Teachers Day Speech in Marathi
“गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः”
जीवनात शिक्षक नसेल तर आपले जीवन जीवन म्हटले जाणार नाही कारण एक शिक्षकच असतो जो जीवनातील उणीवांशी आपल्याला भेटून देतो, आणि त्या उणीवांना कश्या प्रकारे आपण पूर्ण करू शकतो या विषयी सांगू शकतो,
प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वपूर्ण आधार एक शिक्षक असतो, वर्षात खूप कमी दिवस असे येतात कि तेव्हा आपण आपल्या शिक्षक किंवा गुरूंनी आपल्यासाठी जे केले त्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करू शकू, ५ सप्टेंबर या दिवशी देशात शिक्षक दिन साजरा केल्या जातो, या दिवसाला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
शिक्षक दिनासाठी एक सुंदर भाषण – Teachers Day Speech in Marathi
तर आजच्या लेखात आपण शिक्षक दिनावर एक छोटस भाषण पाहणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये किंवा मुलांना शाळेत शिक्षक दिनावर दोन शब्द बोलण्यासाठी उपयोगी येईल, आणि हे शिक्षक दिनावरील एक छोटस भाषण प्रत्येक शिक्षकाला समर्पित असेल,
तर चला वळूया भाषणाकडे.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, अतिथी गण, शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण येथे कशासाठी जमलो आहोत हे सर्वांना माहिती आहेच,
आज दिनांक ५ सप्टेंबर, म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. आणि त्यांच्या जयंती च्या दिवशी साजरा केला जाणारा शिक्षक दिन. तर आज मी शिक्षक दिनाविषयी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे, तरीही तुम्ही ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती आहे,
आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन, शिक्षक प्रत्येकाच्या जीवनातील एक असे पात्र आहे, जे हरवलेल्यांना दिशा दाखविण्याचे काम करतात. पुरातन काळापासून आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्याच्या नात्याला पवित्र मानले जाते,
अनेक लेखकांनी तसेच महान संतांनी गुरु चे महात्म्य आपल्या मुखातून आणि लेखणीतून सर्व जगाला सांगितले आहे, शिक्षक असा कलाकार आहे जो आकार नसलेल्या दगडाला सुद्धा एका मूर्तीत रुपांतर करू शकतो.
आजच्या दिवशी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते, देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान केला जातो, सोबतच देशाचे राष्ट्रपती त्यांना पुरस्कार देतात, तेही उपराष्ट्रपती आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे, पण या दिवसाला शिक्षक दिवस म्हणून का साजरे केले जाते आपल्याला माहिती आहे का?
नाही, तर मी आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या काही विधार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला, कि या दिवसाला देशातील शिक्षकांच्या सन्मानाप्रित्यर्थ साजरा केला जावो तेव्हा डॉ. राधाकृष्णन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
या मंजुरीनंतर देशात ५ सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला. आजही आपल्या येथे आपण हा दिवस साजरा त्यामुळेच करू शकत आहोत.
शिक्षकांविषयी कितीही बोलावे ते कमीच आहे, शिक्षक आपल्याला योग्य अयोग्य या गोष्टींमधील फरक दाखवून देतात, सोबतच आपल्यामध्ये दया, क्षमा, शांती या गुणांची भर टाकतात.
दुसऱ्यांच्या प्रती आपली वागणूक कशी असावी या गोष्टींची शिकवण शिक्षकच आपल्याला देत असतात. एक शिक्षकच आपल्याला जीवनात यशाच्या मार्गाला सोपे करण्याचे कार्य करत असतो, माणसाला शिस्त लावण्याचे कर्तव्य एक शिक्षकच करत असतो.
आम्हाला आपल्यारख्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले हे आमचे सौभाग्य. शिक्षकांच्या विना माणसाचे जीवन हे एका विना नाविकाची एक नाव असते, जेव्हा माणसाच्या जीवनात शिक्षक येतो तेव्हा माणसाच्या जीवनाची हि नाव सात समुद्र फिरून सुद्धा किनाऱ्यावर येऊ शकते.
प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते कि “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,” बरोबर शिक्षण हे वाघिणीचे दुध आहेच, पण जर “शिक्षण हे वाघिणीचे दुध असेल तर आपले शिक्षक सुद्धा कोणत्या वाघापेक्षा कमी नाहीत.”
कारण यासाठी कि “वाघिणीचे दुध पाजण्यासाठीही एका वाघाची गरज असते आणि तो वाघ शिक्षक रुपात आपल्या समोर आहे.”
गुरुचे महात्म्य संत कबीरांनी सुद्धा त्यांच्या दोह्यांमध्ये सांगितले आहे, कबीर महाराज म्हणतात कि
“गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय।
बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।।”
याचा अर्थ असा कि गुरु आणि भगवान परमात्मा एकत्र उभे असतील तर कोणाला प्रणाम करावा,
गुरूला कि भगवान परमात्म्याला? अश्या स्थितीमध्ये गुरूंना अगोदर प्रमाण करावा कारण गुरूंच्या कृपेनेच आज भगवान परमात्म्याचे दर्शन आपल्याला झाले आहे.
इतक्या छान शब्दांमध्ये संत कबीर यांनी गुरूचा महिमा आपल्याला सांगितला. कि गुरु हा भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या शिक्षकांचा आदर करायला हवा, आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे पालन करायला हवे.
आपण नेहमी म्हणतो कि “विध्यार्थी हे देशाचे भविष्य आहे” “विध्यार्थी हे देशाचे भविष्य असतील तर शिक्षक त्या भविष्याची जडण घडण करणारा एक उत्तम कलाकार आहे.”
शिक्षांचे आपल्या जीवनातील महत्व सांगितले तितके कमी आहे, आम्हाला अभिमान आहे कि आपल्यासारखे शिक्षक आम्हाला मिळाले, आपल्या सर्व शिक्षकांच्या कृतज्ञेत हे भाषण समर्पित करून मी माझे दोन शब्द संपवितो,
जय हिंद जय भारत.
आशा करतो आपल्याला मी लिहिलेले हे छोटस भाषण आवडले असणार आपल्याला हे छोटस भाषण कसे वाटले आम्हाला सोशल मिडीयावर कळवायला विसरू नका, आपल्याला हे भाषण आवडल्यास या भाषणाला आपल्या मित्रांना तसेच विधार्थी मित्रांना शिक्षक दिनासाठी पाठवायला विसरू नका,
सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us.