Tapori Birthday Wishes in Marathi
आपल्या मित्राचा बर्थ डे आहे आणि आपण शुभेच्छा द्यायचे राहू असे कधी होणार का? नाही ना भावाचा बर्थ डे म्हटलं कि पार्टीच्या आधी शुभेच्छा महत्त्वाच्या, मग त्यासाठी आपल्याला आणखी मेहनत नाही घ्यावे लागेल, म्हणून आपल्यासाठी खास मराठमोळ्या भाषेत काही विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहेत, या शुभेच्छा आपल्या मित्रांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पाठवायला मदत होईल, तर चला पाहूया आज काही वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
वाढदिवसाच्या भन्नाट टपोरी शुभेच्छा – Tapori Birthday Wishes in Marathi
“सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा Party बिना बोले देणारा Cool Mind असलेल्या भावाला Happy Wala Birthday.”
“भाऊ शिवाय जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय, अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा.”
Comedy Birthday Wishes in Marathi
“दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा”
Funny Birthday Wishes in Marathi
“अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या .. … … भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.”
Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend
मित्रासोबत आपण या शुभेच्छा शेयर करून त्यांचा वाढदिवस साजरा करू शकता, आणि या कोट्स च्या माध्यमाने तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता, तर पुढेही अश्याच काही शुभेच्छा आहेत ज्या कि थोड्याश्या गमतीदार आहेत.
“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
Comedy Birthday Wishes in Marathi
“आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर, आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा”
“करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ, तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे, मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे, भर चौकात राडा करणारे, पल्सर १५० चे मालक, कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे, अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Crazy Birthday Wishes in Marathi
“तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण, लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
“आपल्या भावाला वाढदिवसाच्या गुलीगत शुभेच्छा”
तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील आपल्याला ह्या शुभेच्छा आवडल्या असतील तर या शुभेच्छांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!