Sunita Williams Mahiti
सुनीता विलियम्स यांनी अंतराळाची सफर करून केवळ भारताला गौरव प्राप्त करून दिला असे नाही तर अनेक मुलींकरीता त्या आदर्श ठरल्या.
ध्येय आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्या आज या स्तरावर पोहोचल्या असुन संपुर्ण विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे.
सुनीता विलियम्स ला इथवर पोहोचण्याकरीता आयुष्यात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे.
मोठया हिमतीने त्या पुढे जात राहील्या आणि जमीन, आकाश व समुद्रात जाण्याचे पाहिलेले स्वप्नं पुर्ण केले. अमेरीकन अंतराळ एजंसी “नासा” च्या माध्यमातुन त्यांनी अंतराळाची यात्रा केली. सुनिता एक अशी स्त्री आहे जीने अंतराळाची यात्रा तब्बल 7 वेळा केली आहे.
एवढेच नाही तर त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन दल 14 आणि 15 च्या सदस्य देखील राहिल्या आहेत.
2012 साली या देशाच्या कन्येने अभियान दल 32 मधे फ्लाईट इंजिनियर बनुन आणि अभियान दल 33 मधे कमांडर बनुन सेवा दिली आहे.
सुनिता विल्यम्सच्या व्यक्तिगत जीवनापासुन तर तिने मिळवलेल्या यशाबद्दल खाली विस्तृत लिहीले आहे.
सुनीता विलियम्स ची कहाणी – Sunita Williams Information in Marathi
सुनीता विलियम्स ची थोडक्यात माहिती – Sunita Williams Biography in Marathi
पुर्ण नाव (Name) | सुनीता माइकल जे. विलियम (Sunita Williams) |
जन्म (Birthday) | 19 सप्टेंबर 1965, युक्लिड, ओहियो राज्य |
वडिल (Father Name) | डाॅ. दिपक एन. पांड्या |
आई (Mother Name) | बानी जालोकर पांड्या |
विवाह | माइकल जे. विलियम (Sunita Williams Husband) |
सुनीता विलियम्स चे प्रारंभिक जीवन – Sunita Williams History
सुनीता विलियम्स चा जन्म सुनीता लिन पांड्या विलियम्स च्या रूपात 19 सप्टेंबर 1965 ला झाला होता.
अमेरीकेतील ओहियो राज्यात युक्लिड नगर (क्लीवलैंड) त्यांचा जन्म झाला. नीदरम, मैसाचुसेट्स येथे सुनिता लहानाची मोठी झाली आणि शालेय शिक्षण प्राप्त केले.
अंतराळवीर सुनीता विलियम्स चे शिक्षण – Sunita Williams Education
सुनीता विलियम्स ने 1983 साली मैसाचुसेट्स येथुन हायस्कुल चे शिक्षण पुर्ण केले पुढे 1987 ला संयुक्त राष्ट्राच्या नौसैनिक अकादमीतुन फिजीकल सायन्स या विषयात बीएस परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यानंतर सुनिता ने 1995 ला फ्लोरिडा इंस्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी येथुन इंजिनियरींग मॅनेजमेंट मधुन मास्टर ऑफ सायन्स (एम.एस.) पदवी प्राप्त केली.
सुनीता विलियम्स चे कुटुंब – Sunita Williams Family
सुनिताचे वडिल दिपक एन. पांड्या डॉक्टर असुन एक प्रसिध्द शास्त्रज्ञ देखील आहेत. ते मुळचे भारतातल्या गुजराज राज्यातील आहेत. सुनिताच्या आईचे नाव बॉनी जालोकर पांड्या असुन त्या स्लोवेनिया येथील आहेत.
सुनिताला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहिण देखील आहे. त्यांची नावं जय थॉमस पांडया आणि डायना एन, पांडया आहे.
सुनिता चे वय ज्यावेळी एक वर्षापेक्षा देखील कमी होते त्यावेळीच तीचे वडिल अहमदाबाद येथुन अमेरीकेला स्थायीक झाले.
अंतराळाची सफर करणारी भारतीय वंशाची दुसरी महिला सुनीता विलियम्स ने आपल्या आई वडिलांकडुन प्रेरणा घेतली आहे.
सुनिता चे वडिल फार सरळ स्वभावाचे आहेत सामान्य जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास आहे. वडिलांचे हे विचार सुनिताला फार प्रभावित करतात. सुनिताची आई बॉनी जालोकर पांड्या यांनी आपल्या कुटुंबाला एका सुत्रात बांधण्यात यश मिळवले आहे.
नात्यांची मुल्य जपणं आणि नात्यांचा गोडवा टिकवुन ठेवणं यावर त्या भर देतात या सोबतच निसर्ग मुल्यांची त्यांना चांगली जाण आहे.
प्रकृतीच्या मुल्यांची जाणीव सुनिताला आपल्या आईकडुन संस्कारात मिळाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुनिता आपला रोल मॉडल मानते त्यांच्या विचारांवर चालण्याचा ती नेहमी प्रयत्न करते.
अंतराळात जातांना सुनिता “भगवत गीता” आपल्या सोबत घेउन गेली:
सुनिता विल्यम्स्ची देवावर आस्था आहे. हिंदुंच्या सर्वोच्च अश्या भगवान गणेशावर तीची श्रध्दा आहे.
असं म्हणतात की आपल्या अंतराळ यात्रे दरम्यान सुनिता हिंदुंचा पवित्र असा भगवतगीता हा ग्रंथ आपल्या सोबत घेउन गेली होती वेळ मिळेल तेंव्हा ती याचे वाचन करीत असे.
भगवान श्रीकृष्णाने भगवतगीतेत केलेल्या उपदेशांना सुनिता आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करते. सुनीता विलियम्स सोसायटी ऑफ एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट ची सदस्य देखील राहीली आहे.
सुनीता विलियम्स चा विवाह – Sunita Williams Marriage
सुनिता जेव्हां 1995 ला Florida Institute of Technology मधुन M.Sc. Engineering Mgmt. चे शिक्षण घेत होती तेव्हां तीची भेट माइकल जे. विल्यम्स् यांच्याशी झाली.
हळुहळु मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यांनतर दोघांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
माइकल जे. विल्यम्स् एक नौसेना चालक, हेलीकॉप्टर पायलट, परिक्षण पायलट, नौसैनिक आणि जलतरणपटु देखील आहेत.
1987 ला नौसेनेशी जोडली गेली सुनीता विलियम्स – Sunita Williams Career
मुळ भारतिय वंशाची अमेरीकी नौसेना कॅप्टन सुनीता विलियम्स इतर मुलींपेक्षा वेगळी होती.
लहानपणापासुन काहीतरी वेगळं करण्याचे तीचे स्वप्नं होते. जमीन आकाश आणि समुद्र या तीनही ठिकाणी तीला जायचं होतं.
बहुदा म्हणुनच मे 1987 ला अमेरिकी नेवल अकॅडमी च्या माध्यमातुन ती नौसेनेशी जुळली आणि त्यानंतर हेलीकॉप्टर पायलट झाली.
6 महिन्यांच्या नेवल तटवर्ती कमांड मधील अस्थायी नियुक्ती नंतर सुनिता ला ’बेसिक डाइविंग ऑफिसर’ या पदावर निवडण्यात आले. पुढे तीला नेवल एयर टेªनिंग कमांड म्हणुन ठेवले व जुलै 1989 मधे तीला नेवल एवियेटर चे पद देण्यात आले.
त्यानंतर सुनिता यांची नियुक्ती ’हॅलीकॉप्टर कॉम्बैट सपोर्ट स्क्वाड्रन’ म्हणुन करण्यात आली.
त्यांनी आपल्या प्रारंभिक ट्रेनिंग ची सुरूवात हॅलीकॉप्टर कॉम्बैट सपोर्ट स्क्वाड्रन 3 ( एचसी 3 ) मधें H-46 सागर नाइट मधुन केली होती. त्यानंतर सुनिता विल्यम्स्वर नॉरफोक, वर्जीनियात हेलीकॉप्टर कंबाट सपोर्ट स्क्वाड्रन 8 ( एचसी 8 ) ची जवाबदारी सोपविली या दरम्यान सुनीता विलियम्स यांना अनेक ठिकाणच्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या.
भुमध्यसागर, रेड सी आणि पार्शियन गल्फ मधे त्यांनी ’ऑपरेशन डेजर्ट शील्ड’ आणि ’ऑपरेशन प्रोवाइड कम्फर्ट’ दरम्यान कार्य केलं.
सप्टेंबर 1992 ला त्यांना H-46 तुकडी चा ऑफिसर इनचार्ज बनवुन मिआमि (फ्लोरिडा) ला पाठविण्यात आले. या तुकडीला ’हरिकेन एंड्रू’ शी संबंधीत कामाकरीता पाठविण्यात आले होते.
1993 साली जानेवारी महिन्यात सुनिता यांनी ’यू. एस. नेवल टेस्ट पायलट शाळेत’ आपल्या अभ्यासक्रमाला सुरूवात केली आणि डिसेंबर मधे त्यांनी हा कोर्स पुर्ण केला.
डिसेंबर 1995 मध्ये त्यांना ’यू.एस. नेवल टेस्ट पायलट शाळेत’ ’रोटरी विंग डिपार्टमेंट’ में प्रशिक्षक आणि शाळेची सुरक्षा अधिकारी म्हणुन पाठविण्यात आले. तेथे त्यांनी यूएच 60, ओएच 6 आणि ओएच 58 सारख्या हॅलीकॉप्टर मधुन उड्डाण केले.
पुढे त्यांना यूएसएस पदावर वायुमान संचालक आणि असिस्टंट एयर बाॅस पदावर पाठविण्यात आले या दरम्यान सुनिता यांनी 30 वेगवेगळया विमांनांमधुन 3,000 तासांपर्यंत उड्डाण करून लोकांना आश्चर्यचकीत करून टाकले.
सुनीता विलियम्स यांची नासा मधील कारकिर्द – Sunita Williams NASA Career
1998 साली सुनिता यांची निवड NASA करीता झाली त्यावेळी त्या यूएसएस सैपान वरच कार्यरत होत्या.
त्यांची एस्ट्रोनॉट कैंडिडेट ट्रेनिंग जॉनसन स्पेस सेंटर मधे ऑगस्ट 1998 ला सुरू करण्यात आली.
सुनीता विलियम्स ने आपल्या चिकाटी, दुर्दम्य आशावाद आणि साहसाने हे टेनिंग यशस्वीरित्या पुर्ण केले त्यानंतर त्यांना 9 डिसेंबर 2006 मधे अंतरिक्षयान ’डिस्कवरी’ मधुन ’आंतराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात’ पाठविण्यात आले तेथे त्यांना एक्सपीडिशन 14 या दलात सहभागी व्हायचे होते.
एप्रील 2007 मधे रूस च्या अंतरीक्ष यात्रीला बदलण्यात आले त्यामुळे हे एक्सपीडिशन 15 झाले.एक्सपीडिशन 14 आणि 15 दरम्यान सुनीता विलियम्स यांनी तीन स्पेस वाक केले.
6 एप्रील 2007 ला त्यांनी अंतराळातच ’बोस्टन मॅराथन’ मध्ये सहभाग घेतला आणि त्याला सुनिता यांनी फक्त 4 तास 24 मिनीटांमधेच पुर्ण केले. या स्पर्धेमुळे सुनीता विलियम्स अंतराळात मॅराथन मधे धावणारी पहिली व्यक्ती ठरली आणि 22 जुन 2007 ला ती पृथ्वीवर परतली.
2012 साली सुनिता एक्सपीडिशन 32 व 33 शी जुळली तीला 15 जुलै 2012 ला बैकोनुर कोस्मोड्रोम मधुन अंतराळात पाठविण्यात आले तिचे अंतराळयान सोयुज ’आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी’ जोडले गेले. सुनिता 17 सप्टेंबर 2012 ला एक्सपीडिशन 33 ची कमांडर बनली. या उपलब्धी मिळविणारी ती केवळ दुसरी महिला आहे.
सप्टेंबर 2012 ला अंतराळात त्रैथलों करणारी पहिली व्यक्ती बनली. 19 नोव्हेंबर को सुनीता विलियम्स धरतीवर परत आली. सुनीता विलियम्स ज्यावेळी आपले प्रशिक्षण पुर्ण करीत होती त्यावेळी तिला अनेक तांत्रिक विषयांच्या माहिती सोबतच वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रात्यक्षिकांचे ब्रीफिंग, स्पेस शटल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन यांची देखील माहिती देण्यात आली.
या दरम्यान सुनिता ला मनोवैज्ञानिक प्रशिक्षण आणि टी 38 वायुयान व्दारे प्रशिक्षण दिल्या गेले या व्यतिरीक्त सुनिताला पाण्याच्या आत आणि एकांतवासातील परिस्थीतीशी देखील अवगत करून देण्यात आले.
प्रशिक्षणा दरम्यान सुनीता विलियम्स ने रूसी अंतराळ संस्थेत देखील काम केले आणि या प्रशिक्षणात त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन च्या रूसी भागाची देखील माहिती देण्यात आली.
एवढेच नव्हें तर अंतराळ स्टेशन मधील रोबोटिक तंत्रावर देखील सुनीता विलियम्स ला प्रशिक्षीत करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान विशेष म्हणजे मे 2002 ला सुनिता पाण्याच्या आत एक्वेरियस हैबिटेट मध्ये 9 दिवस राहीली.
सुनिता विल्यम्स्ची अंतराळातील भरारी – Sunita Williams Space Missions
भारतिय वंशाची महिला अंतराळ यात्री सुनीता विलियम्स आपल्या स्वप्नाला पुर्ण करण्याकरीता दोन वेळा अंतराळात जाऊन आली आहे. भारतिय वंशाच्या या महिलेने पुर्ण विश्वात आपला किर्तीमान स्थापीत केला आहे.
अंतराळात आपल्या नावाचा झेंडा रोवण्याकरता सुनिता अंतराळातील दोनही यात्रां दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन ’अल्फा’ ने गेली आहे.
स्टेशन ’अल्फा’ 16 देशांची संयुक्त परियोजना आहे. अल्फा स्टेशन चे वैशिष्टय असे की यात अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा, राहाण्याची सुविधा, रोबोटिक भुजा आणि उड्डाण प्लॅटफॉर्म सोबत जोडले जाणारे नोड लागलेले आहेत. हे स्टेशन जवळजवळ एका फुटबॉल मैदान क्षेत्राएवढे विस्तीर्ण आहे.
सुनीता विलियम्स पहिले अंतराळातील उड्डाण:
लहानपणापासुन अंतराळात उडण्याचे सुनीता विलियम्स ने पाहिलेले स्वप्नं 9 डिसेंबर 2006 ला पुर्ण झाले ज्यावेळी ती पहिल्यांदा अंतराळात गेली.
तीची ही पहिली अंतराळ यात्रा स्पेस शटल डिस्कव्हरी च्या माध्यमातुन सुरू झाली.
आपल्या पहिल्या अंतराळ यात्रे दरम्यान भारतिय वंशाची सुनीता विलियम्स अंतराळात एकुण 321 दिवस 17 तास आणि 15 मिनीटं राहीली. सुनीता विलियम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन च्या स्थायी अंतराळ यात्री चमु ची फ्लाईट इंजिनीयर होती पुढे ती स्थायी अंतराळ यात्री दल 15 ची देखील फ्लाईट इंजिनीयर झाली.
यासोबतच ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन ची कमांडर होणारी जगातील दुसरी महिला देखील आहे. आपल्या दुसऱ्या अंतराळ यात्रे दरम्यान सुनीता विलियम्स ने तीन स्पेस वाॅक देखील केलेत.
स्पेस वाक म्हणजे काय ? – What is Space Walk
अंतराळात अंतराळयान (याच्या आतील वातावरण मानवा करीता पृथ्वीसारखे असते) मधुन बाहेर पडुन मुक्त अश्या अंतराळात (जेथील वातावरण मानवा करीता अतिशय धोकादायक असतं, हवेचा अतिशय दाब असतो आणि किरणांनी भरलेल्या या ठिकाणी उल्कांचा देखील धोका असतो) बाहेर पडली, यानातील दुरूस्ती व पार्टस् बदलणे व डिप्लायमेंट ची कामे करण्याला स्पेसवाक असे म्हणतात.
स्पेस वाक वर जाण्याकरीता अंतराळयात्री एक विशेष प्रकारचा सुट परिधान करतात. या सुट मधे अंतराळात उड्डाण करणाऱ्याकरीता जीवन रक्षा प्रणाली आणि अन्य सुविधा देखील असतात आपल्या अंतराळातील प्रवासादरम्यान सुनिता विल्यम्स्ने अंतराळ स्टेशनच्या आत अनेक परिक्षण देखील केलेत.
सुनीता विलियम्स फिट राहाण्याकरीता अंतराळात ट्रेडमिल वर रोज व्यायाम देखील करीत असे.
अंतराळात बोस्टन मरेथोन स्पर्धेत भाग घेतला:
अंतराळातील यात्रे दरम्यान सुनीता विलियम्स ने 16 एप्रील 2007 ला अंतराळ बोस्टन मरेथोन स्पर्धेत भाग घेतला व तिने केवळ 4 तास 24 मिनीटांत ही स्पर्धा पुर्ण केली. या मॅराथाॅन स्पर्धेत सुनिताची बहिण डियना हिने देखील सहभाग घेतला होता.
आपल्या पहिल्या अंतराळ यात्रेतील सर्व कार्य पुर्ण करून ती 22 जुन 2007 ला स्पेस शटल अटलांटिस च्या माध्यमातुन धरतीवर परत आली होती.
अंतराळवीर सुनीता विलियम्स ची दुसरी अंतराळ यात्रा:
21 जुलै 2011 ला सुनिता अमेरिकी स्पेस शटल मधुन निवृत्त झाली.
तिची दुसरी अंतराळ भरारी 15 जुलै 2012 ला बेकानुर कास्मोड्रोस मधुन रूसी अंतरिक्ष ’सोयुज टीएमए 05 ने सुरू झाली. या मिशन दरम्यान सुनीता अंतरिक्ष स्टेशन च्या स्थायी दल 32/33 ची सदस्य म्हणुन गेली.
17 जुलै 2012 ला सायुज अंतराळयान अंतराळ स्टेशन ’अल्फा’ शी जोडल्या गेले.
सुनिता विल्यम्स ला 17 सप्टेंबर 2012 ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन ची दुसरी महिला कमांडर होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. या स्टेशन वर पोहोचणारी पहिली महिला कमांडर पेग्गी हिट्सल होती.
अंतराळ यात्री सुनीता विलियम्स सोबत अंतराळ यात्रे दरम्यान अंतराळ यात्री होशिंदे आणि रूसी कास्मोनट यूरी मैलेनचेंको देखील गेले होते.
आपल्या दुसऱ्या अंतराळ यात्रे दरम्यान सुनिता ने 3 स्पेस वाॅक केले होते. सुनीता विलियम्स ने एकुण 7 स्पेस वाॅक केले आहेत.
दुसऱ्या अंतराळ यात्रे दरम्यान सुनिता ने आपले सर्व प्रशिक्षण कार्य पुर्ण करून 19 नोव्हेंबर 2012 ला धरतीवर पुनरागमन केले.
सुनीता विलियम्स ने अंतराळात फडकवला भारताचा तिरंगा:
सुनीता विलियम्स 15 ऑगस्ट 2012 ला भारताच्या 66 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळी अंतराळात उपस्थीत होती त्यावेळी तीने अंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आपल्या भारत देशाचा तिरंगा अंतराळात फडकवला.
या दिवसाचे औचित्य साधत सुनिताने अंतराळातुन (अल्फा स्टेशनच्या आतुन) एक संदेश पाठविला होता.
ज्यात ती म्हणते ’’15 ऑगस्ट च्या निमीत्ताने मी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते, भारत एक धर्मनिरपेक्ष, हिंदु आणि अनेक उपलब्धींनी भरलेले राष्ट्र आहे.
या प्रसंगी सुनिता ने भारताचा हिस्सा असण्यावर अभिमान वाटत असल्याचे म्हंटले होते.
अंतराळवीर सुनीता विलियम्स ने बनविलेले विश्व रेकॉर्ड – Sunita Williams Record
सुनीता विलियम्स ने आपल्या प्रतिभेने, साहसाने व कष्टाच्या बळावर सिध्द केले की स्त्री ही कोणत्याही बाबतीत पुरूषापेक्षा कमी नाही.
तिने अनेक विश्वरेकॉर्डस् बनविले… तिने बनविलेल्या विश्व रेकॉर्डस् वर एक नजर …..
- सुनीता विलियम्स आपल्या पहिल्या अंतराळ यात्रे दरम्यान 195 दिवस अंतराळात राहिली या मोठया प्रवासादरम्यान तिने विश्व रेकॉर्ड बनविला. एका उड्डाणात एवढा मोठा प्रवास करणारी ती जगातील पहिली महिला ठरली.
- भारतिय वंशाची अंतराळ यात्री सुनीता विलियम्स अंतराळात सर्वात जास्त स्पेसवाक करणारी पहिली महिला अंतराळ यात्री आहे.
- तीने केलेल्या 7 स्पेसवाक चा एकुण कालावधी 50 तास 40 मिनीटं एवढा होता.
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन ची कमांडर बनणारी ती जगातील दुसरी महिला आहे.
अंतराळवीर सुनीता विलियम्स ची भारत यात्रा सरदार वल्लभ भाई पटेल विश्व प्रतिमा अवार्ड्स ने सन्मानित:
भारतिय वंशाची अंतराळ यात्री आपल्या पहिल्या अंतराळ यात्रे नंतर सप्टेंबर 2007 साली भारताच्या दौऱ्यावर आली.
अहमदाबाद येथील महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला आणि आपल्या वडिलांचे गाव (झुलासन, मेहसाणा जवळ) तीने भेट दिली.
या दरम्यान विश्व गुजराती समाजाने सुनिताला ’’सरदार वल्लभ भाई पटेल विश्व प्रतिमा अवार्ड्स ने’’ सन्मानित केले.
हा सन्मान मिळविणारी भारतिय वंशाची ती पहिली महिला ठरली भारतातील यात्रे दरम्यान सुनीता विलियम्स ने 4 ऑक्टोबर 2007 ला दिल्ली स्थित अमेरिकी दुतावासातील शाळेत मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर पुर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची तीने भेट घेतली आणि अंतराळातील यात्रेदरम्यानचे आपले अनुभव सांगीतले.
सुनीता विलियम्स ने आतापर्यंत एकुण 30 वेगवेगळया अंतराळ यानांमधुन 2770 भराऱ्या घेतल्या आहेत.
सुनीता विलियम्स ला मिळालेले पुरस्कार आणि सन्मान – Sunita Williams Awards
सुनीता विलियम्स ला तिने मिळविलेल्या यशाकरीता अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत सुनीता विलियम्स नौदल चालक, हेलीकॉप्टर पायलट, व्यावसायीक नौदल कर्मचारी, पशु प्रेमी, मरेथोन स्पर्धक आणि अंतराळ यात्री व विश्व किर्तीमान मिळविणारी आहे.
तीला खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
- नेव्ही कमेंडेशन मेडल अवार्ड
- नेव्ही एंड मैरीन कॉर्प एचीव्हमेंट मेडल
- हयूमैनिटेरियन सव्र्हिस मेडल
- मैडल फॉर मेरिट इन स्पेस एक्स्पलोरेशन
- 2008 साली भारत सरकार ने पद्मपुरस्काराने सन्मानित केले
- 2013 साली गुजरात विश्वविद्यालयाने डॉक्टरेट या मानद उपाधीने गौरविले
- सन 2013 मध्ये स्लोवेनिया व्दारा ’गोल्डन ऑर्डर फॉर मेरिटस्’ प्रदान करण्यात आले
हा लेख एका अप्रतिम महिलेची असाधारण ईच्छाशक्ती, दृढता, उत्साह आणि आत्मविश्वासाची कहाणी आहे.
तिच्यातील या गुणांनी एक पशु चिकीत्सक बनण्याची महत्वाकांक्षा ठेवणाऱ्या बालीकेला एक अंतराळ वैज्ञानिक, एक आदर्श प्रतिक बनविले.
अंतराळातील आपल्या सहा महिन्यांच्या प्रवासा दरम्यान जगभरातील लाखो लोकांच्या आकर्षणाचा ती केंद्रबींदु ठरली.
सुनिताने पोहुन समुद्र पार केला आहे, महासागराच्या तळाशी गेली आहे, युध्दादरम्यान आणि मानव कल्याणाकरता तिने उड्डाण केले आहे, अंतराळापर्यंत पोहोचली आहे आणि अंतराळातुन पुन्हा धरतीवर पोहोचली आहे ते एक जिवंत प्रेरणेचे उदाहरण बनुन ! ! !
जर आपल्याला आमची Information About Sunita Williams History In Marathi आवडल्यास आपण आम्हाला Facebook व Like आणि Share करा…..