Swami Vivekananda Information in Marathi
विश्व विख्यात भारतीय युवा संन्यासी म्हणून कीर्ती मिळविणारे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून देशा विदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध दरवळला. त्यांनी आपल्या देशांतील युवकांना भावी जीवनांत आपण आपल्या कर्मा प्रती कश्याप्रकारे सक्रीय असलो पाहिजे याची शिकवण दिली.
स्वामी विवेकानंद नेहमीच आपल्या कर्मावर विश्वास ठेवत असतं. आपले ध्येय साध्य होईपर्यंत आपण सतत प्रयत्न करत राहणे खूप आवश्यक आहे. असे ते आपल्या देशांतील तरुणांना सांगत असतं.
“चला उठा जागे व्हा, आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही.”
अश्या प्रकारचे महान विचार त्यांनी देशांतील युवकांसमोर मांडले. ‘योग’, ‘राजयोग’, आणि ‘ज्ञानयोग’ यासरख्या महान ग्रंथांची रचना करून त्यांनी युवा जगताला नवीन मार्ग दर्शविला आहे. कन्याकुमारी या ठिकाणी समुद्राच्या आत असलेले त्यांचे स्मारक आज सुद्धा संपूर्ण जगाला त्यांच्या महानतेचे दर्शन घडवून आणते.
“साध्य काय आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर आपणास असाध्याच्या पुढे जावं लागेल.”
अश्या प्रकारचे महान व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांचे होते. त्यांनी आपल्या धार्मिक, आध्यात्मिक ज्ञानाच्या बळावर संपूर्ण मानव वर्गाला आपल्या रचनांच्या माध्यमातून शिकवण दिली. मानवी जीवनासंदर्भात त्यांचे विचार खुपचं प्रभावशाली होते, ज्यामुळे मानव खूप प्रभावित होवून जात.
आपण सुद्धा त्यांचे महान विचार आपल्या आचरणात आणले तर आपले जीवन यशस्वी बनून जाईल. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आध्यात्मिक विचार आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून लोकांना शिकवण देण्याचेच काम केलं नाही तर त्यांनी आपल्या भारत देशाला पूर्व विश्वात सन्मानित केलं.
स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय – Swami Vivekananda Information in Marathi
स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल थोडक्यात – Swami Vivekananda Biography in Marathi
नाव | नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त |
जन्म | १२ जानेवारी १८६३ |
जन्मस्थान | कलकत्ता (पं. बंगाल) |
वडील | विश्वनाथ दत्त |
आई | भुवनेश्वरी देवी |
टोपणनाव | नरेंद्र, नरेन |
संन्यासी नाव | स्वामी विवेकानंद |
भावंड | नऊ |
गुरुचे नाव | रामकृष्ण परमहंस |
शिक्षा | १८८४ साली बी. ए उत्तीर्ण |
विवाह | नाही केला |
संस्थापक | रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन |
तत्त्वज्ञान | आधुनिक वेदांत, राजयोग |
साहित्यक कार्य | राज योग, कर्म योग, भक्ती योग,मेरे गुरु,अलमोडा ते कोलंबो पर्यंत व्याख्यान |
इतर कार्य | न्यूयार्क येथे वेदांत शहराची स्थापना, कैलिफोर्निया येथे शांती आश्रम आणि भारतात अल्मोडा जवळ “अद्वैतआश्रम” |
विचार | ”चला उठा, जागे व्हा आणि तो पर्यंत नका थांबू जो पर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही.” |
निधन | ४ जुलै १९०२ |
निधन स्थळ | बैलूर, पश्चिम बंगाल, भारत |
Swami Vivekananda Marathi
स्वामी विवेकानंद यांच्या अंगी असलेले अध्यात्मिक ज्ञान, सांस्कृतिक अनुभव आणि महान विचारांमुळे प्रत्येक व्यक्ती प्रभावित होवून जात असे.
त्यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य केलं होत. स्वामी विवेकानंद यांचे जीवन प्रत्येक व्यक्तीच्या मनात नवसंजीवनी भरण्याचे महत्वपूर्ण काम करते.
तसचं, आपणास जीवनांत समोर जाण्यास मार्गदर्शन करीत असते. स्वामी विवेकानंद महान तत्त्वज्ञानी असण्याबरोबरच त्यांना चारी वेदांचे ज्ञान होते.
भारतात हिंदू धर्म वाढवण्यासाठी त्यांनी खूप महत्वपूर्ण काम केलं आहे त्यांच्या अथांग प्रयत्नांमुळेच आज आपल्या देशांत हिंदू धर्माची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माच्या संस्कृती बद्दल जगाला ओळख करून दिली असली तरी त्यांनी इतर धर्माचा कधीच द्वेश केला नाही. स्वामी विवेकानंद मुळात खूपच दयाळू होते. त्यांच्या या स्वभावामुळे ते मानवाप्रमाणे जीव जंतूना सुद्धा आपुलकीच्या भावनेने पाहत असतं. मानवी जीवनाबाबत त्यांचे विचार खूपच श्रेष्ठ होते.
त्यांनी लोकांना भाऊ बांधिलकीची शिकवण दिली, त्याच बरोबर आपआपसात भाऊ बांधिलकीची भावना जोपासल्याने जीवन खूपच आनंदी होवून जाते.
तसचं, आपआपसात प्रेमाची भावना जोपासल्याने येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण मोठ्या धैर्याने सामोरे जावू शकतो. मानवाच्या अंगी असलेल्या आत्मशक्ती बद्दल त्यांचे असे मत होते की,
“जो पर्यंत आपण स्वत:वर विश्वास ठेवू शकणार नाही, तो पर्यंत आपण देवावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही.”
स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व इतके मोठे आहे की त्याचे वर्णन करावे तितक कमीच. त्यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून स्वत:ला महापुरुष म्हणून सिद्ध केलं.
तसचं, त्यांच्या अंगी असलेल्या अध्यात्म ज्ञान, धर्म, ऊर्जा, समाज, संस्कृती, देशप्रेम, परोपकारी, पुण्य, स्वाभिमान आदी संस्काराचे समन्वय खूपच मजबूत होते.
यासारखे गुण एकाच मानवाच्या अंगी असणे ही आपण भारतीय लोकांसाठी खूप महत्वाची बाब आहे. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरूंच्या निधनानंतर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ज्यांची उपकेंद्र आज सुद्धा देशाच्या विविध भागात पाहायला मिळतात.
स्वामी विवेकानंद यांना विशेष करून ओळखलं जाते ते, त्यांनी शिकागो या ठिकाणी आयोजित “जागतिक धर्म परिषदेत” जगाला हिंदू धर्माची ओळख् करून देतांना आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी संमेलनाला जमलेल्या लोकांना संबोधण्यासाठी “बंधू आणि बघिनी” असा शब्द उच्चारला.
त्यांचे हे शब्द लोकांच्या कानी पडताच लोक पूर्णपणे भारावून गेले होते.
स्वामी विवेकानंद यांचे सुरुवाती जीवन – Swami Vivekananda History in Marathi
युवा संन्यासी म्हणून ख्याती मिळवणारे महान हिंदूत्ववादी स्वामी विवेकानंद यांचा जन्म सन १२ जानेवारी १८६३ साली पश्चिम बंगल येथील कोलकत्ता या शहरात झाला होता. विवेकानंद यांचे जन्म नाव नरेंद्रनाथ दत्ता होते.
परंतु, घरातील सर्व जन त्यांना प्रेमाणे नरेंद्र म्हणत असतं. तसचं, त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्ता असून ते पेशाने कोलकत्ता येथील उच्च न्यायालयात प्रतिष्ठित वकील होते.
वकील असण्याबरोबर त्यांची इंग्रजी आणि फारसी भाषेवर चांगली पकड होती. त्याचप्रमाणे,विवेकानंद यांच्या आई भुवनेश्वरी देवी खूपच धार्मिक विचाराच्या महिला होत्या.
धार्मिक ग्रंथांमध्ये अधिकच रुची असल्याने त्यांनी रामायण आणि महाभारत या सारख्या पवित्र ग्रंथांमधून ज्ञान प्राप्त केले होते. याचप्रमाणे, त्या एक प्रतिभाशाली आणि विद्वान महिला होत्या.
त्यांना इंग्रजी भाषेचे उत्कृष्ट ज्ञान होते. आई भुवनेश्वरी देवी यांच्या अंगी असलेल्या धार्मिक, प्रतिभावंत आणि विद्वान आदी गुणांमुळे विवेकानंद यांच्यावर चांगले संस्कार झाले. त्यांनी आपल्या आईच्या सान्निध्यात राहूनच आपले शिक्षण पूर्ण केले.
आई वडिलांच्या अंगी असलेल्या उत्कृष्ठ गुणांमुळेच स्वामी विवेकानंद यांना आपल्या जीवनांत समोर जाण्यास प्रेरणा मिळाली. स्वामी विवेकानंद बालपणापासूनच खोडकर आणि हुशार व्यक्ती होते.
त्यांची बौद्धिक क्षमता इतकी महान होती की, एक वेळ त्यांच्या नजरेसमोरून जे काही जात असे त्याला ते कधीच विसरत नसत. तसचं, त्यांना ते परत वाचण्याचे काम सुद्धा पडत नसे. स्वामी विवेकानंद यांच्या घरात धार्मिक वातावरण असल्याने, युवा अवस्थेत त्यांच्या मनात सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रांबद्दल गोडी निर्माण झाली.
त्यामुळे ते सतत देवांच्या फोटोसमोर ध्यान लावून बसत असतं. साधू संन्याशांच्या गोष्टी त्यांना नेहमीच प्रेरित करीत असतं. स्वामी विवेकानंद यांच्या अंगी असलेल्या या धार्मिक वृत्तीमुळे समोर जावून ते, ध्यान, आध्यात्म, राष्टवाद हिंदू धर्म, आणि संस्कृतीचे वाहक बनून स्वामी विवेकानंद नावाने प्रसिद्ध झाले.
स्वामी विवेकानंद यांची शैक्षणिक कारकीर्द – Swami Vivekananda Education
इ.स. १८७१ साली नरेंद्र नाथ यांचे ईश्वर चंद विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन संस्थानामध्ये दाखला करण्यात आला.
सन १८७७ साली नरेंद्र तिसऱ्या कक्षेत असतांना काही कारणास्तव त्यांच्या कुटुंबाला जयपूर या ठिकाणी जावं लागलं होत. त्यामुळे त्यांना आपले शिक्षण मध्येच थांबवावे लागले.
इ.स. १८७९ साली कलकत्ता या शहरात आपल्या कुटुंबासोबत परत आल्यानंतर त्यांनी प्रेसिडेंसी महाविद्यालयाची पूर्व परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास केली. अश्या प्रकारचे गुण मिळविणारे ते पहिले विद्यार्थी बनले. नरेंद्र यांना विविध विषयांचे वाचन करण्याची खूपच आवड होती.
जसे त्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला आणि साहित्य आदी विषयांचे ते वाचक होते. याचप्रमाणे, हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे त्यांना खूप आवडत असे.
उदा. वेद, पुराण, भागवत गीता, रामायण महाभारत इत्यादी. लहानपणापासून खोडकर असल्याने त्यांना शारीरिक खेळ खेळणे खूप आवडत असे.
त्यामुळे ते शाळेतील प्रत्येक खेळ प्रकारत सहभागी होत असतं.
इ.स. १८८१ साली त्यांनी ललित कलेची परीक्षा उतीर्ण केली तसचं, इ.स. १८८४ साली त्यांनी कला शाखेची पदवी मिळविली.
सन १८८४ साली कलेची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले.
इ.स. १८८४ साली स्वामी विवेकानंद यांच्या जीवनांत एक दु:खद घटना घडली, त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. परंतु, स्वामी विवेकानंद यांनी न डगमगता आलेल्या परिस्थितीचा सामना केला व आपली जबाबदारी निभावली.
नरेंद्र नाथ यांनी आपल्या जीवनांत डेविड हूयमे, इम्मॅन्युएल केंट, जॉन गॉटलिब फिचट, बारुच स्पिनोझा, जॉर्ज डब्लू. एफ. हेजल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्टे कॉम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, आणि चार्ल्स डार्विन आदी महान वैज्ञानिकांच्या कामाचा त्यांनी आभ्यास केला होता.
About Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद आभ्यासासोबातच शारीरिक व्यायाम व खेळाकडे विशेष लक्ष देत असतं. स्वामीजींनी युरोपीय इतिहासाचा अभ्यास सर्वसाधारण सभेच्या संस्थेत केला होता.
कोलकत्ता या ठिकाणी जन्म झाला असल्याने स्वामी विवेकानंद यांना आपल्या मातृ भाषेचे चांगल्याप्रकारे ज्ञान होते.
त्यामुळे इंग्रज तत्त्वज्ञानी हर्बर्ट स्पेंसर यांच्या लेखनाने प्रेरित होऊन स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या एजुकेशन पुस्तकाचे भाषांतर बंगाली भाषेत केले.
स्वामीजी जेंव्हा दक्षिण भारतीय शास्त्रांचा अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांनी संस्कृत ग्रंथ आणि बंगाली साहित्यांचा अभ्यास केला होता. स्वामी विवेकानंद यांच्या कीर्तीची चर्चा त्यांच्या बालपणापासूनच दूरवर पसरली होती.
त्यामुळे त्यांच्या गुरुकडून त्यांची नेहमीच प्रशंसा होत असे. यामुळे त्यांना श्रुतीधर या नावाने सुद्धा उच्चारले जावू लागले.
विद्यार्थी जीवनांत स्वामी विवेकानंद यांची वाचनाप्रती गोडी खूपच वाढली होती. त्यामुळे त्यांनी अनेक लेखकांची पुस्तके वाचली होती.
त्यांपैकी जॉन स्टुअर्ट, हर्बर्ट स्पेंसर आणि ह्यूम यांच्या विचाराने ते खूपच प्रभावित झाले होते.
स्वामीजींनी या महान व्यक्तींच्या विचारांचा बारकाईने अभ्यास केला आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून जन सामन्यांमध्ये नवीन विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
लोकांमध्ये नवीन विचारांची भावना जागृत करत असतांना त्यांना ब्रह्म समाजाप्रती आकर्षण वाटू लागले.
जीवनाबद्दल सत्य जाणून घेण्याच्या उद्देश्याने ते ब्रह्म समाजाचे नेता महर्षि देवेंद्र नाथ ठाकूर यांच्या संपर्कात आले होते.
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे नाते संबंध – Ramakrishna Paramahamsa and Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद हे बालपणापासूनच जिज्ञासू वृत्तीचे होते.त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा अभ्यास खूपच बारकाईने करीत असतं. त्यांच्या याच वृत्तीमुळे महर्षी देवेंद्र नाथ यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी महर्षि देवेंद्र नाथ यांना निर्भीडपणे प्रश्न विचारला की, ‘तुम्ही देवाला पाहिलं आहे?’ विवेकानंद यांचा प्रश्न ऐकूण महर्षी देवेंद्र नाथ आश्चर्यचकित झाले.
त्यांनी विवेकानंद यांची तृष्णा शांत करण्यासाठी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. परमहंस यांच्याकडे गेल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी त्यांना आपले गुरु मानलं व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर समोर चालत राहिले.
गुरूंच्या आज्ञेचे पालन करतांना स्वामी विवेकानंद यांच्या मनात आपल्या गुरूंप्रती आदर आणि कर्तव्यनिष्ठेची भावना जागृत झाली. इ.स. १८८५ साली गुरु रामकृष्ण परमहंस कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त झाले यावेळी स्वामी विवेकानंद यांनी त्यांची खूप सेवा केली.
गुरूंची सेवा करत राहल्याने गुरु शिष्य यांच्यातील नात आणखीनच घट्ट होवू लागलं.
रामकृष्ण मठाची स्थापना – Establishment of Ramakrishna Math
स्वामी विवेकानंद गुरु रामकृष्ण परमहंस यांची निरंतर काळ सेवा करीत राहिले. कालांतराने गुरु रामकृष्ण परमहंस यांचे आजाराने निधन झाले. यानंतर स्वामी विवेकानंद यांनी वराहनगर या ठिकाणी रामकृष्ण संघाची स्थापना केली.
समोर चालून स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण संघाचे नाव बदलून रामकृष्ण मठ ठेवले. रामकृष्ण मठाची स्थापना केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी ब्रह्मचर्य आणि संन्यासी जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला. तेव्हापासून नरेंद्र स्वामी विवेकानंद बनले.
स्वामी विवेकानंद यांचे भारत भ्रमण – Swami Vivekananda’s travels in India
स्वामी विवेकानंद यांनी संन्यासी वृत्ती धारण केल्यामुळे त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते.
यानंतर त्यांनी भारत देशाची प्रदक्षिणा केली. आपल्या या प्रदक्षिणे दरम्यान त्यांनी अयोध्या, वाराणसी, आग्रा, वृंदावन, अल्वर या सारख्या अनेक शहराला भेटी दिल्या.
या प्रवासा दरम्यान त्यांना कधी महालात राहावं लागलं तर कधी गरीबाच्या झोपडीत राहावं लागलं होत.
आपल्या या भारत प्रवासा दरम्यान त्यांना देशाच्या विविध भागात वास्तव्य करीत असलेल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या समस्याबद्दल माहिती मिळाली.
देशांत असलेल्या जातिवाद, भेदभाव यासरख्या वाईट प्रवूत्तीची त्यांना जाणीव झाली. त्यांनी काही प्रमाणात या वाईट वृत्तीना आळा घालण्याचा प्रयत्न देखील केला होता.
भारत भ्रमंती करत करत स्वामी विवेकानंद सन २३ डिसेंबर १८९२ साली कन्याकुमारी या ठिकाणी पोहचले.
याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी कठोर साधना केली. यावेळेस स्वामी विवेकानंद सतत तीन दिवस ध्यानिस्त मुद्रेत बसले होते.
कन्याकुमारी येथून परत आल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी राजस्थान येथील अबू रोड येथे आपले गुरूभाऊ स्वामी ब्रह्मानंद आणि स्वामी तुर्यानंद यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान त्यांनी आपल्या गुरु बंधूना आपणास आपल्या भारत भ्रमंती दरम्यान आलेला दु:खद अनुभव कथन केला.
स्वामी विवेकानंद यांना आपल्या भारत भ्रमंती दरम्यान देशांतील गरिबी आणि लोकांचे दु:ख याची जाणीव झाली.
ते पाहून त्यांना खूपच दु:ख झाले. देशांतील गरिबी आणि लोकांच्या दुःखाचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देश्याने त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.
स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकन भेटीमुळे जगातील इतर देशांचा भारत देशाबद्दल विचार करण्याच्या दृष्टीकोनात बदल झाला.
स्वामी विवेकानंद यांचा अमेरिका दौरा आणि शिकागो भाषण (१८९३ जागतिक धर्म परिषद) – Swami Vivekananda Chicago Speech
इ.स. १८९३ साली अमेरिकेतील शिकागो या शहरात आयोजित विश्व धर्म संमेलनात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जागतिक धर्म परिषदे मध्ये आपला सहभाग दर्शविला.
जागतिक धर्म परिषदेत जगाच्या विविध देशातून आलेल्या धर्मगुरूंनी आपआपल्या धर्मांचे पवित्र ग्रंथ आणले होते त्याचप्रमाणे भारताने सुद्धा आपल्या देशांतील पवित्र ग्रंथ श्रीमद् भागवत गीता हा ग्रंथ त्या ठिकाणी सादर केला होता.
त्यावेळेस इतर देशाच्या धर्मगुरूंनी आपल्या ग्रंथाचा उपहास केला. परंतु, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतांना जगाला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी भाषणाला सुरुवात करताच त्यांनी संमेलनास जमलेल्या धर्मगुरू आणि जनतेला उद्देश्यून बंधू आणि बघिनी म्हणताच लोकांनी त्यांचे टाळ्यांचा गडगडाट करून स्वागत केले.
स्वामी विवेकानंद यांच्या भाषणातून वैदिक ज्ञानाचे दर्शन होत होते तर त्याच बरोबर लोकांना जगात शांततेत जगण्याचा संदेश देखील मिळत होता.
त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून कट्टरतावाद आणि जातीयवादावर जोरदार हल्ला चढविला.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणाच्या द्वारे जगाला भारत देशाची नव्याने ओळख करून दिली. त्यांच्या या भाषणामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक कार्य – Complete Works of Swami Vivekananda
शिकागो येथिल जागतिक धर्म परिषद झाल्यानंतर स्वामी विवेकानंद सुमारे तीन वर्ष अमिरीकेला रहीले.
त्यांनी त्या ठिकाणी राहून वेदांताच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार केला.
अमेरिकेतील पत्रकारांनी तर त्यांना ”Cylonic Monik from India” असे नाव दिले होते.
अमेरिकेतील शिकागो, न्यूयार्क, डेट्राइट आणि बोस्टन या शहरांमध्ये स्वामी विवेकानंद यांनी सुमारे दोन वर्ष भाषण दिली.
याचदरम्यान त्यांनी इ.स. १८९४ साली न्यूयार्क या शहरात वेदांत समाजाची स्थापना केली.
सतत दोन वर्ष आपल्या भाषणांच्या कामात व्यस्त राहिल्याने इ.स. १८९५ साली स्वामी विवेकानंद यांची प्रकृती खालावली.
त्यामुळे त्यांनी भाषण देणे सोडून दिले व योग विद्येचे ज्ञान देण्यास सुरुवात केली.
यादरम्यान त्यांची ओळख भगिनी निवेदिता यांच्याशी झाली. समोर चालून भगिनी निवेदिता यांनी स्वामी विवेकानंद यांना आपले गुरु मानून त्यांच्या प्रमुख शिष्य बनल्या.
इ.स. १८९६ साली स्वामी विवेकानंद यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राचार्य मैक्स मूलर यांची भेट घेतली.
मैक्स मूलर हे एक जर्मन ब्रिटीश लेखक असून त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे जीवन चरित्र लिहिले होते.
यानंतर, इ.स. १५ जानेवारी १८९७ साली स्वामी विवेकानंद अमेरिकेहून श्रीलंकेला गेले. त्याठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अमेरिकेत तीन वर्ष वास्तव्यास असतांना त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या महान कार्यांमुळे स्वामी विवेकानंद यांची ख्याती जगभर पसरली होती.
अमेरिकेवरून श्रीलंका येथे आल्यानंतर स्वामीजी काही दिवस त्या ठिकाणी राहिले आणि तेथून थेट दक्षिण भारतातील रामेश्वर या ठिकाणी आले.
यानंतर ते आपल्या जन्मभूमी असलेल्या पश्चिम बंगाल राज्यातील कलकत्ता या शहरात गेले.
स्वामी विवेकानंद कलकत्ता येथे वास्तव्यास असतांना देशाच्या विविध भागातील लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी त्याठिकाणी येत असतं.
स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात नेहमीच विकासाबद्दल सांगत असतं.
रामकृष्ण मिशनची स्थापना – Ramakrishna Mission Established
आपल्या प्रेरणादायी भाषणांच्या माध्यमातून जगभर स्वत:ला आणि आपल्या देशाला प्रसिद्धी मिळवून दिल्यानंतर स्वामी विवेकानंद इ.स. १ मे १८९७ साली आपल्या मायदेशी परतले.
कलकत्ता या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागील त्यांचा मुख्य हेतू नवीन भारत घडविणे हा होता.
त्याकरिता त्यांनी रामकृष्ण मिशन अंतर्गत शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि साफ सफाई आदी क्षेत्रांत पाऊल टाकण्यास सुरुवात केली.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या अंगी असलेल्या साहित्य, कला आणि इतिहासिक विद्वाता इत्यादी गुणांच्या अभावी त्यांनी लोकांच्या मनावर भूल घातली होते.
देश विदेशातील माणसे त्यांचे खूपच चाहते बनले होते. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाला जन सामन्यांची प्रचंड गर्दी होत असे.
देशांतील युवकांसाठी तर ते प्रेरणास्थानचं बनले होते.
देश विदेशातील युवक आणि युवत्या त्यांच्या विचारातून भविष्यासाठी प्रेरणा घेत असतं.
इ.स. १८९८ साली स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल राज्यात बेलूर मठाची स्थापना करून भारत देशाला नवीन आकार दिला.
याव्यतिरिक्त स्वामी विवेकानंद यांनी अन्य दोन मठाची स्थापना केली.
स्वामी विवेकानंद यांचा दुसरा विदेश दौरा –
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशांत रामकृष्ण मिशन आणि बेलूर मठाची स्थापना करून, या अंतर्गत देशांत विविध क्षेत्रांत सुधारणा करण्याचे महत्वपूर्ण काम केले.
यानंतर इ.स. २० जून १८९९ साली स्वामी विवेकानंद यांनी अमेरिका येथे आपला दुसरा विदेश दौरा केला. या परदेशी दौऱ्यादरम्यान त्यांनी अमेरिकेतील कैलिफोर्निया या शहरात शांती आश्रमाची स्थापना केली.
तसचं, संफ्रान्सिस्को आणि न्यूयार्क शहरात वेदांत सोसायटीची स्थापना केली.
यानंतर, सन १९०० साली स्वामी विवेकानंद अमेरिकेवरून पॅरिस येथे गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी आयोजित “कॉंग्रेस ऑफ दी हिस्ट्री रीलीजंस” मध्ये सहभाग घेतला.
या प्रवास दौऱ्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या प्रिय शिष्या भगिनी निवेदिता आणि स्वानी तरियानंद देखील त्यांच्या सोबत होत्या.
पॅरिस येथे तीन महिने वास्तव्य केल्यानंतर सन १९०० च्या शेवटी स्वामी विवेकानंद आपल्या मायदेशी परत आले.
भारत देशांत वापस आल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रवास सुरूच होता. सन १९०१ साली त्यांनी बोधगया आणि वाराणसी या धार्मिक स्थळाची तीर्थ यात्रा केली.
देशा विदेशात प्रवास करत राहिल्याने त्यांच्या तब्येतीत बिघाड होत गेला. अस्थमा आणि मधुमेह या सारख्या आजारांनी त्यांना ग्रासल होत.
स्वामी विवेकानंद यांच निधन – Swami Vivekananda Death
त्यांनी आपल्या निधनाबाबत केलेल्या भविष्यवाणीला खर ठरवीताना त्यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आयुष्यमानाबद्दल या आधीच विधान केलं होते की, मी ४० वर्षापेक्षा जास्त काळ जगणार नाही.
जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या या महामानवाचे अंत्यसंस्कार गंगा नदीच्या काठावर करण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्यांनुसार त्यांनी महा समाधी घेतली होती.
स्वामीविवेकानंद यांचे विचार – Swami Vivekananda Quotes
स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी, आशादायी आणि तत्त्वज्ञानी विचारांनी जगाला वेड लावल होत.
त्यांच्या याचं विचारांमुळे प्रत्येक व्यक्ती प्रभावित होत असे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून नेहमीच राष्ट्रवादाची भावना प्रकट होत असे.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाकरिता अनेक महत्वपूर्ण काम केलं. जगाला नव्याने आपल्या देशाची ओळख करून दिली.
तसचं, आपल्या देशांत असणारी धर्म संस्कृती, आणि वेदांताची शिकवण देऊन आपल्या देशाची महानता वाढविली.
स्वामी विवेकानंद यांच्या मौल्यवान विचारांचा अंगीकार करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होवू शकतो.
त्यांनी अशी धारणा होती की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनांत एक द्रुड संकल्प केला पाहिजे आणि आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जीवन झोकून दिले पाहिजे. तेव्हांच आपल्याला यश मिळू शकेल.
स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्रवादी आणि मानवतावादी कार्य :
स्वामीजींनी आपल्या देशांतील युवकाना त्यांच्या भविष्याकरिता मार्गदर्शन म्हणून दृढ संकल्प करण्याची महान शिकवण दिली.
तसचं, युवकांच्या मनात आत्मविश्वास जागृत करून त्यांना प्रत्येक क्षेत्रांत यशस्वी होण्याचा मौल्यवान सल्ला दिला.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून देशांतील युवक आणि युवतींना मार्गदर्शनचं मिळालं नाही तर, त्याचं भविष्य देखील उज्वल केलं.
आज सुद्धा देशा विदेशातील युवक आणि युवत्या त्यांच्या विचार आपल्या जीवनांत आकस्मात करतात.
स्वामी विवेकानंद यांचे महत्वपूर्ण कार्य :
विश्व भ्रमंती करून भारत देशाच्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला स्वामी विवेकानंद यांचा प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन एक समान होता. ते नेहमीच बंधुभाव आणि ऐकतेच्या नजरेने प्रत्येक व्यक्तीला पाहत असतं.
त्यामुळे त्यांनी आपल्या विचारातून लोकांना विस्तृत दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांच्या माध्यामतून लोकांच्या मनात आपल्या धर्माप्रती नवीन विचारधारणा प्रकट केली.
त्यांनी आपल्या शिकवणूकीतून लोकांना आचरण आणि शिक्षणाबाबत महत्वपूर्ण ज्ञान दिले.
स्वामी विवेकानंद यांनी पूर्व आणि पश्चिमेकडील देशांना जोडण्यास खूप महत्वपूर्ण योगदान दिले.
जगाला आपल्या संस्कृतीचे महत्व पटवून देण्यात स्वामी विवेकानंद यांची महत्वपूर्ण भूमिका:
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या रचनाच्या माध्यमातून आपल्या देशांतील संस्कृतीला विशेष महत्व प्राप्त करून देण्यास खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून लोकांना सांस्कृतिक भावनांच्या माध्यमातून जोडण्याचे प्रयत्न केले.
भारतीय धार्मिक रचनाचा अर्थ समजावून सांगण्यास स्वामी विवेकानंद यांनी आपले योगदान दिले.
देशांतील पैदल यात्रे दरम्यान देशांत असलेली जातिवाद आणि भेदभाववादी परिस्थिती पाहून स्वामी विवेकानंद यांना खूप दु:ख झाले होते.
देशांतील या परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी त्यांनी लोकांना खालच्या जातीचे महत्व पटवून दिले.
स्वामी विवेकानंद यांनी हिंदुत्वाचे महत्व पटवून देण्यात निभावली महत्वपूर्ण भूमिका:
जगाला हिंदू धर्माचे महत्व पटवून देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी खूप महत्वपूर्ण योगदान दिले.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्राचीन धार्मिक परंपरेला अनुसरून नवीन विचार धारणेचा जोड देण्याचा प्रयत्न केला.
स्वामी विवेकानंद जयंती – Swami Vivekananda Jayanti
संपूर्ण विश्वाला हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे महान भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी या दिवशी झाला होता.
तसचं, त्यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून देशा विदेशातील युवकांना प्रभावित केले होते.
युवकांसाठी ते प्रेरणास्थान बनले होते. त्यामुळे स्वामी विवेकानंद या महामानवाचा जन्म दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण गोष्टी – Life and Philosophy of Swami Vivekananda or Swami Vivekananda Teachings
स्वामी विवेकानंद यांच्यावर त्यांच्या बालपणी झालेले संस्कार आणि घरातील धार्मिक वातावरण यामुळे त्यांचा कल सुरुवातीपासून धार्मिकते कडे होता.
वाचनाच्या आवडीमुळे त्यांनी चारी वेदांचे वाचन केले होते.
तसचं, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने ते ग्रंथ आत्मसात केले होते.
त्यामुळे त्यांच्या अंगी परोपकार, कर्तव्यनिष्ठा, निर्भीडपणा, साधेपणा, आणि आपल्या लाक्ष्याप्रती कर्तव्यदक्ष्य असणे अश्या प्रकारचे काही गुण सुरुवातीपासूनचं होते.
त्यांच्या याच गुणांचे वर्णन आपण याठिकाणी करणार आहोत .
परोपकार
स्वामी विवेकानंद यांच्या अंगी असलेल्या या गुणाबद्दल त्यांची अशी धारणा होती की, मानवी समाजाचा विकास करायचा असेल तर आपआपसात परोपकाराची भावना असणे खूप आवश्यक आहे.
त्याकरिता सर्वांनी योगदान दिल पाहिजे.
याबद्दल स्वामी विवेकानंद याचं अस म्हणन होत की, “ आनंद घेण्यापेक्षा आनंद देण्यात जास्त सु:ख आहे.”
साधे जीवन
स्वामी विवेकानंद यांना साधी राहणीमान आवडत असे. याबाबत त्यांचे असे मत होते की, भौतिक साधनांच्या विळख्यात गुंतल्याने माणूस लालची होतो.
संकटाचा मोठ्या ध्यैर्याने प्रतिकार करा
स्वामी विवेकानंद यांचे जीवनांत येणाऱ्या संकटा बद्दल असे मत होते की, जीवनांत येणाऱ्या संकटाला न भिता आपण मोठ्या हिम्मतीने त्याचा सामना केला पाहिजे.
जे व्यक्ती आपल्या जीवनांत येणाऱ्या संकटाना सामोरे जातात तेच व्यक्ती त्यांच्या आयुष्यात यशस्वी होवू शकतात.
कर्तव्यनिष्ठा
स्वामी विवेकानंद आपल्या कामा प्रती खूप कर्तव्यनिष्ठ होते. कुठलेही काम करत असतांना ते आपले पूर्ण लक्ष त्या कामावर देत असतं.
याच कारणामुळे ते एक प्रतिभावंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाले.
जीवनांत ध्येय निश्चित करणे
स्वामी विवेकानंद यांचे असे म्हणने होते की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनांत एक ध्येय निश्चित करणे खुप आवश्यक बाब आहे.
तसचं, आपण आपल्या ध्येयाप्रती जागृत असलं पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो.
मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनांत युवकांना दिलेली शिकवण खूप महान आहे.
आपण सुद्धा तिचा आपल्या जीवनांत अवलंब केला तर आपण सुद्धा आपल्या कार्यात यशस्वी होवू शकतो.