Telephone History
माणसा माणसातलं अंतर कमी करण्याकरता कितीतरी संशोधन होत आली आहेत, होत आहेत आणि यापुढे देखील निरंतर होत राहाणार आहेत.
प्रवासातला वेळ कमी कसा करता येईल याकरता संशोधन झाली आणि बैलगाडीपासुन आज विमानापर्यंत आपण येउन पोहोचलो आहोत.
एकमेकांच्या संपर्कात राहाण्याकरता आपण कसला कसला वापर केला यावर जरा दृष्टीक्षेप टाकुन तर बघा, कितीतरी गोष्टी आपल्या नजरेसमोर येतील.
एकमेकांच्या संपर्कात राहाण्याकरता फार फार पुर्वी कबुतराचा किंवा अन्य पक्षांचा वापर व्हायचा (जे आता आपल्याला फक्त चित्रपटात बघायला मिळतं), त्यानंतरच्या काळात घोडयावरून माणसं पाठवली जायची संदेशवहनाकरता.
पुढे पोस्टाच्या मदतीने पत्रव्यवहार सुरू झाला, अगदीच तातडीचे असेल तर तार पाठवली जायची..
असं करता करता टेलीफोन, मोबाईल आणि काय काय याची यादी न संपणारी.
यात ऐतिहासिक अशी कामगिरी म्हणजे मला वाटतं एकमेकांचा आवाज ऐकायला मिळणं हीच असावी कारण त्या काळी तसा विचार देखील कुणाच्या मनाला शिवला नसेल.
जाणून घ्या टेलिफोन चा इतिहास मराठींमध्ये – Telephone History in Marathi
टेलिफोन ची मराठी माहिती – Telephone Information
एकमेकांचा आवाज एकमेकांना ऐकु येईल अशी कल्पना जेव्हां प्रत्यक्षात उतरली तेव्हां सामान्यांना तो आश्चर्याचा सुखद धक्का ठरला.
आणि ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट ज्यानं प्रत्यक्षात उतरवली त्या वैज्ञानिकाचं नाव आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल!यांनाच टेलीफोनचा जनक मानल्या जातं.
१८४७ साली स्कॉटलंड इथं जन्मलेले अमेरिकी वैज्ञानिक अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
टेलिफोनच्या अस्तित्वाची शक्यता ग्रॅहम बेलच्या त्या वाक्यानं स्पष्ट होते!
ते म्हणाले होते, “जर मी वीजेच्या तीव्रतेला आवाजाच्या चढ-उतारानुसार त्याचप्रकारे कमीजास्त करण्याची व्यवस्था करू शकलो, जसे आवाजाच्या वेळेला हवेच्या घनत्वा मधे होते, तर मी मुखातुन बोललेल्या शब्दांना टेलिग्राफ विधी च्या साहाय्याने एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोहाचवण्यात समर्थ होऊ शकेल!’’
ग्राहम बेलने आपल्या या निश्चयाला घेउन आपल्या सहायक थॉमस वॉटसन च्या मदतीने टेलिफोन पध्दती चा आविष्कार करायला प्रारंभ केला, अंततः १० मार्च १८७६ साली त्यांनी असे यंत्र बनवण्यात सफलता मिळवली ज्याव्दारे त्यांनी वॉटसन ला संदेश पाठवला “मीस्टर वॉटसन इकडे ये! मला तुझी आवश्यकता आहे’’.
योगायोगाने त्याच सुमारास अमेरिकेत अन्य काही शास्त्रज्ञ देखील याच कामावर आपले लक्ष केंद्रीत करून होते,
.ग्रॅहम बेल ने जेव्हा आपले यंत्र पेटंट करण्याकरता विनंती अर्ज केला त्याच्या अवघ्या तीन तासानंतरच एलिशा ग्रे नावाच्या शास्त्रज्ञाने देखील सारख्याच प्रयोगाकरता आपले पेटंट बद्दल चे निवेदन दिले. पुढे यावर मोठा वादविवाद झाला, बऱ्याच न्यायालयिन लढयानंतर ग्रॅहम बेल विजयी झाले आणि टेलिफोन चे जनक ठरले.
Telephone cha Itihas
पुढे ग्रॅहम बेल च्या वारसदारांनी आणि अनुयायांनी अमेरिकेत टेलिफोन संचारव्यवस्थेचा प्रसार केला.
सुरूवातीला मोठया शहरांपुरतीच मर्यादीत असलेली ही टेलिफोन सेवा त्यानंतर एका शहरातुन दुसऱ्या शहरासाठी (ट्रांकॉल) सुध्दा उपलब्ध झाली.
काही वर्षांपश्चात अमेरिकन टेलिफोन कंपनी आणि टेलिग्राफ कंपनी ने बेल कंपनी कडुन टेलिफोन प्रणाली विकत घेतली, या कंपन्यांनी जलदगतीने याचा प्रचार आणि प्रसार केला आणि याचे जाळे सर्वदुर पसरवण्यास सुरूवात केली.
काही देशांनी सुरूवातीला टेलिफोनला याकरता देखील नाकारलं कारण याच्या येण्याने टेलिग्राफ वर मोठया प्रमाणात विपरीत परिणाम होईल.
पुढे पुढे मात्र टेलिफोनची उपयुक्तता कळल्यानंतर त्यांचा विरोध मावळला आणि टेलिफोनचे जाळे सर्वदुर पसरले.
ग्रेट ब्रिटन ने तर सुरूवातीला पुर्वग्रहदुषीत आणि भयग्रस्त होत या प्रणालीला नाकारले परंतु १८८० साली ब्रिटीश न्यायालयाच्या निर्णयानंतर याला डाक विभागाचे एक अंग मानण्यास सहमती दर्शवली.
पहिल्या विश्वयुध्दापुर्वी पर्यंत टेलिफोन संचार प्रणालीची अवस्था अत्यंत दयनीय अशीच होती पण त्यानंतर मात्र ग्रेट ब्रिटन ची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर यात आश्चर्यकारक प्रगती झाली.
१९११ मध्ये जेव्हां केवळ ७ लाख पोस्ट कार्यालयांमधे टेलिफोन होते १९१२ मध्ये ते वाढुन त्यांची संख्या ४० लाखावर गेली.
सुरूवातीला जेव्हां ग्रॅहमबेल ला यांच्या पेटंट करता लढाई लढावी लागत होती तेव्हां ते त्यातच अडकुन न पडता अन्य शोधांचा अभ्यास करण्यात आणि कर्णबधीर लोकांकरता कार्य करण्यात व्यस्त होते.
कर्णबधीर लोकांकरता देखील त्यांच फार मोठ योगदान आहे.
आज जेंव्हा आपण फोन वाजल्यानंतर म्हणतो “टेलिफोनची बेल वाजते आहे’’ ते बेल म्हणजे ग्रॅहम बेल यांचच नाव आहे.
ग्रॅहम बेल यांच्या विषयीच्या आणि टेलिफोन च्या काही विशेष बाबी – Telephone Inventor Alexander Graham Bell
ग्रॅहम बेल यांना आपल्या टेलिफोन च्या आविष्काराकरता पेटंट ची जी न्यायालयीन लढाई लढावी लागली ती आजवरच्या इतिहासात पेटंट ची सर्वात दिर्घ चालणारी लढाई होती.
बेल ने आपल्या जीवनात इतर वैज्ञानिक कामकाजाला सुरूच ठेवलं आणि राष्ट्रव्यापी विभीन्न शोधकेंद्र स्थापीत करण्याकरता आपल्या यशस्वीतेला आणि आपल्या धनाला खर्च केलं.
इतक्या मोठया शोधानंतरही त्यांना स्वतःला “कर्णबधीरांचा शिक्षक’’ म्हणवुन घ्यायला आवडायचं आणि त्या क्षेत्रात त्यांची कामगिरी अतुलनिय अशीच राहीली.
२ ऑगस्ट १९२२ साली वयाच्या ७५ व्या वर्षी मधुमेहाने त्यांचे निधन झाले.
तर हि होती ग्राहम बेल विषयी व टेलिफोन विषयी थोडक्यात माहिती. माझी मराठी शी जुळलेले रहा अशेच नवीन लेख वाचण्यासाठी.