Swami Samarth Tarak Mantra in Marathi
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यांतर महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी श्री दत्त गुरु यांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराज एक महान संत होवून गेले आहेत. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जाते. तसचं, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्याबाबत एक आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे.
त्यानुसार गाणगापूर येथील श्री नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने पुन्हा प्रकट झाले. याबाबत पुरावा देखील मिळतो, स्वामी समर्थ महाराजांनी स्वत: आपल्या तोंडाने म्हटले होते की, “मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे.” यावरून महाराज नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे निष्पन होते.
यामुळे अक्कलकोट या ठिकाणी महाराज स्वामी समर्थ या नावाने वास्तव्य करू लागले. अश्या प्रकारची आख्यायिका महाराजांच्या प्रकट होण्याबाबत प्रसिद्ध आहे. महाराजांनी अक्कलकोट या ग्रामी वास्तव्य केल्यामुळे त्या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले. आज सुद्धा त्या ठिकाणी महाराजांचे भव्य मंदिर उभे आहे.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Swami Samarth Tarak Mantra in Marathi
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
श्री स्वामी समर्थ महाराजांनी या ठिकाणी राहून लोकांची दुखे हरली तसचं आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. महाराज आलेल्या भक्तांना नेहमी “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे सांगत असत. भक्तांनी हाच महाराजांचा कानमंत्र समजून त्यांना गुरु केले. कालांतराने महाराजांची कीर्ती दूरवर पसरली त्यामुळे इतर राज्यांतील लोक सुद्धा महाराजांच्या दर्शनाकरिता येत असतं.
महाराजांची मूर्ती नेहमीच दिगंबर अवस्थेत राहत असून अंगात फक्त एक लंगोट आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालत असतं. दर्शनाकरिता आलेल्या भक्तांना पाठीवर थाप मारीत आशीर्वाद देत आकाशाकडे पाहत नेहमी काहीतरी बडबडत.
महाराजांनी लोकांना मौल्याचा सल्ला देत चैत्र वद्द्य त्रयोदशी शके १८०० म्हणजे ३० एप्रिल १८७८ साली अक्कलकोट या ठिकाणी वटवृक्षाच्या खाली संजीवन समाधी घेतली. महाराज ज्या वटवृक्षाच्या खाली बसून लोकांना आशीर्वाद देत असतं आज सुद्धा तो वटवृक्ष त्याठिकाणी उभा आहे. समाधीच्या दर्शनाकरिता आलेले भाविक मनोभावे त्या वटवृक्षाची पूजा करतात.
महाराष्ट्र राज्याप्रमाणे देशांतील इतर भागात सुद्धा महाराजांची केंद्र उभारली आहेत. भाविक त्याठिकाणी दर्शनाकरिता जात असतात. तसचं, महाराजांची मनोभावे आराधना करण्यासाठी महाराजांची स्तुती करण्यात आलेला श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करित असतात.
स्वामी समर्थ तारक मंत्र मानवी मनाला उद्देशून असून यात मानवाला आपल्या कार्याप्रती नेहमी निर्भीड राहावे असे सुचवण्यात आले आहे. स्वामीच्या आशीर्वादाने केलेले कोणतेही कार्य कायम यशस्वी होते. महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच उभे असतात असा या तारक मंत्राचा अर्थ असून.
आपण नेहमीच या मंत्राचा जप केला पाहिजे. आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे लिखाण करणार असून, आपणास या मंत्राचा लाभ घेता यावा या करिता या मंत्राचे लिखाण करण्यात आलं आहे.