Titanic Ship History in Marathi
टायटॅनिक जहाजाविषयी आपण बरेचदा ऐकलेलं, वाचलेलं किंवा पाहिलेलं असेलच. आपण “टायटॅनिक” हा चित्रपट पाहिला असेल जो खरोखरच्या टायटॅनिक जहाजावर बनलेला आहे. ज्यांनी तो चित्रपट पाहिला नसेल त्यांच्या माहिती साठी टायटॅनिक जगातील सर्वात मोठे जहाज होते. त्या जहाजाला बुडून १०८ वर्ष पूर्ण झालेत, आणि आजच्या लेखात आपण टायटॅनिक विषयी आणखी अधिक माहिती पाहूया की एवढे मोठे जहाज कश्या प्रकारे समुद्रात बुडाले आणि बुडाले तर त्या जहाजाला आज पर्यंत बाहेर का काढले गेले नाही? आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार तर चला पाहूया. सर्व रहस्यमय प्रश्नांची उत्तरे.
टायटॅनिक चे जहाज अजून हि समुद्रातच का? – Is the Titanic ship still at sea? and Titanic Jahaj History
टायटॅनिक जहाज होते कसे? – Titanic Jahaj History
हे एक स्पेशल जहाज होते आणि या जहाजावर हजारो प्रवाशी एकाच वेळी प्रवास करू शकत होते तेव्हाच्या काळातील सर्वात मोठे जहाज म्हणून “टायटॅनिक” ला ओळख मिळाली होती. या जहाजावर एकाच वेळी हजारो लोकांचे जेवण बनत असे हे जहाज एवढे मजबूत होते की या जहाजाला कोणीही टक्कर देऊ शकत नव्हते. आताच्या पंच तारांकित हॉटेल्समध्ये ज्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध असतात त्याच प्रमाणे या जहाजात सर्व सुविधा उपलब्ध होत्या.
टायटॅनिक जहाज कसे बुडाले? – Titanic Ship Story
बऱ्याच जणांनी “टायटॅनिक” चित्रपट पाहिला असेल तर त्यांना माहिती असेल ही घटना कशी झाली होती, परंतु ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्या साठी या प्रश्नाचे उत्तर आपण पाहुयात. टायटॅनिक जहाज बनवल्या नंतर त्या जहाजाची पहिली यात्रा ही ब्रिटनच्या साउथैम्पटन बंदरापासून न्यूयॉर्क साठी रवाना होणार होते, आणि ते १० एप्रिल १९१२ ला दुपारच्या वेळेला रवाना झालेही तेही हजारो प्रवाशांना घेऊन.
परंतु १४ एप्रिल १९१२ च्या रात्री ह्या जहाजाची टक्कर उत्तर अटलांटिक महासागरातील एका मोठ्या हिमखंडाशी झाली आणि हे जहाज दोन तुकड्यांमध्ये तुटून पडले. ह्या जहाजाचे तुकडे खाली ३.८ किलोमीटर पर्यंत जाऊन समुद्रात सामावून गेले. या समुद्रात झालेल्या घटनेत त्या जहाजातील जवळ जवळ १५०० लोक मरण पावले होते. आणि ही तेव्हाची सर्वात मोठी समुद्रातील घटना मानल्या जाते.
या घटनेनंतर ७० वर्ष टायटॅनिक जहाज समुद्रात तसेच पडून होते. त्या जहाजाचे अवशेष समुद्रात पडलेले होते. त्यांनंतर रॉबर्ट बलार्ड आणि त्यांच्या टीमने सर्वात आधी १९८५ साली या जहाजाच्या अवशेषांना समुद्रात शोधून काढले होते.
अवशेष सापडले तर त्यांना आजपर्यंत बाहेर का काढले गेले नाही?
लेख वाचताना आपल्या मनात सुध्दा हा प्रश्न निर्माण झाला असेल की जर जहाज कोणत्या ठिकाणी बुडाले होते आणि त्याचे अवशेष सापडले तर त्यांना आजपर्यंत बाहेर का काढले नाही. तर आपल्या माहिती साठी जेव्हा रॉबर्ट बलार्ड यांनी आणि यांच्या टीमने ह्या जहाजाच्या तुकड्यांचा शोध लावला तेव्हा ही माहिती समोर आली की ज्या ठिकाणी जहाज बुडाले होते त्या पाण्यात खाली गेले तर तापमान हे १ डिग्री सेल्सिअस च्या खाली जाते.
म्हणजे जर एखादी व्यक्ती पाण्यात खाली ४ किलोमीटर पर्यंत मोठ्या मेहनतीने पोहचली तरीही ती व्यक्ती बाहेर येणे खूप कठीण आहे आणि जहाजाचे तुकडे बाहेर काढणे त्यापेक्षाही कठीण. म्हणजेच जहाजाचे अवशेष चार किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये जाऊन बाहेर काढणे जवळजवळ अशक्यच आहे. म्हणून आजपर्यंत कोणीही त्या जहाजाच्या तुकड्यांना बाहेर काढू शकले नाही.
आता असेही म्हटले जाते की समुद्रात जास्त दिवस टायटॅनिक चे तुकडे राहू शकत नाही, कारण जहाजाचे तुकडे समुद्राच्या पाण्यामुळे विरघळत आहेत. त्या क्षेत्रातील काही मान्यवरांचे असेही म्हणणे आहे की येणाऱ्या २०-३० वर्षात जहाज पूर्णपणे समुद्रात सामावून जाईल. जहाजाचा कोणताही अवशेष पुन्हा दिसणार सुध्दा नाही. यामागे असे कारण आहे की समुद्राच्या पाण्यात असणारे जिवाणू जहाजाच्या लोखंडी आवरणाला कुर्तळून नष्ट करत आहेत आणि दिवसाला १८० किलो जहाजाला नष्ट करत आहेत. म्हणून वैज्ञानिक लोकांचे असे मत आहे की टायटॅनिक चे वय आता जास्त दिवस राहिले नाही.
तर आजच्या लेखात आपण टायटॅनिक जहाजाविषयी थोडक्यात माहिती पाहिली आणि या जहाजाचे अवशेष समुद्रातून आजपर्यंत बाहेर का काढले गेले नाही यामागचे कारण सुध्दा पाहिले तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!