Surya Grahan Information in Marathi
२०२० या सालचे पहिले सूर्यग्रहण हे २१ जुन २०२० ला दिसणार आहे. हे ग्रहण किती वेळ राहणार आहे? सोबतच ज्योतिषांच्या मते या ग्रहणाचा कोणत्या राशींवर कोणता प्रभाव पडणार आहे.
या विषयी आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत, सोबतच ग्रहणांचे प्रकार तसेच सूर्यग्रहण का घडते या सर्व गोष्टींची माहिती थोडक्यात आपण या लेखात पाहूया, तर चला जाणून घेऊया ग्रहणाविषयी थोडक्यात.
२१ जूनला होणाऱ्या सुर्यग्रहणा विषयी थोडक्यात माहिती – Surya Grahan Information in Marathi
ग्रहणांचे प्रकार किती आहेत? – Types of Eclipse
ग्रहणाविषयी आपल्याला भूगोलात शिकायला मिळाले आहे की ग्रहण हे दोन प्रकारचे असते. चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण. या दोन प्रकारात काही ग्रहणाला विभाजल्या जात. जर आपण सूर्यग्रहण किंवा चंद्र ग्रहणाचा अभ्यास केला असेल तर आपल्याला दोन्ही ग्रहणांचे काही प्रकार पाहायला मिळतात.
ग्रहणांचे उपप्रकार कोणते?
ग्रहणांचे उपप्रकार आपल्याला तीन वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, ते म्हणजे खग्रास, खंडग्रास, आणि कंकणाकृती. या तीन प्रकारे ग्रहणांना विभाजित केल्या जात.
खग्रास – या ग्रहणात आपल्याला पाहायला मिळते की चंद्र पूर्णपणे झाकलेला असतो, म्हणजे पूर्णपणे झाकल्या जाणाऱ्या ग्रहणाला खग्रास ग्रहण म्हणतात.
खंडग्रास – हा ग्रहणाचा असा प्रकार येतो की यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, त्याचा थोडासा भाग आपल्याला दिसत असतो म्हणून या ग्रहणाला खंडग्रास ग्रहण म्हणतात.
कंकणाकृती – या ग्राहणात झाकलेला भाग हा एखाद्या बांगडीच्या आकाराचा दिसतो म्हणून या ग्रहणाला कंकणाकृती ग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहण का होते? – Why Solar Eclipse Occur
सोप्या भाषेत जर सांगायचे असल्यास तर आपण असे सांगु शकतो, की जेव्हा पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं.
आणि २०२० च्या सुरुवातीचे हे पहिले सूर्यग्रहण आहे, हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारचे आहे म्हणजेच चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकू शकणार नाही आहे. सूर्याचा थोडासा भाग आपल्याला दिसणार आहे. २१ जून म्हणजेच आषाढ कृष्ण पक्षाच्या अमावसेला हे ग्रहण होणार आहे. या ग्रहणामध्ये चंद्र सूर्याला जवळजवळ ३०-३५ सेकंड मोठया प्रमाणात झाकून घेणार आहे, पण त्यानंतर सूर्याचा थोडासा भाग आपल्याला दिसेल,
हे सूर्यग्रहण भारतातील दक्षिणेकडील काही भागातुनच कंकणाकृती दिसेल पण इतर भागांतून व महाराष्ट्रातुन ते खंडग्रासच दिसेल,
या ग्रहणाचे वेध शनिवारी म्हणजे २० जून च्या रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुरू होणार आहेत. या ग्रहाणाची सुरुवात २१ जून ला सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी होणार आहे, आणि हे सूर्यग्रहण दुपारच्या १ वाजून ४० मिनिटांपर्यंत राहणार आहे.
काही जोतिष्यांच्या मते हे ग्रहण मिथुन, आर्द्रा, मृग या नक्षत्रातून होणार असल्याने मिथुन, वृषभ, आणि कर्क राशीच्या व्यक्तींना हे ग्रहण त्रास दायक ठरणार आहे.
तसे पाहिले असता हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात, आफ्रिका खंडात, इंडोनेशिया, दक्षिण युरोप, आणि पॅसिफिक महासागरातून सुध्दा दिसेल.
आपल्या माहिती साठी या वर्षात एकूण ५ ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी ३ चंद्रग्रहणे आहेत आणि २ सुर्यग्रहणे आहेत, परंतु या २ सूर्य ग्रहणांपैकी एकच सूर्य ग्रहण हे आपल्या देशातून दिसेल.
आशा करतो आपल्याला खंडग्रास सुर्य ग्रहणाविषयी बरीच माहिती या लेखात मिळाली असेल आपल्याला लेखात लिहिलेली माहिती आवडली असेल तर या लेखाला आपल्या परिवारातील सदस्यांना तसेच मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us.