Suvrnadurga Killa
‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र’ हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणलं होतं.
समुद्राचं महत्व जाणूनच त्यांनी आरमाराची निर्मिती केली आणि समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करण्याकरिता अनेक जलदुर्गांची निर्मिती केली.
त्यात काही जलदुर्ग शिवाजी महाराज यांनी बांधून घेतले तर काही जिंकून स्वराज्यात घेतले.
त्यापैकीच स्वराज्याच्या आरमाराचे वैभव असलेला व सागरी लाटांशी झुंज देत उभा असलेला कोकण किनारपट्टीवरील जलदुर्ग म्हणजे ‘सुवर्णदुर्ग’ हा किल्ला.
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास – Suvarnadurg Fort Information in Marathi
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै बंदराजवळ अरबी समुद्रात सुवर्णदुर्ग स्थित आहे.
एका बेटावर या किल्ल्याचे बांधकाम केलेले असून किल्ला जवळपास 5 एकर भागात विस्तारलेला आहे. जलदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून त्याची उंची 1400 फुट आहे.
इ.स. 1657 च्या सुमारास महाराज कोकणात उतरले, त्यावेळी त्यांनी समुद्र जवळून पाहिला. तेव्हा परकीय सत्तांमध्ये मोघल, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे प्रामुख्यानं होते.
यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता.
या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. त्यामुळे मराठ्यांना समुद्रमार्गे व्यापारात त्यांचा मोठा अडथळा निर्माण होत असे. या त्रासामुळेच शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार केला.
सुरुवातीला खोल समुद्रातील दळणवळण पेक्षा किनाऱ्याचं संरक्षण व्हावे, या उद्देशाने त्यांना कामास सुरूवात केली.
इतिहासात अनेक राज्यकर्त्यांनी समुद्रामधून होणारे आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्री शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आणि जेथे व्यापारी बंदरे आहेत, त्या ठिकाणी अनेक किल्ले बांधले. त्यामधील एक महत्वाचा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला आहे.
कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जायचे. पूर्वीच्या काळी समुद्रकिनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले आंग्रे कुटुंबाच्याच देखरेखीखाली होते.
सुवर्णदुर्ग किल्ल्याची जबाबदारीही आंग्रे कुटुंबाकडेच होती.
16 व्या शतकात हा किल्ला आदिलशहाकडे होता. 1660 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली. मोहिमेची जबाबदारी मायनाक भंडारींवर दिली.
महाराजांनी दिलेल्या आज्ञेवरून मायनाक भंडारी यांनी सैन्यासह सुवर्णदुर्ग वर हल्ला चढविला. त्यांनी सुवर्णदुर्ग स्वराज्यात दाखल केला.
किल्ल्यावर झालेल्या या धुमश्चक्रीत त्यांचा पुतण्या मात्र धारातीर्थी पडला. किल्ला ताब्यात आल्यानंतर महाराजांनी गडाची डागडुजी करून घेऊन किल्ला आणखी बळकट केला. त्यासाठी जवळपास 10 हजार होन खर्च आला होता.
शिवरायांनी आपले आरमार त्या ठिकाणी ठेवले. पुढे सिद्दी सुवर्णदुर्गवर चाल करून गेला पण कान्होजी आंग्रे यांनी चिवटपणे लढा देत गड कायम ठेवला. त्यांच्या या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सुवर्णदुर्गचे किल्लेदार केले.
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Tourist Places Suvarnadurg Fort
या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे गाव म्हणजे दापोली. येथून बोटीने किल्ल्याजवळ गेल्यानंतर सर्वात आधी महादरवाजा आपल्याला दिसतो.
हे दार शिवाजी महाराजांनी बांधून घेतले होते असे म्हणतात. दाराच्या कमानीवर आपल्याला वेगवेगळे शिल्प पहावयास मिळतात.
किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला विहिरी पहायला मिळतात. तसेच किल्ल्यावर तीन तलावही दिसतील.
किल्ला समुद्रात असल्यामुळे पिण्यासाठी व वापरासाठी गोड पाण्याच्या साठवणुकीसाठी त्याचा उपयोग होत असावा.
पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला काही दगडी चौथरे व राजवाड्याचे भग्नावशेष आपल्याला दिसून येतात.
किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या तटाला 4 फुट उंचीचा सुंदर आणि सुरेख असा चोर दरवाजा आहे. महादरवाज्या समोर आपल्याला काही तोफा पहायला मिळतात.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आपल्याला एकूण 24 बुरुज आहेत. या बुरुजांची उंची हि जवळपास 30 फुट असून त्यावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजांचा उपयोग होत असे.
या किल्ल्याचे महत्व लक्षात घेता किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णै किनाऱ्यावर आणखी तीन लहान किल्ले म्हणजेच कनकदुर्ग, गोवा किल्ला आणि फतेहगड किल्ला देखील पर्यटकांचे आकर्षण आहे.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर कसे पोहोचाल? – How to reach Suvarnadurg Fort Fort?
आपण वर्षभर किल्ल्याला भेट देऊ शकतो. पण पावसाळ्यात आणि खराब वातावरणात या किल्ल्याला भेट देणे टाळा.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड ते दापोली आणि पुढे दापोली ते हर्णै अशी बस सेवा आहे. हर्णै बसस्थानकावरून सुमारे 10-15 मिनिटांत हर्णै बंदरावर पोहोचता येते.
कोकण रेल्वे मार्गावरील खेड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
बंदरातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेच्या काही बोटी आहेत त्या बोटीने सुवर्णदुर्गला जाऊ शकता.
ऐन समुद्राच्या पायथ्याशी असलेल्या या किल्ल्यात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने पिण्याचे पाणी नक्की सोबत घेऊन जावे.
अथांग अशा सागरात इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या.
आणि अशाच काही वेगवेगळ्या माहितीसाठी जुळून रहा ‘माझी मराठी’ सोबत.
सुवर्णदुर्ग किल्ल्याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Suvarnadurga Fort
उत्तर: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात.
उत्तर: समुद्रमार्गे शत्रूंचे आक्रमण रोखण्यासाठी आरमार वाढविणे.
उत्तर: कान्होजी आंग्रे यांच्याकडे.
उत्तर: दापोलीतील हर्णै बंदराजवळ. (जि. रत्नागिरी, कोकण)