Time Thoughts in Marathi
प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी.
Time Thoughts
वेळे पेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही ती वेळ कशी वापरता.
Vel Quotes in Marathi
आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.
Vel Quotes
जर काही काम करत असाल तर घड्याळाकडे पाहू नका आणि काही काम करत नसाल तर अवश्य घड्याळाकडे पहा.
Vel Suvichar Marathi
वेळ दिसत नसली तरीही बरच काही दाखवून देते.
मानवाला ईश्वराने समान वेळ दिली आहे, मी आयुष्यमाना बद्दल नाही बोलत आहे तर, मानवी जीवनामध्ये काहीतरी नविन करण्यासाठी सर्वांना समान संधी दिली आहे. शालेय जीवनापासून महाविद्यालयीन काळापर्यंत, तसेच नोकरीच्या ठिकाणी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात आपण सर्वांना एकसमान संधी देलेली असते. परंतु सर्वच व्यक्ती याचा लाभ घेऊ शकत नाहीत. प्रत्येक व्यक्तींची योग्यता ही वेगवेगळी असते. आपल्या कार्यक्षमतेनुसारच ते आपल्या जीवनात यशस्वी होतात.
म्हणून म्हणतो यशस्वी जीवन जगायचे असेल, तसेच आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले जीवन जगायला द्यायचे असेल तर आपण आजचं वेळे बद्दल जागरूक होणे गरजेचं आहे. “वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही.”
वरील लेख मी मला आलेल्या अनुभवातून लिहिला आहे, तरी आपण सुद्धा यातून काही अनुभव घेऊन आपलं आयुष्य सुंदर बनवा.