Swami Dayanand Saraswati Mahiti Marathi
आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती…त्यांना आधुनिक जागृत समाजाचे जनक देखील म्हंटल्या गेलं आहे.
भारतीय समाजात दयानंद सरस्वती यांनी अनेक सुधारणा केल्या. इतकच नव्हे तर आपल्या देशासाठी अविरत संघर्ष देखील केला.
स्वराज्याचा संदेश दिला जो पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वीकारून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच हि भीष्म प्रतिज्ञा घेतली.
याशिवाय दयानंद सरस्वतींनी भारतिय संस्कृतीच्या विकासासाठी देखील फार प्रयत्न केलेत.
एक उत्तम मार्गदर्शकाचे गुण त्यांच्यात समाविष्ट होते, उत्तम कार्याने समाजाला त्यांनी नवी दिशा आणि उर्जा प्रदान केली. त्यांच्या महान विचारांमुळे भारतातील प्रतिभावान व्यक्तिमत्व देखील प्रभावित झाले.
आपलं अवघं जीवन राष्ट्रहितासाठी समर्पित करून समाजातील प्रचलित अंधविश्वास आणि कुप्रथा दूर करण्याचा महर्षींनी प्रयत्न केला. आपल्या प्रभावी आणि ओजस्वी विचारांनी समाजात नवचेतना पसरविली.
मूर्ती पूजा, जातीय भेदभाव, देवाच्या नावावर पशु हत्या, आणि स्त्रियांना वेद म्हणण्याची परवानगी नसणे यांसारख्या हिंदू धर्मीय अनेक श्रद्धा- अंधश्रद्धांवर त्यांनी सडकून टीका केली.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या आधुनिक विचार आणि प्रयत्नांमुळे भारतीय शैक्षणिक व्यवस्थेला पुनर्जीवन मिळाले.
त्यामुळे एकाच छताखाली वेगवेगळ्या स्तरातील जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणल्या गेलं. त्याला आज आपण शाळेतला ‘वर्ग’ म्हणून ओळखतो.
दुसरीकडे स्वदेशी चा पुरस्कार करत नवा समाज, धर्म, आर्थिक आणि राजनैतिक काळाची देखील सुरुवात केली.
अश्या महान व्यक्तिमत्वा विषयी आज या लेखातून अधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
स्वामी दयानंद सरस्वती – Swami Dayanand Saraswati Information in Marathi
नाव (Name) | महर्षी दयानंद सरस्वती |
वास्तविक नाव (Real Name) | मुल शंकर तिवारी |
जन्म (Birthday) | 12 फेब्रुवारी 1824 टंकारा, गुजरात |
वडील (Father Name) | करशनजी लालजी तिवारी |
आई (Mother Name) | यशोदाबाई |
शिक्षण (Education) | वैदिक ज्ञान |
गुरु | स्वामी विरजानंद |
मृत्यू (Death) | 30 ऑक्टोबर 1883 |
वैशिष्ट्य | आर्य समाजाचे संस्थापक स्वराज्याचा पुरस्कार करणारे प्रथम व्यक्ती पारंपारिक विचारांना बदलून अनेक चालीरीती आणि कुप्रथांना विरोध केला. |
स्वामी दयानंद सरस्वतींचे प्रारंभिक जीवन – Swami Dayanand Saraswati Biography in Hindi
एक प्रामाणिक देशभक्त आणि महान समाज सुधारक स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म एका समृद्ध ब्राम्हण कुटुंबात 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरात राज्यातील टंकारा इथं झाला.
बालपणी त्यांना मुलशंकर अंबाशंकर तिवारी या नावानं ओळखलं जायचं. त्यांचे वडील करशनजी लालजी तिवारी कर-अधिकारी या पदावर कार्यरत होते आणि एक सुखी समृद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. याशिवाय शैवमताचे कट्टर अनुयायी देखील होते.
त्यांची आई यशोदाबाई या गृहिणी होत्या. सुखी संपन्न कुटुंबात जन्म झाल्यामुळे दयानंद सरस्वतींचं बालपण ऐशोआरामात व्यतीत झालं.
लहानपणा पासूनच स्वामी दयानंद विलक्षण प्रतिभा आणि कुशाग्र बुद्धीचे धनी होते. अवघ्या दोन वर्षांच्या वयात गायत्री मंत्र त्यांना स्पष्ट उच्चारणा सह मुखोद्गत झाला होता.
घरातील वातावरण धार्मिक असल्याने आणि कुटुंब शिवभक्त असल्याने स्वामी दयानंदांवर देखील तेच संस्कार घडले आणि हळू-हळू त्यांच्या मनात परमेश्वरा विषयी अगाध निष्ठा निर्माण होत गेली.
पुढे वेदाभ्यासक होण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच वेदशास्त्र, धार्मिक ग्रंथ, आणि संस्कृत भाषेचे मन लावून अध्ययन केले.
तेवढ्यात त्यांच्या जीवनातील एका घटनेने त्याचं आयुष्य पुरतं बदलून टाकलं आणि परंपरेने चालत आलेल्या नीतीनियमांवर आणि परमेश्वरा विषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यावर त्यांना बाध्य व्हावं लागलं.
या घटनेने बदललं स्वामी दयानंद सरस्वतींचं आयुष्य – Swami Dayanand Saraswati Story
स्वामी दयानंद सरस्वतींचे वडील कट्टर शिवभक्त असल्याने नेहमी धार्मिक कार्यात मग्न असत त्यामुळे स्वामी दयानंद देखील वडलांच्या या धार्मिक कार्यात सहभागी असायचे.
एकदा महाशिवरात्री च्या दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना शिवरात्रीचं महत्वं समजावून सांगितलं आणि उपवास ठेवण्यास सांगितला, स्वामी दयानंदानी देखील वडलांची आज्ञा प्रमाण मानून उपवास केला आणि रात्री आराधना करण्यासाठी ते मंदिरात जाऊन बसले.
मंदिरात अनेक उंदीर शिव-पिंडी जवळचा प्रसाद खातांना दयानंदांना दिसलं आणि त्यांच्या बालमनात अनेक प्रश्न त्या क्षणी उभे राहिले कि वास्तवात देवाची मूर्ती हा एक पाषाण आहे, आणि जो देव आपल्या अन्नाची रक्षा करू शकत नाही तो आपले रक्षण कसे करणार ?
या घटनेने स्वामी दयानंद यांच्या मनावर खोलवर परिणाम केला आणि त्यांचा मूर्ती पुजेवरचा विश्वास उडाला.
वयाच्या 21 व्या वर्षी केला घराचा त्याग
या विषया संबंधित स्वामी दयानंद यांचा त्यांच्या वडिलांशी बराच वाद झाला. त्यांनी आपल्या वडलांना निक्षून सांगितलं की आपण मुळात असहाय्य ईश्वराची उपासना करावयास नको.
पुढे जन्म-मृत्यु च्या फेऱ्याची सत्यता जाणून घेण्यासाठी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सुमारे 1846 मध्ये मोहमायेचा त्याग करत सन्यास घेण्याचा निर्णय घेत घराचा त्याग केला.
त्यांच्यात हे सत्य जाणण्याची इच्छा एवढी प्रबळ होती कि त्यामुळे सांसारिक जीवन त्यांना व्यर्थ वाटू लागलं आणि आपल्या विवाहाचा प्रस्ताव देखील त्यांनी अमान्य केला.
या विषयाला घेऊन त्यांच्यात आणि वडिलांमध्ये अनेकदा वाद देखील झाले, पण अखेर स्वामी दयानंद यांच्या दृढ निश्चया पुढे वडलांना माघार घ्यावी लागली.
स्वामी दयानंद सरस्वतींचे गुरु श्री विरजानंद – Swami Dayanand Saraswati ke Guru
आध्यात्मिक अध्ययना साठी स्वामी दयानंद मथुरा येथे स्वामी विरजानंद यांना भेटले. तिथं त्यांनी योग विद्या, शास्त्र, आणि आर्य ग्रंथाचे ज्ञान प्राप्त केले.
ज्ञान प्राप्ती नंतर ज्यावेळी गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली त्यावेळी गुरु विरजानंदांनी स्वामी दयानंद यांना समाजात पसरलेल्या अनिष्ट चालीरीती, अन्याय, आणि अत्याचारा विरोधात कार्य करण्यास आणि सामान्य लोकांमध्ये जागरुकता पसरविण्यास सांगितले.
अश्या तऱ्हेने स्वामी दयानंदांच्या गुरुंनी त्यांना समाज कल्याणाचा मार्ग दाखविला.
पुढे त्यांनी समाजासाठी अनेक महान कार्य केलीत व इंग्रज सरकारचा कडाडुन विरोध केला, एवढंच नाही तर भारतीयांना आर्य भाषा अर्थात हिंदी भाषे प्रती जागरूक केलं.
1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी दयानंद सरस्वतींचे योगदान :-
ज्ञान प्राप्ती नंतर स्वामी दयानंदांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं, ब्रिटीश सरकार भारतीय नागरिकांचा अमानुष छळ करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी इंग्रजां विरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि लोकांना ब्रिटीशांच्या अत्याचारा विरोधात आवाज बुलंद करण्यास प्रोत्साहित केलं.
भारताचे महान सुपुत्र तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, हाजी मुल्ला खां, स्वामी दयानंद यांच्या या कार्याने प्रभावित होते.
इतकंच नव्हे तर त्या सर्वांनी देखील स्वामी दयानंदांच्या विचारांचे अनुसरण केले व त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.
या शिवाय समाज सुधारणेसाठी महात्मा गांधीजींनी देखील स्वामी दयानंदांच्या अनेक उपक्रमांना स्वीकारलं.
नागरिकांना जागरूक करून सर्वांना संदेश वाहक बनविलं, जेणेकरून त्यांचे आपापसातील संबंध अधिक दृढ होऊन ते एकत्र यावेत.
स्वामी दयानंद यांनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या या समरात सर्वात आधी साधू-संतांना जोडलं जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रेरित करता येईल.
परंतु 1857 च्या या उठावात फार यश पदरी पडलं नाही तरी देखील स्वामी दयानंद निराश न होता लोकांना हे समजावीत होते की वर्षानुवर्षाची गुलामगिरी केवळ एका संघर्षाने संपुष्टात येऊ शकत नाही याला देखील काही काळ जावा लागेल.
दु:ख व्यक्त करण्यापेक्षा आनंद व्यक्त करा कारण स्वातंत्र्याची हि लढाई आता मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.
अविरत संघर्ष करत राहिलो तर ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून आपण निश्चित मुक्त झालेला भारत पाहू.
भारतीय स्वातंत्र्य समरात स्वामी दयानंद सरस्वतींचे योगदान पहाता भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभ भाई पटेल म्हणाले होते ……
भारताच्या स्वातंत्र्याचा पाया वास्तवात स्वामी दयानंदानी रचला होता.
गुरूंकडून मिळालेल्या मार्गदर्शना नंतर स्वामी दयानंद यांनी समाजात अनेक सुधारणा केल्या, भारत भ्रमण करून वेदशास्त्राचा प्रचार-प्रसार केला.
या दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. अनेकदा अपमान पदरी पडून देखील ते त्यांच्या मार्गावरून डगमगले नाहीत आणि समाजात पसरलेल्या अनिष्ट प्रथांचा कडाडून विरोध केला.
ख्रिश्चन धर्म, मुस्लीम धर्म आणि सनातन धर्माचा त्यांनी खुला विरोध केला.
वेदांमध्ये असलेल्या ज्ञानालाच त्यांनी सर्वश्रेष्ठ आणि प्रमाणित मानलं आणि या भावनेनेच त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
आर्य समाजाची स्थापना – Arya Samaj Established
परोपकार, जनसेवा, ज्ञान, आणि कर्म सिद्धांताला लक्षात ठेवून महान समाज सुधारक दयानंद सरस्वतींनी 1857 ला गुढीपाडव्याच्या दिवशी आर्य समाजाची स्थापना केली. त्याचं हे ऐतिहासिक कल्याणकारी पाउल मैलाचा दगड ठरला.
आर्य समाजाच्या स्थापनेचा उद्देश मानसिक, शारीरिक, आणि सामाजिक उन्नती करणे हा होता. आणि या विचारांनी स्वामीजींनी आर्य समाजाची स्थापना केली होती.
त्यांच्या या कार्याने जशी अनेक विद्वानांना प्रेरणा मिळाली तसच त्यांच्या या कार्याच्या विरोधकांची देखील कमतरता नव्हती,
अनेकांनी याचा विरोध देखील केला परंतु दयानंद सरस्वतींच्या तर्कसंगत ज्ञानापुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि मोठ-मोठ्या विद्वान पंडितांना देखील स्वामी पुढे नमतं घ्यावं लागलं.
अनेक विद्वानांना स्वामीजींनी वेदांचं महत्व समजवून सांगितलं.
धर्म परिवर्तन केलेल्या लोकांच्यात पुन्हा हिंदू होण्याची प्रेरणा रुजवली आणि त्याकरता शुद्धी आंदोलन चालवलं.
1886 साली लाहोर इथं दयानंदांचे अनुयायी लाला हंसराज यांनी दयानंद एंग्लो वैदिक महाविद्यालयाची स्थापना केली होती.
त्यामुळे हिंदू समाजात जागरूकता वाढीस लागली.
स्वामी दयानंद सरस्वतींचा ज्या व्यक्तीमत्वांवर प्रभाव पडला त्यात मादाम कामा, पंडित लेखराम, स्वामी श्रद्धानंद, पंडित गुरु दत्त विद्यार्थी, श्याम कृष्णन वर्मा ( यांनी इंग्लंड इथं भारतीय विद्यार्थ्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था केली), विनायक दामोदर सावरकर, लाला हरदयाल, मदन लाल धिंग्रा, राम प्रसाद बिस्मिल, महादेव गोविंद रानडे, महात्मा हंसराज, लाला लाजपत राय, यांसारख्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता.
समाजाच्या कल्याणासाठी स्वामी दयानंद यांनी कायम पुढाकार घेतला आणि एकतेचं महत्व पटवून दिलं.
स्वामी दयानंद सरस्वती एक थोर समाज सुधारक होते, समाजात पसरलेल्या अनिष्ट चालीरीती उदा. बाल विवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाह यांसारख्या प्रथा बंद केल्या आणि अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवला. एकतेचा संदेश देत स्वामीजींनी स्त्री शक्तीचे देखील समर्थन केले.
बाल विवाहास विरोध
स्वामी दयानंद सरस्वती ज्यावेळी समाज सुधारणेच्या कार्यात व्यस्त होते त्यावेळी समाजात बाल विवाहाच्या प्रथेने जोर धरला होता. अधिकतर वर्ग लहानपणीच आपल्या मुलांची लग्न करत असत, त्यामुळे मुलींना मोठ्या प्रमाणात शारीरिक कष्ट भोगावे लागत होते आणि अपरिपक्व वयात त्याचं शारीरिक शोषण देखील होत होतं.
स्वामीजींनी शास्त्राचा आधार घेत लोकांना बाल विवाहाच्या प्रथेविरुद्ध समजावलं कि मानवी जीवनात पहिल्या 25 वर्ष ब्रम्ह्चर्याचे पालन व्हावयास हवे आणि बाल विवाह ही अनिष्ट प्रथा आहे.
बालविवाह केल्यास मनुष्याचे शरीर फार लवकर निर्बल होते आणि निर्बलते मुळे त्याचा अकाली मृत्यू देखील होतो.
सती प्रथेचा विरोध
बाल विवाहा प्रमाणेच सती प्रथा देखील त्या काळात मोठ्या प्रमाणात फोफावली होती.
पतीच्या मृत्यू पश्चात त्याच्या पत्नीने त्याच्या चिते समवेत जिवंतपणी जाळून घेऊन सती जाण्याची अनिष्ट प्रथा नष्ट संपविण्यासाठी स्वामीजींनी आपला आवाज बुलंद केला.
संपूर्ण मानव जातीला प्रेम आणि आदरभावाचा संदेश देत परोपकाराची शिकवण दिली.
विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन
आज देखील अनेक भागात विधवेच्या पुनर्विवाहाला घेऊन लोकांच्या मानसिकतेत बदल झाला नसला तरी त्या काळात तर विधवांना अनेक प्रकारच्या अमानवीय छळाला सामोरं जावं लागत होतं.
इतकंच नव्हे तर सामान्य अधिकारांपासून देखील त्यांना वंचित ठेवण्यात येत असे.
स्वामी दयानंद यांनी समाजाच्या या वागणुकीचा निषेध करत प्रखर विरोध केला, आणि विधवा पुनर्विवाहाला घेऊन आपले विचार समाजापुढे ठेवले व लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
सगळ्या वर्गातील लोकांना समान अधिकार मिळावा
वर्णभेद, जातीभेदासारख्या कुप्रथेला स्वामीजींनी विरोध करत सर्वांना समान अधिकार मिळावा म्हणुन आपले विचार समाजापुढे ठेवले.
चार वर्ण केवळ समाज सुस्थितीत चालावा यासाठी निर्माण करण्यात आले असून समाजात वावरतांना कुणी लहान नाही आणि कुणी मोठा नाही, सगळे समान आहेत.
नारी शक्तीचे स्वामी दयानंदानी समर्थन केले आणि महिलांचे शिक्षण आणि सुरक्षेवर भर दिला.
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळायला हवेत याचा त्यांनी पुरस्कार केला.
महिलांना जर संधी मिळाली तर त्या पुरुषांच्या बरोबरीने कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात यावर स्वामीजींनी भर दिला.
स्वामी दयानंद यांनी सांगितलेले चार स्तंभ
- कर्म सिद्धांत
- पुनर्जन्म
- संन्यास
- ब्रम्हचर्य
स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यु – Swami Dayanand Saraswati Death
1883 साली स्वामी दयानंद सरस्वती महाराज यशवंत सिंहांना भेटायला जोधपुर ला गेले. त्या दरम्यान त्यांनी महाराजांना आपली अनेक व्याख्यानं ऐकवली, स्वामीजींच्या विचारांनी महाराज यशवंत सिंह फार प्रभावित झाले.
त्यांनी स्वामीजींचा फार आदर सत्कार केला.
त्या सुमारास राजा यशवंत सिंहांचे संबंध नन्ही जान नामक एका नर्तकी सोबत होते, ते पहाता स्वामीजींनी अत्यंत नम्रतेने महाराजांना त्यांच्या चुकीच्या आणि असामाजिक असलेल्या संबंधांची जाणीव करून दिली आणि म्हणाले,
एकीकडे आपण धर्माशी जुळवून घेण्याची इच्छा व्यक्त करता आणि दुसरीकडे मोह विलासात अडकलेले आहात…अश्याने ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही.
स्वामीजींच्या विचारांनी महाराजांचे डोळे उघडले आणि त्यांनी नन्ही जान समवेत आपले संबंध संपवले.
राजा यशवंत सिंहा समवेत आपले संबंध स्वामी दयानंदांमुळे संपुष्टात आले आहेत हे कळल्यावर नन्ही जान प्रचंड संतापली आणि रागाच्या भरात तिने स्वामी दयानंदांची हत्या केली.
रागावलेल्या नन्ही जान ने स्वयंपाक बनविणाऱ्या आचाऱ्या समवेत संगनमत करत स्वामी दयानंद यांच्या जेवणात काचेचे बारीक तुकडे मिसळले, ते भोजन ग्रहण केल्यावर स्वामीजींची तब्येत बिघडू लागली.
तपासाअंती आचाऱ्याने आपला गुन्हा कबुल केला त्यावेळी विशाल हृदयाच्या स्वामी दयानंद यांनी त्याला देखील क्षमा केले.
पण या घटने नंतर स्वामीजी नाही वाचले, त्यांना उपचारांसाठी 26 ऑक्टोबर रोजी अजमेर ला आणण्यात आलं, पण 30 ऑक्टोबर ला त्यांचा मृत्यू झाला.
स्वामी दयानंद सरस्वतींचे महान विचार – Swami Dayanand Saraswati Quotes
- हे शरीर ‘नश्वर’ आहे, मनुष्यता आणि आत्मविवेक काय आहे हे व्यक्त करण्याची या शरीराच्या माध्यमातून आपल्याला केवळ संधी मिळाली आहे.
- जीवनाचा मूळ उद्देश काय आहे हे केवळ वेदांचे सखोल अध्ययन करणाराच समजू शकतो.
- आपला ‘विवेक’ हे क्रोधाचं अन्न आहे त्यामुळे यापासून जपून रहायला हवं. कारण विवेक नष्ट झाल्यास सगळच शून्य आहे.
- अहंकारामुळे मनुष्य आपलं ‘आत्मबळ’ आणि ‘आत्मज्ञान’ गमावून बसतो.
- जर मनुष्य ‘शांत’ आहे त्याचं चित्त ‘प्रसन्न’ आहे हृदय ‘आनंदित’ आहे तर नक्कीच हे त्याच्या चांगल्या कर्माचं फळ आहे.
- उच्च कोटीची सेवा अश्या व्यक्तीची मदत करणे आहे जो तुम्हाला धन्यवाद म्हणण्यास असमर्थ आहे.
महर्षी दयानंद सरस्वती यांची पुस्तके आणि साहित्य- Swami Dayanand Saraswati Book
- सत्यार्थप्रकाश
- ऋग्वेदादिभाष्यभूमिका
- ऋग्वेद भाष्य
- यजुर्वेद भाष्य
- चतुर्वेदविषय सूची
- संस्कारविधी
- पंचमहायज्ञ विधी
- आर्याभीविनय
- गोकरुणानिधी
- आर्योद्देश्यरत्नमाला
- भ्रांतीनिवारण
- अष्टाध्यायीभाष्य
- वेदांगप्रकाश
- संस्कृतवाक्य प्रबोध
- व्यवहारभानू
- रोहतक येथील महर्षी दयानंद विश्वविद्यालय
- अजमेर येथील महर्षी दयानंद सरस्वती विश्वविद्यालय
- जालंधर चे डीएवी विश्वविद्यालय
- DAV कॉलेज प्रबंध समिती अंतर्गत 800 पेक्षा जास्त शाळांचे संचालन
स्वामी दयानंद सरस्वतींनी केवळ समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरा, अंधश्रद्धाच दूर केल्या नाहीत तर समाज कल्याणा साठी देखील अनेक उपयोगी कार्ये केलीत.
स्वातंत्र्य समरात सहभागी होऊन लोकांमध्ये देशप्रेमाची भावना देखील जागृत केली.
समाजासाठी असलेलं त्याचं योगदान कधीही विस्मृतीत जाणार नाही.
माझी मराठी टीम च्या वतीनं या महान व्यक्तिमत्वास शत शत नमन…!!
स्वामी दयानंद सरस्वतीं यांच्याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ about Swami Dayanand Saraswati
उत्तर: आर्य समाजाची स्थापना महर्षी दयानंद सरस्वती यांनी केली.
उत्तर: महर्षी दयानंद सरस्वतींच्या पुढाकाराने सती प्रथा, बाल विवाह प्रथा पूर्णतः बंद झाल्या.
उत्तर: गुरु श्री. विराजानंद हे स्वामी दयानंद सरस्वतींचे गुरु होत .
उत्तर: 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी दयानंद सरस्वतींचे योगदान महत्वपूर्ण समजल्या जाते.