Sushma Swaraj
आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करीत आहेत, असे असले तरी एक काळ असा होता की महिलांना घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नव्हते.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे बदल हा प्रत्येक वेळेला होतच असतो, त्यानुसार मानवी समाजात देखील त्याचा परिणाम होतच असतो.
या झालेल्या बदलानुसार महिला आपल्या घराची जबाबदारी साभाळत असतांना देशाच्या विकासात सुद्धा आपले योगदान देत आहेत.
भारताच्या राजनीती मध्ये महिलांचे देखील तितकेच योगदान आहे जितके पुरुषांचे आहे.
ज्या घरात महिलांना घरातील भांडणात सहभागी होऊ देत नव्हते, तसेच ज्या महिलांना विदेशात जायचं होत त्यांना घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. त्याच महिला आज देश साभाळत आहेत.
आज आपल्या देशाच्या रक्षा मंत्री एक महिला आहेत आणि विदेश मंत्री देखील एक महिलाच आहे. या पेक्षा मोठ दुसर कुठलच उदाहरण महिलांबद्दल होऊ शकत नाही.
विदेश मंत्री सुषमा स्वराज- ह्या खूप काळापासून भारताच्या राजनीतीमध्ये सक्रीय होत्या. सुषमा स्वराज अशा काही मोजक्या स्त्रियांपैकी एक होत्या ज्यांनी घर आणि देशाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. तसेच स्त्रियांसाठी एक उदाहरण बनल्या.
आपणास महिती नसलेली सुषमा स्वराज यांच्या जीवनाविषयी सर्व माहिती – Sushma Swaraj Information
सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ साली अंबाला या ठिकाणी झाला होता.
सुषमा स्वराज यांचे वडिल ‘श्री हरदेव शर्मा’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सदस्य होते. यामुळे सुषमा स्वराज यांना त्यांच्या लहानपणापासूनच संघ आणि राजकारणाविषयी बाळकडू मिळाल होत.
सुषमा स्वराज यांनी आपल्या वडिलांपासून वेगळ होऊन स्वता:च्या हिमतीने स्वता:ची ओळख निर्माण केली.
सुषमा स्वराज यांचे शिक्षण – Sushma Swaraj Education
सुषमा स्वराज यांनी आपले शिक्षण अंबाला छावणीतील एस डी महाविद्यालयात घेतले. त्यांनी बी ए ची पदवी घेतल्यानंतर पंजाबच्या विद्यापीठामध्ये कायद्याची पदवी घेतली.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्यांची विचार सारणी आणि स्पष्टवक्तेपणा च्या वृत्तीमुळे त्यांना सर्वोच्च वक्ता म्हणून सम्मान मिळाला.
इतकेच नाही तर सुषमा स्वराज ह्या महाविद्यालयात असतांना एन सी सी च्या सर्वोच्चा कैडेट होत्या. सुषमा स्वराज यांना सतत ३ वर्ष राज्यस्तरीय सर्वोच्च वक्ता म्हणून सम्मान मिळाला.
सुषमा स्वराज यांचे वयक्तिक आयुष – Sushma Swaraj Marriage
सुषमा स्वराज यांचा विवाह स्वराज कौशल यांच्या सोबत झाला आहे.
स्वराज कौशल हे सुषमा स्वराज यांच्या बरोबर सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता या पदावर कार्यरत होते.
स्वराज कौशल हे सर्वात कमी वयात राज्यपालपदी विराजमान होणारे पहिले व्यक्ती आहेत. ते मिजोरम चे राज्यपाल राहिले आहेत.
स्वराज कौशल यांनी सहा वर्षा पर्यंत राज्यसभेचे सांसद म्हणून काम केले आहे. या स्वराज जोडप्यांनी केल्या असलेल्या कामगिरी साठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले.
सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी असून तिचे नाव बांसुरी आहे. बांसुरी लंडन येथील इनर टेम्पल मध्ये वकिलीचे शिक्षण घेत आहे.
सुषमा स्वराज यांचा राजकारणातील प्रवास – Sushma Swaraj Political Career
सुषमा स्वराज यांनी जेव्हा राजकारणात उतरण्याचे ठरवले होते त्या वेळी भारतात आणीबाणी लावली गेली होती. या आणीबाणीला विरोध करणाऱ्यान पैकी जयप्रकाश नारायण हे प्रमुख होते.
आणीबाणी मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. अश्याप्रकारची परिस्थिती पाहून सुषमा स्वराज यांनी देखील जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेण्याचे ठरविले. सुषमा स्वराज यांनी मोठया जोमाने या आंदोलनात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
यानंतर सुषमा स्वराज यांचा राजकारणातील प्रवास सुरु झाला. त्या सुरवातीला जनसंघ पक्षात सक्रीय झाल्या. तो पक्ष आज भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो.
सुषमा स्वराज यांचा राजनीतिक जीवनात प्रवास करण्याआधी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता पदावर काम केले आहे. सुषमा स्वराज यांना राजनीतिक पक्षाच्या पहिली महिला प्रवक्ता बनण्याचा मान देखील मिळाला आहे.
सुषमा स्वराज ह्या सर्व प्रथम १९७७ मध्ये हरियाणाच्या विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
हरियाणाच्या विधानसभेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांना कामगार रोजगार मंत्री पद देण्यात आले होते. यानंतर त्या पुन्हा १९८८ साली हरियाणा विधानसभा सदस्य म्हणून निवडण्यात आले.
यावेळेला त्यांना शिक्षण, अन्न व नागरी मंत्री पद देण्यात आले.
सुषमा स्वराज ह्या सर्वात पहिले १९९० साली राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर १९९६ साली त्या लोकसभेच्या सदस्य पदी निवडल्या गेल्या.
१९९६ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेलेल्या केंद्रातील सरकारने त्यांना सूचना व प्रसारण मंत्रालय पद दिले होते.
सुषमा स्वराज यांचा राजकारणातील प्रवास असाच सुरु असताना १९९८ साली त्या पहिल्यांदा दिल्ली च्या मुख्यमंत्री बनल्या.
सुषमा स्वराज ह्या राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
काही काळानंतर त्यांनी दिल्ली विधानसभेच्या पदाचा राजीनामा दिला आणि लोकसभा सदस्य पदावर कायम स्वरूपी राहिल्या.
अटल बिहारी वाचपेयी च्या २००३ साली बनलेल्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांना पुन्हा एकदा सूचना व प्रसारण मंत्र्लाय पद देण्यात आले.
यानंतर जेव्हा जेव्हा भाजप ची सरकार केंद्रात बनली त्यावेळेला सुषमा स्वराज यांना त्याच्या योग्यतेनुसार महत्वाची खाते देण्यात आले आहे.
सुषमा स्वराज ह्या हरियाणाच्या विदिशा येथील लोकसभेच्या सदस्यपदी राहिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी परराष्ट्र व्यवहार विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषविले आहे.
सुषमा स्वराज या विशेष करून ओळखल्या जातात ते त्यांच्या मजबूत व्यक्तिमत्वा साठी. कोणत्याची व्यक्तीच्या चुकीबद्ल त्या परखडपणे आपले विचार मांडत असत.
सुषमा स्वराज यांचे निधन – Sushma Swaraj Death
सुषमा स्वराज यांचा मृत्यू ६ ऑगस्ट २०१९ मध्ये दिल्ली च्या एम्स रुग्णालयात हृदयविकारामुळे झाला. त्यांच्या मृत्यू च्या वेळेस त्यांचे वय ६७ वर्ष होते.
सुषमा स्वराज यांचे निधन होण्यापूर्वीच त्यांची शारीरिक प्रकुर्ती व्यवस्थित नव्हती.
९ वेळा लोकसभेच्या संसद सदस्य राहिलेल्या सुषमा स्वराज ह्या सर्व सामान्य जनतेत भरपूर लोकप्रिय होत्या. सुषमा स्वराज ह्या १९७७ साली सर्वात लहान वयाच्या राज्यमंत्री बनल्या.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नावे अनेक प्रकारचे विक्रम नोंदावल्या गेले आहेत. सलग तीन वर्षे त्या राज्याच्या प्रवक्त्या राहिल्या.
सुषमा स्वराज यांचे राजकारणात आगमन झाल्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय मंत्री बनल्या.
भाजप पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या पदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील भाजप पक्षाच्या त्या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी मंत्री पद मिळविले आहे.
भारतीय संसदे तर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट सांसद पुरस्कार मिळवणाऱ्या सुषमा स्वराज ह्या पहिल्या महिला आहेत.
राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा त्यांचा प्रथम क्रमांक लागतो. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री पदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
विश्वास बसत नाही की, ज्या काळी महिलांना स्वतंत्र नसतांना देखील सुषमा स्वराज सारख्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या स्त्री ने राजकारणात प्रवेश केला होता.
ज्यावेळेस सुषमा स्वराज यांनी राजकारणात प्रवेश केला होता त्यावेळेस महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नव्हती.
ज्या काळात महिला आपल्या अधिकारांपासून वंचित होत्या, त्या काळात सुषमा स्वराज यांनी कुठल्याही प्रकारचे राजनीतिक पार्श्वभूमी नसतांना देखील राजकारणात प्रवेश करून सतत सक्रीय राहिल्या.
आपल्या राजनीतिक क्षेत्रामध्ये त्यांनी पहिल्या महिला मुख्यमंत्री पदापासून ते पहिल्या परराष्ट्र मंत्री बनण्या पर्यंत अनेक विक्रम आपल्या नावे केले. इतकेच नव्हे तर त्यांनी महिलांना राजकारणात येण्याकरिता आणि देशसेवेकरिता प्रवृत्त केले.