Shri Swami Samarth Aarti
मित्रांनो, आपण सर्वांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज परिचित आहेत. तसचं, स्वामी समर्थ यांच्या प्रकट होण्याबाबत एक पौराणिक कथा प्रचलित आहे. इ.स. १९ व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट या ठिकाणी वास्त्यव्य भोगणारे तसचं, श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतर भगवान श्री दत्त यांचे ते पूर्ण अवतार मानले जातात.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती – Swami Samarth Aarti
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!
देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!
!!..अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!
श्री स्वामी समर्थ महाराज यांची पौराणिक कथा – Swami Samarth Story
तसचं, स्वामी समर्थ यांच्या प्रकट होण्याबद्दल लोकांची अशी मान्यता आहे की, इ.स. १४५९ साली माघ वद्य १ शके १३८० साली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन करून शैल्य यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. यानंतर त्यांनी सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ३०० वर्षाच्या प्रचंड कालखंडा दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या अंगावर वारूळ केले होते.
एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकुडतोड्या त्या कर्दळीच्या वनात लाकुत तोडत होता. लाकुत तोडत असतांना त्यांच्या हातातील कुऱ्हाड निसटली आणि ती कुऱ्हाड त्या वारुळात जावून पडली.
उद्धवाचे निमित्त साधून भक्तांच्या कल्याणासाठी स्वामी महाराजांना पुन्हा प्रकट व्हायचं होत. कुऱ्हाड वारुळात पडताच त्यातून रक्ताची धार निघू लागली व क्षणार्धातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज होत. महाराजांच्या माडीला लागलेल्या कुऱ्हाडीचा मार डोळ्यांनी सहज दिसत असे.
“मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामी समर्थ महाराज यांच्या मुख्यातील उद्गार ते स्वामी सरस्वती यांचा अवतार असल्याचे सूचित करतात.
आपल्या हातून महापुरुषाला झालेल्या जखमीमुळे उद्धव मनातल्या मानत विचार करू लागला त्याला खूप वाईट वाटत होते शिवाय तो दु:खी देखील झाला होता. परंतु आपल्या भक्ताच्या सदैव पाठीशी उभा राहणाऱ्या स्वामिनी त्याला आशीर्वाद देऊन गंगातिरी प्रयाण केले. गंगातिरी भ्रमण करीत असतांना ते कलकत्ता येथे गेले व त्याठिकाणी त्यांनी देवी महाकालीचे दर्शन घेतले. यानंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
इ.स. १८५६ साली स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले होते अशी मान्यता आहे. महाराजांनी जेंव्हा पहिल्यांदा मंगळवेढ्याहून अक्कलकोट नगरीत प्रवेश केला होता तेव्हा त्यांनी गावातील खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केलं होत. त्यावेळी त्यांनी तीन दिवस अन्न ग्रहण केलं नव्हते. यानंतर स्वामी समर्थ महाराज यांची प्रचीती लोकांना हळू हळू येवू लागली.
महाराजांचे निसीम भक्त शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावर त्यांनी विशेष कृपा केली. महाराज अक्कलकोट येथे आल्यानंतर त्यांनी तेथिल वटवृक्षाखाली तप:साधना केली. स्वामी समर्थ विविध ठिकाणी प्रसिद्ध होते.
अक्कलकोट येथे आल्यानंतर ते शेवट पर्यंत या ठिकाणीच राहिले. त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांवर दया केली. स्वामिनी अनेकांना कामाला लावून इ.स. ३० एप्रिल १८७८ साली चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८०० अक्कलकोट येथे “वटवृक्ष समाधी मठ स्थानी” मध्यरात्री समाधी घेतली. श्री स्वामी समर्थ यांचे निसीम भक्त (शिष्य) चोळप्पा यांच्या निवास स्थानाजवळ स्वामी समर्थांना समाधिस्त करण्यात आलं आहे.