Torna Fort Information In Marathi
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे असल्या कारणामुळे त्याचे नाव तोरणा असे पडले.
तोरणा किल्ल्याची माहिती- Torna Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव (Fort Name) | तोरणा किल्ला |
स्थापना | 1470-1486 |
ठिकाण (Place) | वेल्हे तालुका, पुणे |
उंची (Height) | 1,403 मीटर (4,603 फूट) |
प्रकार (Type) | गिरिदुर्ग |
तोरणा हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस अति दुर्गम भागात उंच ठिकाणी पसरला असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला प्रचंडगड असे नाव दिले.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा या तालुक्यातून गेलेल्या सहयाद्री पर्वताचे पूर्व दिशेला दोन भागात विभाजन झाले आहे. त्यापैकी एका रांगेत तोरणा व राजगड हे किल्ले वसले असून दुसऱ्या पर्वताच्या रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात.
पुणे जिल्ह्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांश दरम्यान हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहेत. तसचं, गडाच्या पश्चिमेला कानद खिंड असून, गडाच्या पूर्व दिशेला बामण व खरीव खिंडी आहेत.
तोरणा किल्ल्याची ऐतिहासिक माहिती – Torna Fort History In Marathi
पुणे जिल्ह्यापासून सुमारे ६० किमी दूर असलेल्या तोरणा किल्ल्याच्या निर्मिती बाबत कोणत्याच प्रकारचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी, येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा किल्ला पूर्वी शैवपथांचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान हा किल्ला बहमनी यांच्या राजवटीत होता.
यानंतर निजाम शायांनी हा किल्ला जिंकून त्याला निजामशाहीत समविष्ट केले. परंतु, इ.स. १६४७ साली सक मलिक अहमद छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याच्या उद्देश्याने जेंव्हा किल्ले जिंकण्यास सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या दृष्टीस सहयाद्री पर्वताच्या पूर्वेस वसलेला हा किल्ला पडला.
तोरणा हा किल्ला अति दुर्मिळ भागात असल्याने त्या किल्ल्यावर किल्लेदारा सोबत त्याचे काही मोजकेच सहकारी हजर होते. शिवाय, किल्ल्याचा किल्लेदार हा मराठी असल्याने शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकायला फारसा वेळ लागला नाही.
शिवाजी महाराजांनी किल्लेदारास बोलावणी पाठवून त्यांच्याशी संगनमत केले व किल्ला स्वराज्याशी जोडला. किल्ल्यावरील निजामशाहीचा झेंडा खाली उतरवून त्यावर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू लागला. किल्ल्याची प्रशस्त वास्तू पाहून शिवरायांनी किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले.
किल्ला हा अति प्राचीन असल्याने किल्ल्याची डागडुजी करण्यात आली त्यादरम्यान किल्ल्यावर काम करीत असलेल्या मजुरांना सोन्याच्या मोहरांनी भरलेली २२ हंडे मिळाले. शिवरायांनी यास स्वराज्याच्या स्थापनेतील दुसरा शुभ संकेत मानून त्यांनी या मोहरांच्या माध्यमातून तोरणजाईची स्थापना केली.
तसचं, या किल्ल्यापासून जवळ असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडाची निर्मिती करून त्यास स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले. अश्याप्रकारे शिवरायांनी जिंकलेल्या बालेकिल्ल्यातील तोरणा हा एक महत्वपूर्ण किल्ला असून शिवरायांचा इतिहास आठवून आपण या किल्ल्याच्या भेटीला अवश्य जायला पाहिजे.
Torna Killa Mahiti
शिवाजी महाराज आग्ऱ्याहून मुघलांच्या तावडीतून निसटून आल्यानंतर त्यांनी आपल्या स्वराज्यातील अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांपैकी तोरणा या किल्ल्यावर त्यांनी सुमारे पाच हजार होन इतका खर्च केला होता.
शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे शासक पद छत्रपती शंभू महाराज यांच्याकडे आले. मुघल शासक औरंगजेब यांनी त्यांना मोठ्या फितुरीने पकडून त्यांचा वध केला. त्यामुळे हा किल्ला पुन्हा मुघलशाहीत गेला. यानंतर मराठा सचिव शंकराजी नारायण यांनी या किल्ल्यावर हल्ला चढवून किल्ला मराठ्यांच्या ताब्यात घेतला. परंतु, इ.स. १७०४ साली मुघल शासक औरंगजेब यांनी या किल्ल्याला वेढा देऊन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व या किल्ल्याला त्यांनी नाव दिल फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय.
परंतु, मराठा शासक सरनोबत नागोजी कोकाटे यांनी या गडावर हल्ला चढवीत किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला. यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातच राहिला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजपूत राजे जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदर तहाच्या वेळी हा किल्ला महाराजांकडेच राहिला होता. या किल्ल्याबाबत विशेष बाब म्हणजे मुघल शासक औरंगजेब यांनी लढाई करून मराठ्यांचा जिंकलेला हा एकमेव किल्ला आहे.
गडावर पाहण्याजोगी निसर्गरम्य स्थळे – Places To See Around Torna Fort
सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असलेल्या तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे मंदिर असून, मंदिर अति प्राचीन आहे. याच मंदिराच्या परिसरात खोदाईचे काम करीत असतांना मावळ्यांना मोहरांनी भरलेले हंडे सापडले होते. किल्ल्याकडे जात असतांना आपल्याला वाटेत तोरण टाके व खोकड टाके दिसतात. त्यापुढे मेंगाई देवीचे मंदिर आहे.
रात्रीच्या वेळी मंदिरात १० ते १५ लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. परंतु, जेवणाची सोय ही आपल्याला स्वता:च करावी लागते. मेंगाई देवीच्या मंदिरात नवरात्री निम्मित लोकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.
वेल्हे गावातील लोक मंदिरात नवरात्री उत्सव साजरा करित असतात. मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असतांना हनुमान बुरुज, भेल बुरुज, सफेली बुरुज, माळेचा बुरुज, आणि लक्कडखाना आहे.
तोरणा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग – How To Reach Torna Fort
तोरणा हा किल्ला सहयाद्री पर्वताच्या अति दुर्मिळ भागात वसलेला असून, पुणे जिल्ह्यांतील इतर किल्ल्यांप्रमाणे त्यांच्यावर चढाई करणे देखील तितकेच अवघड काम आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी तीन ते चार मार्ग असून, आपणास राजगड किल्ल्याकडून किंवा, भट्टी गावातून या गडाची चढाई करता येते. असे असले तरी, किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हा या गावातून जाणेच योग्य.
पुण्यावरून वेल्हा गावाचे अंतर सुमारे ६० किमी असून, सातारा वेल्हा हे अंतर १०० किमी आहे.
तसचं, मुंबई वेल्हा हे अंतर १९९ किमी आहे. या ठिकाणावरून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
किल्ल्यावर जातांना लक्षात ठेवण्यासारखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे किल्ला हा अति उंच स्थळी असल्याने जास्त उत्साहित न होता, स्वत:कडे लक्ष देण खूप गरजेचे आहे.