकऱ्यांनी तुळसीला आपल्या गळ्यात बांधले आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळसीला अनन्य साधारण असे महत्व आहे. तुळशीचा उपयोग अनेक आजाराव केला जातो. तुळशीला गुणकारी औषध म्हणून संबोधलं जाते. माता लक्ष्मीच्या रूपाने ओळखल्या जाणाऱ्या तुळशीच्या आरतीचे पठन आपण तुळसी विवाह प्रसंगी करत असतो. तर अश्या प्रकारे तुळसी संबंधी पौराणिक कथा प्रचलित आहे.