Benefits and Types of Tea
कधी कोणी विचारलं की जीवनात आनंद कशाला म्हणतात तर चाय प्रेमी हमखास एकच उत्तर देतील चहा पिण्यात जो आनंद आहे तो जगात कोणत्याही गोष्टीत नाही, चहा वर काय भारी भारी डायलॉग बनलेले आहेत अजबच!
“दोन चहा एक खारी आपली मैत्री लय भारी!”
फक्त एकच नाही असे कित्येक डायलॉग चा जन्म फक्त चहा मुळे झालेला आहे. आणखी एखादा डायलॉग वाचायला आवडेल का? बर सांगतो,
“खड्यात गेली दुनियादारी चहा आमचा जगात भारी”
अश्याच प्रकारचे बरेच डायलॉग आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतील.
कारण भारतात लोकांच्या शरीरात रक्त कमी आणि चहा जास्त वाहतो, मस्करी होती बर का! पण खरंच भारत देश जगात चहाचे उत्पादन करण्यात सुध्दा अग्रेसर आहे आणि पिण्यात सुध्दा.
तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चहांचे दर्शन या लेखातून घेणार आहोत, आणि त्यांच्यापासून होणारे फायदे सुध्दा पाहणार आहोत तर चला पाहूया, अशेच काहीशे आगळे वेगळे चहाचे प्रकार.
ज्या प्रमाणे बाकीचे जागतिक दिन साजरे केले जातात त्याच प्रमाणे तुमच्या आणि माझ्या सारख्या लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी २२ मे ला जागतिक चहा दिवस म्हणून साजरे केल्या जाते. खरंच! किती गर्वाची गोष्ट आहे ना आपल्या सारख्या चहाच्या शौकीन लोकांसाठी. एका सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की चहा मनुष्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा उल्लेख केला गेलेला होता. तर खाली काही चहाचे प्रकार पाहूया.
चहाचे काही खास फायदे – Health Benefits of Tea in Marathi Language
१) ब्लॅक टी – Black Tea
या चहा चे नाव वाचून गोंधळून जाण्याचे काहीही कारण नाही या चहाला आपण चांगल्या प्रकारे ओळखतो, जेव्हा घरात दूध उपलब्ध नसेल तेव्हा हाच चहा आपण पित असतो आणि या चहाला आपण काळा चहा म्हणून ओळखतो. आपल्या माहिती साठी या चहाचे निर्माण भारत, चीन, तिब्बेत, मंगोलिया या सारख्या देशात होते. सर्वात आधी या चहाच्या पानांना तोडून त्यांना उन्हात वाळवून त्यांनतर त्याची चहापत्ती बनविल्या जाते. हा चहाचा प्रकार जवळपास सर्वाना माहिती आहे. म्हणून जेव्हा आपल्या घरी आपले डोके दुखत तेव्हा लगेच आपली आई आपल्याला म्हणते काळा चहा घे बरं वाटेल, यानंतर पाहूया पुढचा प्रकार.
२) ग्रीन टी – Green Tea
वजन कमी करण्यासाठी सर्वाना फुकट मध्ये मिळणारा सल्ला म्हणजे ग्रीन टी पिणे चालू कर फरक पडेल. ग्रीन टी चे उत्पादन भारत आणि चीन ह्या दोन देशात मोठ्या प्रमाणात केले जाते. या ग्रीन टी ला पिण्याने मानवाच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात असे समोर आले आहे. या ग्रीन टी मुळे मधुमेह, कॅन्सर, आणि मानसिक आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. सोबतच वजन कमी करण्यास सुध्दा ग्रीन टी फायदेमंद ठरते.
३) रेड टी – Red Tea
आपण म्हणाल की हा कुठला नवीनच चहा आहे, मी आपल्याला सांगेल हा नवीन चहा नसून दक्षिण आफ्रिकेमध्ये “एस्पैलाथस” नावाच्या एका झाडा पासून या चहाचे निर्माण होते, या चहाला “रूबॉस टी” नावाने सुध्दा संबोधले जाते. एवढंच नाही तर हा रेड टी ही ग्रीन टी पेक्षा अधिक प्रमाणात फायदेशीर मानली जाते. या चहामुळे आपली पाचन शक्ती मजबूत होण्यास मदत होते. सोबतच शरीरातील आजारांशी लढण्यासाठी सुध्दा ही टी फायदेमंद ठरते.
४) येलो टी – Yellow Tea
नावावरूनच आपल्याला प्रत्येक चहाचा रंग समजतो, जसे या चहाचा रंग हा पिवळा असतो आणि या चहाचे उत्पादन चीन मध्ये मोठ्या प्रमाणात होते. आणि आज संपूर्ण जगात जर हा चहा पिल्या जात असेल तर तो चीन मुळे. ग्रीन टी नंतर जगात सर्वात जास्त पिल्या जाणाऱ्या चहापैकी एक चहा म्हणजे येलो टी. ही येलो टी ची चव ही फळांसारखी असते, आणि या चहाला विशेष प्रकारे बनविल्या जाते. जेणेकरून चहाचा रंग पिवळा होईल.
५) पिंक टी – Pink Tea
आपल्याला या लेखात सर्व चहाचे नाव रंगाने सुरू झालेलेच दिसणार, त्याच प्रकारे ही चहा सुध्दा सगळीकडे पिंक टी म्हणून ओळखल्या जाते पण या चहाला मोठ्या प्रमाणात काश्मीर ची चहा म्हणून ओळखल्या जात. या चहाला पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. सोबतच शरीरातील कॅलरीज ला नियंत्रित ठेवण्याचे काम करते. शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. या प्रकारे पिंक टी चे फायदे आहेत.
या वरील लेखात आपण वेगवेगळ्या चहांचे प्रकार पाहिले आणि त्यांच्या पासून होणारे फायदे सुध्दा जाणून घेतले, आपण दररोज ज्या चहाला पितो त्या चहा पासून सुध्दा आपल्या शरीराला या पेक्षाही बरेच फायदे होतात. आशा करतो हा वेगवेगळ्या चहांचा माहितीपर लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!